Author: Saimat

सोयगाव : प्रतिनिधी छञपती संभाजी महाराज यांची जयंती व कविसंमेलनाचे आयोजन डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद , औरंगाबाद यांनी संभाजी चौक , होनाजी नगर , जटवाडा रोड , औरंगाबाद येथे केले .सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले.मान्यवरांनी छञपती संभाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला .नंतर प्रा.डाॕ.ललित अधाने यांनी आपल्या स्वरचित कविता श्रोत्यांना ऐकविल्यात.नंतर मान्यवरांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले .त्यानंतर मा.सुनिल चव्हाण साहेब ( जिल्हाधिकारी , औरंगाबाद ) यांचे शुभहस्ते श्री.आनंदा भगवान वारांगणे लिखित ‘ सार अभंगाचे ‘ , ‘ संतांचे शब्दामृत ‘ , ‘ लाणी ‘ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी मा.श्री.एल.जी.गायकवाड ( मा.उपाध्यक्ष जि.प.औरंगाबाद ) , मा.प्राचार्य डाॕ.आर.एस.पवार (…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे 17 मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. विविध कार्यक्रमांना त्या उपस्थिती देतील. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही त्या संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी 9.30 वाजता चार्टर्ड अकाउंटंट संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या बैठकीला हजेरी लावतील. दुपारी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर 3.30 वाजता जळगाव ग्रामीण व शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सायंकाळी मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळाचे व संस्थानच्या नवीन मंदिराचे दर्शन घेणार आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील ग. स. सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशित पार पडली. यात स्थानिक मतदार संघातुन उमेदवारी करणारे व अल्पशा मतांनी पराजित झालेले सहकार गटाची प्रचाराची धुरा सांभाळणारे मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष राम पवार यांची ग. स. सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीचे जळगाव महानगर मराठा सेवा संघाचे वतीने स्वागत करण्यात आले असून नवनियुक्त संचालक राम पवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जळगांव महानगराध्यक्ष इंजि एच. एच. चव्हाण, महानगर सचिव चंद्रकांत देसले, महानगर सहसचिव इंजि. सचिन पाटील, महानगर कार्याध्यक्ष सचिन पवार,महानगर उपाध्यक्ष यु.जी.पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित संचालक रामदादा पवार…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशनतर्फे शनिवारी झालेल्या 18व्या जिल्हा श्री 2022 या शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. यात भुसावळच्या गुरुमितसिंग चहल हा जिल्हा श्री 2022चा मानकरी ठरला. बेस्ट पोझर किताब तुषार जाधव (भुसावळ) तर मोस्ट इम्प्रुड बॉडीबिल्डर्स पुरस्कार अफसर खान (भुसावळ) याने पटकावला. या स्पर्धेत वेन्स जिम्स भुसावळचे वर्चस्व राहिले. 110 स्पर्धकांचा सहभाग हिंदू महासभेचे डी. एन. तिवारी, संस्थेचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी उद्घाटन केले. जयेश चौधरी, डॉ. कमलाकर पाटील, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू रवींद्र वंजारी उपस्थित होते. जिल्हाभरातून 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला. राजेश बिऱ्हाडे, नासीर शेख, भय्या पाटील, अक्षय चव्हाण यांनी पंच म्हणून तर प्रशांत तायडे, विनायक लेकुरवाळे, बॅक स्टेज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ‘रिॲलिटी शो’च्या माध्यमातून तनय मल्हारा, शिवम वानखेडे यांनी जळगाव शहराचे नाव उंचावलेले आहे. आता जळगाव शहरातील तन्वी मल्हाराने मालिकेच्या दुनियेत पाऊल ठेवून लक्ष वेधले आहे. टीव्हीवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेत ती मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारणार आहे. कलाकार कुणाल जयसिंग सोबत या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असेल. जळगावातील मल्हार हेल्प केअरचे आनंद मल्हारा यांची सुकन्या तन्वीने देखील मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरवात केली. तिची टीव्हीवरील ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाली. तन्वीची ही पहिली मालिका असून इतर कथांपेक्षा वेगळी कथा या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अनोखी प्रेमकथा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुणे येथे गौरा फॅशन क्लब आयोजित ‘वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची 2022’ या सौंदर्य स्पर्धेत जळगावची जीविका मराठे या युवतीने उपविजेतेपद पटकावले. गौरी नाईक आणि जयंत पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. ग्रुमिंग व प्रशिक्षणानंतर ग्रँड फीनालेचा सोहळा बोट क्लब पुणे येथे पार पडला. महाराष्ट्रातील 55 स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदवला होता.रोहित खंडेलवाल, अभिनेता मिलिंद गुणाजी, सचिन दनाय, डॉ. दिलीप बोरावके, गौरी नाईक, प्राची भावसार, चैतन्य गोखले व चैताली नेहेते यांनी परीक्षकांचे काम केले. भारत सुरती यांनी मेन्स डिझाइनर पार्टनर व मि. बेनविन कुटिनो यांनी लेडीज डिझाइनर पार्टनर म्हणून सहयोग केले. मेकअप पार्टनर म्हणून अमृता पाटील व…

Read More

मलकापूर ः प्रतिनिधी जगाच्या पाठीवर वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषणम ग्रंथ लिहणाऱ्या व वेगवेगळ्या भाषांच ज्ञान उराशी असलेल्या धर्मवीर संभाजीराजांची किर्ती गगनाएवढी अशीच होती. स्वाभिमानान जगावं कस हे शिवरायांनी तर मराव कस हि शिकवण संभाजी महाराजांनी दिली. युवकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन शिवमती वनिता गायकवाड यांनी केले. विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूरात धर्मवीर संभाजीराजेंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने यशवंत नगर, नांदुरा रोड, तहसील चौक, मुक्ताईनगर रस्त्यावरुन टाळ म्रुदंगाच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज नगरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. महावितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात आयोजित व्याख्यानात शिवमती वनिता गायकवाड यांनी धर्मवीर संभाजीराजेंच्या जिवनावर…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माळी साम्राज्य व समता विचार फाउंडेशनच्या उद्योजक मेळाव्यात केले. कांताई सभागृहात रविवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. फाउंडेशनचे प्रमुख भूषण महाजन यांनी प्रास्ताविक केले. जि.प. सदस्य नाना महाजन, उद्योजक दिलीप पाटील, नगरसेविका सरिता नेरकर, राजेश महाजन, कमलाकर चौधरी, संध्या माळी, संजय महाजन उपस्थित होते. उद्योजक मुरलीधर महाजन, राजेश महाजन,उद्योजक कमलेश चौधरी यांनी विचार मांडले.जयश्री महाजन, समाधान माळी, कमलाकर माळी, नीलेश माळी, विजय महाजन, राकेश महाजन, दिनेश महाजन, विजू माळी, मनोज महाजन, प्रशांत महाजन, सुनील कोळी, नितीन महाजन, जयेश माळी यांनी सहकार्य केले. मेळाव्यात…

Read More

यावल : प्रतिनिधी  राजकारणात,समाजात, व्यवसायिक क्षेत्रात स्पर्धा ही निकोप असावी हरकत नाही,वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण काम करताना तुझ्या पेक्षा माझी रेषा लांब कशी मोठी होईल हा प्रयत्न केला तर त्याला हरकत असायचं कारण नाही,चांगल्या उपक्रमाचे स्वागत केले पाहिजे,तर शेवटी आमचा सर्वांचा उद्देश जनतेची सेवा करणे हा आहे,स्वार्थ साध्य करणे हा नाही आणि जो पर्यंत आम्ही स्वार्थाच्या मागे लागणार नाही तोपर्यंत जनतादेखील आमच्या सगळ्यांच्या सोबत राहील असा मला विश्वास आहे,आणि जनहिताची चांगले कामे करताना काही अडचण आली तर (व्यासपीठावर उपस्थित माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे बघून)आमचे “संकट मोचक”आहेतच काही चिंता करण्याचे कारण नाही, गिरीशभाऊंनी हात वर केले की भले भले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मालधक्क्यावर सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला चार जणांकडून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील मोहन टॉकीजवळील रहिवासी संजय सुधाकर नेवरे (वय-२८) हा तरुण ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. तो दोन वर्षांपूर्वी मालधक्क्यावर सुपरवायझर म्हणून नोकरीला होता. शनिवारी १४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथून योगेश व किरण सपकाळे यांना भेटून योगेश सरदार याच्यासोबत मालधक्क्याकडून गावात येत होते. यावेळी रेल्वे धक्क्यावरील कोपर्‍यात काही हमाल व राजू पटेल, त्याचा मुलगा जास्मीन पटेल, मेहमुद पटेल व त्याचा साला यांचे भांडण सुरु…

Read More