पाचोरा प्रतिनिधी ” पाचोरा येथील केंद्र सरकारच्या विरोधात पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आलेला आहे यावेळी लॉट गाडीवर गॅस अंडी तसेच चूल मोटर सायकल व लाकडे ठेवून अंत्ययात्रा वर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली निवडणुका आधी भाजप सरकारने आश्वासन दिले होते की पेट्रोल-डिझेल, गॅस भाजीपाला तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही.केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला…
Author: Saimat
मेष राशी : मेष राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, पण जर तुमच्याकडे कोर्ट-कचेरीशी संबंधित काही प्रकरणे असतील तर त्यामध्ये आज तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. या दिवशी तुमची दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण कराल. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. आज ८२% नशिबाची साथ आहे. देवी लक्ष्मीची पूजा करा. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कार्यक्षेत्रात लाभदायक राहील. तुमचे सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. लोकांमध्ये सन्मान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल. प्रमोशनही होऊ शकते. तरुणांना कायमस्वरूपी नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. तरुणांना इच्छित जीवनसाथी मिळाल्याने मन…
लोणार : प्रतिनिधी लोणार तालुक्यातील तांबोळा येथे दिनांक 19 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडा मध्ये पावसाने हजेरी लावली होती यावेळीच तांबोळा येथील गावाशेजारी असलेल्या तीन गाईवर अचानक वीज पडून सदर काही जागीच ठार झाल्या होत्या या घटनेची माहिती लोणार पोलीस स्टेशन, पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांना देण्यात आली संबंधित अधिकारी यांनी आज 20 मे रोजी तांबोळा येथे येऊन घटनेची पाहणी करून मृत झालेल्या गाई चा पंचनामा केला यामध्ये मधुकर राठोड यांच्या दोन गाईचा मृत्यू होऊन अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले तर अशोक राठोड यांच्या एका गाईचा मृत्यू होऊन अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले…
तालुक्यात खरीप पेरणी साठी शेतकरी राजा सज्ज झाला असून पेरणी पूर्व मशागतीला वेग आला आहे. खरीपाच्या पेरणीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून रख रखत्या उन्हात म्हणजे 44 डीग्री च्या वर असलेल्या तापमानात सुध्दा शेतकरी राजा आपल्या शेतात राबतांना दिसून येत आहे. नांगरणी व रोटा व्हीटर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. इंधन दर वाढी मुळे नांगरणी व रोटा व्हीटर चे दर वाढले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी एकरी तीनशे ते चारशे रुपये वाढलेले आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्वच क्षेत्राला बसणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या अती पाऊसामुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या हंगामात आतोनात नुकसान सोसावे लागले होते. मात्र जमिनीत पाण्याचा मुबलक…
यावल : प्रतिनिधी यावल शहर परिसरासह तालुक्यात शेती शिवारात व इतर ठिकाणी जिवंत वृक्षांची भर दिवसा वृक्षतोड करण्यात येत असून अनेक शेतकरी तोंडी व लेखी तक्रारी करीत आहे तरी सुद्धा महसूल व वन विभाग आणि पोलिसांतर्फे ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथील योगेंद्र प्रदीप महाजन गटनंबर 842,दिनेश श्रावण बोरसे यांनी गट नंबर 2094 मधील जिवंत वृक्षतोडीबाबत आणि इतरांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेती शिवारात जिवंत वृक्षतोड केली जात असल्याच्या स्वतंत्र लेखी तक्रारी अनुक्रमे दि.29/4/2022 व दि.10/5/2022रोजी यावल पोलीस,तहसीलदार यावल, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल यांच्याकडे केलेल्या आहेत. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी अवैध वृक्षतोड…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या घरगुती कचरा संकलन वाहतूक व नाल्या साफ सफाई कामाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेले आदेश व अटी शर्तींना मुख्याधिकार्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्षित करत त्यांच्या आदेशाला अक्षरक्षा केराची टोपली दाखविली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर नगरपंचायतीचे घरगुती कचरा संकलन व शहरातील गटारे साफसफाई संबंधीचे 2021 -2022 साठी चे कंत्राट करण्यात आले होते, त्यात सदर काम सृष्टी इंटरप्राईजेस या संस्थेला देण्यात आले होते या कामासाठी नगरपंचायतीकडे 14 व्या वित्त आयोगातील सहा महिने साठीचा निधी उपलब्ध होता तर उर्वरित सहा महिन्यासाठी चा निधीची उपलब्धता होणेसाठी पंधराव्या वित्त आयोगातून महाशय जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घ्यावयाची होती. सदर प्रशासकीय मान्यता देतेवेळी…
जळगाव ः प्रतिनिधी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या 80 व्या जन्मोत्सवानिमित्ताने सनातन संस्थेतर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. यावेळी श्रीरामचंद्र की जय, जय भवानी जय शिवाजी यांसह घोषणांनी परिसर दणाणला होता. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. श्री श्री 1008 सरजू दास महाराज यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करत नेहरू चौक येथून दिंडीला सुरवात झाली. पौरोहित्य नंदू शुक्ल यांनी केले. टॉवर चौक, चित्रा चौक या मार्गे शिवतीर्थ मैदान येथील चौकात समारोप झाला. शेवटी उपस्थितांना सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, वरसाडेकर…
जळगाव ः प्रतिनिधी जलरंगातील टवटवीतपणा, रंगसंगती, भावतरलता ही चित्रकार सचिन मुसळेंच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक चित्र हे नवा आशय व विचार देते. प्रत्येक कलाप्रेमींसाठी प्रतिबिंब चित्रप्रदर्शन हे आनंदपर्वणीच ठरेल, असे मत संपदा उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले. जळगावातील पु. ना. गाडगीळ गॅलरीत आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. मुसळे यांनी पाहिलेला निसर्ग, रंग, रेषा यांच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे कॅन्व्हासवर उतरवला आहे. हे अनोखे निसर्ग दर्शन या प्रदर्शनातून अनुभवायला मिळते, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. कृषी अधिकारी अनिल भोकरे, चित्रकार प्राचार्य राजेंद्र महाजन, प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, संदीप पोतदार, सचिन मुसळे उपस्थित होते. प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी सचिन मुसळे…
जळगाव ः प्रतिनिधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये साहित्य लेखनाचे आणि सादरीकरणाचे कौशल्य विकसित व्हावे म्हणून गेल्या 25 वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्थी परिषदेतर्फे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभा संगम आयोजित करण्यात येत असते. यंदा पुणे येथे 17 व 18 मे रोजी झालेल्या 19 व्या प्रतिभा संगममध्ये मू.जे. महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत विजयाची परंपरा कायम राखली आहे. विजयी विद्यार्थ्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनात मू. जे. महाविद्यालयातील 11 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत प्रा. विजय लोहार यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.