मुक्ताईनगर : प्रतिनिधी बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये दुध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने हे टँकर्स व क्रेनला धडक दिल्याने मालकासह ४ मजूर जागीच ठार झाले आहे. या अपघातासंदर्भांत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी साईमत प्रतिनिधी यांनी संपर्क साधून सांगतिले असता. त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सविस्तर माहिती अशी की, धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. हि घटना घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर काल रात्री यामुळे टँकरच्या मालकाने दुसरा टँकर बोलावून यात दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली. यानुसार दुध हलविण्याचे काम सुरू असतांना समोरून भरधाव वेगाने आलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने…
Author: Saimat
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ.शंकर कसबे वैदयकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी उपस्थित अधिकारी ,कर्मचारी यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. कसबे यांनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कार्याबद्दल व त्यांनी केलेल्या रुग्णसेवेबद्दल मार्गदर्शन केले व सोयगाव ग्रामीण रुग्णालयातील अधिपरीचालकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अधिपरीचालका यांनी कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाला डॉ.धनंजय निरगुडे,डॉ.आबेद शेख, रवींद्र सुर्यवंशी,वि.डी.कारके, श्रीमती वर्षा ठोबरे, गीता घाटगे, सुनील वानखेडे,महेंद्र चित्राल,सुनील मगरे, विक्रांत जोहरे,रविराज शेळके,चेतनसर यांच्या सह इतर उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरात होणाऱ्या अशुध्द व गढूळ पाणीपुरवठ्याची तातडीने दखल घेत आज दुपारी उमाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रास भेट देत पाहणी केली. उमाळा जलशुध्दीकरण केंद्रातील 1200 मी.मी. व्यासाचा व्हॉलचा गिअर नादुरुस्त झाल्याने शुध्द पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला होता.याबाबत नागरिकांकडून तक्रारीही करण्यात आली होती. सदर नादुरुस्त गिअर तातडीने औरंगाबाद येथून आणून सकाळी बसविण्यात आला व पाणी पुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यात आला. भेटी दरम्यान आयुक्त गायकवाड यांनी संपूर्ण पाणी शुध्दीकरण प्रक्रियेची माहिती घेतली तसेच शुध्द पाणी स्वत: पिऊन खात्री करुन घेतली.याशिवाय अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणीदेखील जलशुध्दीकरण केंद्रात केली व या योजनेतील कामातील अडचणी समजून घेवून त्यांची लवकरच…
बोदवड ः प्रतिनिधी अल्पवयीन मुलगीबरोबर प्रेमाचा बनाव करून तिला पळून घेऊन जाऊन शारीरिक संबंध ठेऊन बलात्कार केल्याप्रकरणी प्रविण संजय बावस्कर (वय -24 ) रा.जलचक्र खु. ता . बोदवड यास पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 4 वाजेच्या पुर्वी फिर्यादीचे राहते घरातुन जलचक्र खु. येथून आरोपीने अल्पवयिन मुलीला पळवून नेले होते.आरोपीवर भादवि कलम 363 , 376 (2), 366 (अ) सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.नि.राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय अंकुश जाधव करीत आहे.
यावल ः तालुका प्रतिनिधी येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची कार्यकारणी अनधिकृत असल्याने त्यांनी केलेली शिक्षक पदभरती रद्द करण्याची तक्रार सोसायटीचे सभासद आणि समाजसेवक यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा परिषद जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे 11 मे 2022 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात समाजसेवक हाजी गुलाम मुस्तफा हाजी गुलाम दस्तगीर यांनी तसेच सोसायटीचे सभासद आसिफ खान ताहेर खान,युनूस खान रशीद खान,अ.मुनाफ शे.ताहेर, नजीर खान आमिर खान यांनी नमूद केले आहे की,यावल येथील नॅशनल एज्युकेशन वेल्फेअर सोसायटीची कार्यकारणी अनधिकृत व घटनाबाह्य असल्याने या कार्यकारी मंडळाला शिक्षण पद्धती व कोणताही आर्थिक किंवा विकास करण्याचा हक्क अधिकार नसल्याने तसेच केलेली शिक्षक वरती अति व तातडीने रद्द करण्यात…
यावल ः तालुका प्रतिनिधी तालुक्यातील न्हावी गावातील भारत विद्यालयात ऑगस्ट2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यतचे े154 दिवसांचे धान्य वाटप विद्यार्थ्यांना “मापात पाप“ करण्याच्या उद्दिष्टाने वजन काटा न वापरता स्टीलच्या बालटीने करण्यात आले.कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने धान्य वाटप प्रक्रियेत वजन काट्याऐवजी स्टील बाल्टीचा वापर करण्यात आला.अशी शक्कल संबंधितांनी का? व कशासाठी? लढविली,विद्या मंदिरातच विद्यार्थ्यांना मापात पाप कसे करावे याचे धडे दिले जात आहेत का?असे अनेक प्रश्न न्हावी ग्रामस्थांसह तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उपस्थित केले जात आहेत. सविस्तर माहिती अशी की, गेले 7 महिन्यापासून विद्यार्थी धान्यापासून वंचीत होते.दोन दिवसापूर्वी यावल तालुक्यातील न्हावी गावातील भारत विद्यालयात ऑगस्ट2021 ते फेब्रुवार2022पर्यतचे 154 दिवसांचे मूग व…
राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांचा सहा वर्षांच्या कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी आज आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. आपण राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असून ‘स्वराज्य’ नावाच्या संघटनेची स्थापन करणार असल्याच्या दोन मोठ्या घोषणा संभाजीराजे यांनी केल्या. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली. राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचे हित बघितले. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणे गरजेचे आहे.समाजाला दिशा देण्यासाठी आणि समजाच्या हितासाठीच मी आजवर भूमिका घेत आलो आहे. सहा वर्षात मी कुठेही राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, असे वर्तन केले नाही.…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात आर्थिक उलाढालीत अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग.स.) सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी आज दुपारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सहकार गटाचे उदय पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. तर उपाध्यक्षपदी सहकार गटाचेच रवींद्र सोनवणे यांचा विजय झाला. लोकसहकार व प्रगती गटातर्फे अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेले रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला. निकाल घोषित होताच सहकार गटाच्या संचालकांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. रावसाहेब पाटील यांना लोकसहकार गटाने एकत्रीत येत पाठिंबा दिला होता. मात्र दोन संचालक फुटल्याने या निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली व सहकार गटाने बाजी मारली. दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ग.स. सोसायटी परिसरात…
जळगाव ः प्रतिनिधी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड मधील कला विभागातील सहकारी विजय जैन यांना उत्तर प्रदेश ललित कला अकादमीच्या दुसऱ्या अखिल भारतीय व्यावसायिक कला प्रदर्शन 2021-22 चा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक जागरूकता आणि जनहित या विषयावर केलेल्या आवाहनानुसार देशभरातील शेकडो व्यावसायिक कलाकारांच्या कलाकृतीमधून या कलात्मक पोस्टरची निवड करण्यात आली आहे. वीस हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य ललित कला अकादमीच्या ऐतिहासिक वास्तूत मान्यवरांच्याहस्ते लाल बारादरी भवन लखनऊ येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कान्हदेशातील या कलावंताच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे कौतूक केले आहे. प्रदर्शनामध्ये…