शिवकॉलनी जवळील फर्निचर शॉपसह वॉशिंग सेंटरला आग

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील विल्स फार्निचर व वॉशिंग सेंटरला रविवार १० मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे सामान आगीच्या भक्ष्यस्थानी येत जाळून नुकसान झाले. दरम्यान, महापालिकेच्या सात बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.

शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील हॉटेल बावर्चीच्या शेजारी अर्जून प्रसाद चंद्रबली शर्मा (शिवधाम मंदीर, जळगाव) याचे विल्स फर्निचर दुकान आहे. याठिकाणी जुन्या लाकडांपासून कॉट, देऊळ, खुर्ची, कपाट आदी सामान बनविले जाते. त्यांच्याच बाजूला देवकिरण विलास पाटील (निवृत्ती नगर, जळगाव) यांचे कार वाशिंग सेंटर आहे.
रविवार, दि. १० मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास फर्निचर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत विल्स फर्निचर दुकान आणि वॉशिंग सेंटरमधील सामान जळून खाक झाले. यात विल्स दुकानात असलेले सागवान लाकूड, मशिनरी व तयार वस्तू जळून अंदाजे १५ लाखांचे नुकसान झाले तर वॉशिंग सेंटरमधील कार वाशिंग मशिन, व्हॅक्यूम क्लीनअर मशिनी, कोटींग मशिन, फर्निचर आदी असा अंदाजे चार लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचे सात अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होत, आग आटोक्यात आणत विझविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here