जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकरी व महिला या दोन्ही घटकांना स्वयंपुर्ण करणे व त्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महाराष्ट्र राज्य नविन्यता व नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प यांच्या समन्वयातून आज नियोजन भवनात कृषि व महिला उद्योजकता – नाविन्यता परिषद घेण्यात आली.या परिषदेला खा.उन्मेषदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी पूरक उद्योगात महिलांना उभारी देण्यासाठी तसेच प्रोत्साहीत करण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक संस्थांनी व व्यक्तींनी पुढे आले पाहिजे असा सूर उमटला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार , विविध बंॅकेचे प्रतिनिधी आणि विविध विभागाचे कार्यालय प्रमुख अधिकारी व विविध योजनांचे लाभार्थी यांची विशेष उपस्थिती होती त्यात आ. राजूमामा भोळे,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह कृषि…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी येथील आदर्श नगरात पाहटेच्या सुमारास तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये घरासमोरील नऊ वाहने अज्ञातांनी जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. याबाबतची माहिती अशी की,शहरातील आदर्श नगर प्लॉट क्रमांक 186 आराध्या अपार्टमेंट डी मार्टच्या मागील बाजूस व बाजूच्या घरांच्या कंपाऊंडमधील ठेवलेल्या वाहनांना अज्ञातांनी आग लावली. याबाबत अशोक राणे यांनी फोनद्वारे अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी गेले असता नागरिकांनी परस्पर आग विझवली होती.या आगीत सेन्ट्रो एमएच 19 एपी 1345 व क्रेटा एमएच 19 सीव्ही 9440 व इतर दोन मोटर सायकलींना आग लावण्यात आली होती. दरम्यान, आदर्श नगरातील सृष्टी अपार्टमेंटमध्ये देखील वाहनांना आग लावण्यात आल्याचा…
जळगाव ः प्रतिनिधी बंजारा समाजबांधव अतिशय कष्टाळू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील रामदेववाडी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते 83 लक्ष रूपयांच्या कामांचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. या कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नूतन इमारत, पेव्हींग ब्लॉक, भूमिगत गटर, व्यायामशाळा, शाळा वॉल कंपाऊंड, डांबरीकरण, इलेक्ट्रीक पोल व डीपी आदी कामांचा समावेश असून यातील काही कामांचे भूमिपुजन तर काहींचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी संत सेवालाल सभागृहासाठी 15 लक्ष रूपयांचा निधी देण्याची घोषणा दिली. तर गावकरी आणि समाजबांधवांनी एकजुट ठेवून प्रगती पथावरून वाटचाल करावी असे आवाहन देखील केले. तालुक्यातील रामदेववाडी येथील…
जळगाव ः प्रतिनिधी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास खात्याकडून जळगाव महापालिकेस 2 कोटी 80 लक्ष रूपये तर धरणगाव नगरपालिकेसाठी 2 कोटी 20 लक्ष अशा एकूण 5 कोटी रूपयांच्या कामांना काल मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय (जीआर) देखील निर्गमीत करण्यात आलेला आहे. त्यात जळगाव शहरातील विविध रस्त्यांच्या कामाला मान्यता मिळाली असून यामध्ये जिल्हा परिषद चौक ते बळीरामपेठ या अतिशय महत्वाच्या रस्त्याचा समावेश आहे. तर या निधीतून धरणगाव नगरपालिकेच्या अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना (वाढीव वितरण व्यवस्था ) या कामाला देखील अतिरिक्त निधी मिळाला आहे. जळगावातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा महापालिकेला…
जळगाव ः प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. त्यात पुरुष दुहेरीत पुण्याची जोडी प्रथम, वाशिम द्वितीय, जळगाव तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेे. खान्देशात पाच स्क्वॅश कोर्ट एवढ्या कमी कालावधीत उभारणे आणि त्याला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल खेळाडू दयानंद कुमार यांनी आयोजकांचे कौतुक केले. माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित (जिल्हा क्रीडा अधिकारी), अध्यक्षस्थानी केसीई सोसायटी उपाध्यक्ष ड. प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, डॉ. प्रदीप खांडे (अध्यक्ष महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन),…
जळगाव ः प्रतिनिधी रोटरी क्लब जळगावने अंधत्व निवारण अभियान सुरू केले आहेे. या अभियानांतर्गत प्री-मॅच्युअर बेबी म्हणजेच सातव्या महिन्यात जन्माला येणारी मुले यांना येऊ शकणारे अंधत्व व त्याच्याबद्दलची जनजागृती करणारे पोस्टर हे प्रत्येक दवाखान्यात लावण्यात येत आहे. सातव्या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचे डोळे हे पूर्णपणे विकसित नसतात. नंतरच्या विकासात बऱ्याचदा या मुलांना अंधत्व येते जे पालकांना फार उशिरा कळते. त्यावेळेस वेळ गेलेली असते म्हणून त्या संदर्भातली तपासणी ही मुलाच्या जन्माच्या वेळेसच स्पेशालिस्टकडून करून घेणे आवश्यक आहे. रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा व माजी अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, डॉ. हेमंत बाविस्कर यांनी या अभियानाचे पोस्टर तयार केले. अभियानाची सुरुवात डॉ. विलास व…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील गॅस्ट्रोएन्टेरोलाजिस्ट डॉ. विपुल चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय ‘एमआरसीपी पॅसेस’ या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. युरोपमध्येही त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची मान्यता मिळाली. सेंट जोसेफ हायस्कूल येथे शालेय शिक्षण तर 11वी आणि 12वी पर्यंतचे शिक्षण मूळजी जेठा महाविद्यालयातून घेतले. शालेय दशेत विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षा, गणित विषयाचीही स्वतंत्र परीक्षा त्यांनी देऊन यश संपादन केले. गणितात विशेष रुची असलेले डॉ. विपुल यांनी इयत्ता आठवीत असतानाच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट बनणार असे स्वप्न उराशी बाळगले होते. आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रातीलच लाभल्याने आणि अत्यंत बुद्धिमानी असलेले डॉ. विपुल यांचा शिक्षणाचा प्रवास सुलभ झाला.फिजिशियन डॉ.सुनिल चौधरी व डेंटिस्ट डॉ. पुष्पा चौधरी यांचे डॉ. विपुल चौधरी हे…
जळगाव ः प्रतिनिधी सध्याच्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात संस्काराची जपणूक आवश्यक आहे. सुसंस्कारित जीवनासाठी व्रतबंध संस्कार हवे. ब्राह्मण सेवा संस्थेने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन दादा महाराज जोशी यांनी येथे केले. महाबळ परिसरातील ब्राह्मण सेवा संस्थेतर्फे 30 बटूंचा व्रतबंध सोहळा बुधवारी हतनूर हॉल मध्ये उत्साहात झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. संत सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा संदेश पाठवला. कोविडच्या दोन वर्षांच्या काळात खंडित झालेला हा सोहळा प्रचंड प्रतिसादात झाला. त्यात जिल्ह्यातील जळगावसह शेंदुर्णी, एरंडोल, नशिराबाद, शिरपूर, ठाणे अशा विविध ठिकाणच्या बटूंचा सहभाग होता. कार्यक्रमास दादा महाराज जोशी, महापौर जयश्रीताई महाजन, माजी महापौर सीमा भोळे,…
मेष: मेष राशीच्या लोकांना सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. आज ८१% नशिबाची साथ आहे. गरजू लोकांना मदत करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य सर्वोच्च शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही मिळू शकते. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नात वाढ शक्य आहे. तुम्हाला…