Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी मातृदिनाच्या निमित्ताने तरुण कुढापा चौकात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. सुरेश जगन्नाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन कोणताही बडेजावपणा न करता श्रीमती बेबाबाई सुरळकर यांच्या हस्ते व परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुरळकर परिवारातर्फे मागील 35 वर्ष पाणपोईची सुविधा अविरतपणे चालू असून ती यापुढेही सुरूच राहिल,असा मानस शिवसेना उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी बोलून दाखवला. यावेळी श्रीमती बेबाबाई सुरेश सुरळकर,संगीता अरविंद सूर्यवंशी, प्रमिला वारुळे, श्रीमती अलका सोनवणे, सविता भावसार, ज्योती सुरळकर, रोहिणी सुरळकर, शैलेश सुरळकर, शिवाआप्पा चौधरी, मुन्ना परदेशी, अनिल चौधरी, प्रल्हाद पाटील, नितीन पाटील, मुन्ना मराठे, चेतन मराठे, हितेश शिंपी, गणेश पाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील रेल्वे पूल तुटल्यापासून शिवाजीनगरचा जळगाव शहराशी संबंध जसा तुटलेला आहे असे वाटते कारण महापालिकेतील अधिकान्यांना शिवाजीनगरमधील नागरिकांकडून फक्त कर घेण्याशी संबंध येतो. वास्तविक शिवाजीनगर मध्ये जवळपास ७० ते ८० हजार लोकवस्तीचा परिसर येतो. परंतु त्यामानाने सुविधाचा अभाव आहे. त्यातच सध्या अमृत योजनेमुळे रस्ते खोदले गेले असून धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून लहान मुले व ज्येष्ठांना याचा अत्याधिक प्रमाणात त्रास होतोय म्हणून लवकरात लवकर आपण शिवाजी नगर मधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा तसेच शिवाजीनगर मधील साफसफाईचा प्रश्न हा महत्वाचा असून सदर युनिटचे अधिकारी हे प्रत्येक वेळी एकच उत्तर देतात आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून आम्ही…

Read More

मेष : आज तुम्हाला चांगली माहिती मिळू शकेल. घरातील जबाबदार्‍या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील आणि पदोन्नतीचे संकेत आहेत. व्यापार्‍यांसाठी नफ्याची परिस्थिती राहिली आहे. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकार्‍यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ७५% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. आज तुमचा संपूर्ण दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या कौशल्याने आणि समजूतदारपणाने तुम्ही कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. आज अचानक व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. अधिकार्‍यांसमोर आपले म्हणणे मांडण्याची हीच योग्य वेळ आहे. आज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड येथे शेतातील विहरीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल भरत जाधव (वय-२८) असे मयत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील वराड येथे राहूल हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो मानसिक रुग्ण असल्याने तो अनेक दिवस घरी देखील जात नव्हता. शुक्रवारी १३ मे रोजी सकाळी मजूर शेतात काम करीत असतांना ते पाणी पिण्यासाठी हिलाल पुंडलिक नेरे यांच्या शेतातील विहरीजवळ गेले. दरम्यान, ते विहरीतून पाणी काढत असतांना त्यांना विहरीत मृतदेह तरंगतांना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ शेतमालकाला दिली. शेतमालकासह सरपंच संदिप…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकरी व महिला या दोन्ही घटकांना स्वयंपुर्ण करणे व त्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महाराष्ट्र राज्य नविन्यता व नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प यांच्या समन्वयातून आज नियोजन भवनात कृषि व महिला उद्योजकता – नाविन्यता परिषद घेण्यात आली.या परिषदेला खा.उन्मेषदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी पूरक उद्योगात महिलांना उभारी देण्यासाठी तसेच प्रोत्साहीत करण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक संस्थांनी व व्यक्तींनी पुढे आले पाहिजे असा सूर उमटला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार , विविध बंॅकेचे प्रतिनिधी आणि विविध विभागाचे कार्यालय प्रमुख अधिकारी व विविध योजनांचे लाभार्थी यांची विशेष उपस्थिती होती त्यात आ. राजूमामा भोळे,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह कृषि…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील आदर्श नगरात पाहटेच्या सुमारास तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये घरासमोरील नऊ वाहने अज्ञातांनी जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. याबाबतची माहिती अशी की,शहरातील आदर्श नगर प्लॉट क्रमांक 186 आराध्या अपार्टमेंट डी मार्टच्या मागील बाजूस व बाजूच्या घरांच्या कंपाऊंडमधील ठेवलेल्या वाहनांना अज्ञातांनी आग लावली. याबाबत अशोक राणे यांनी फोनद्वारे अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी गेले असता नागरिकांनी परस्पर आग विझवली होती.या आगीत सेन्ट्रो एमएच 19 एपी 1345 व क्रेटा एमएच 19 सीव्ही 9440 व इतर दोन मोटर सायकलींना आग लावण्यात आली होती. दरम्यान, आदर्श नगरातील सृष्टी अपार्टमेंटमध्ये देखील वाहनांना आग लावण्यात आल्याचा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी बंजारा समाजबांधव अतिशय कष्टाळू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील रामदेववाडी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते 83 लक्ष रूपयांच्या कामांचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. या कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नूतन इमारत, पेव्हींग ब्लॉक, भूमिगत गटर, व्यायामशाळा, शाळा वॉल कंपाऊंड, डांबरीकरण, इलेक्ट्रीक पोल व डीपी आदी कामांचा समावेश असून यातील काही कामांचे भूमिपुजन तर काहींचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी संत सेवालाल सभागृहासाठी 15 लक्ष रूपयांचा निधी देण्याची घोषणा दिली. तर गावकरी आणि समाजबांधवांनी एकजुट ठेवून प्रगती पथावरून वाटचाल करावी असे आवाहन देखील केले. तालुक्यातील रामदेववाडी येथील…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास खात्याकडून जळगाव महापालिकेस 2 कोटी 80 लक्ष रूपये तर धरणगाव नगरपालिकेसाठी 2 कोटी 20 लक्ष अशा एकूण 5 कोटी रूपयांच्या कामांना काल मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय (जीआर) देखील निर्गमीत करण्यात आलेला आहे. त्यात जळगाव शहरातील विविध रस्त्यांच्या कामाला मान्यता मिळाली असून यामध्ये जिल्हा परिषद चौक ते बळीरामपेठ या अतिशय महत्वाच्या रस्त्याचा समावेश आहे. तर या निधीतून धरणगाव नगरपालिकेच्या अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना (वाढीव वितरण व्यवस्था ) या कामाला देखील अतिरिक्त निधी मिळाला आहे. जळगावातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा महापालिकेला…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. त्यात पुरुष दुहेरीत पुण्याची जोडी प्रथम, वाशिम द्वितीय, जळगाव तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेे. खान्देशात पाच स्क्वॅश कोर्ट एवढ्या कमी कालावधीत उभारणे आणि त्याला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल खेळाडू दयानंद कुमार यांनी आयोजकांचे कौतुक केले. माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित (जिल्हा क्रीडा अधिकारी), अध्यक्षस्थानी केसीई सोसायटी उपाध्यक्ष ड. प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, डॉ. प्रदीप खांडे (अध्यक्ष महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन),…

Read More