जळगाव : प्रतिनिधी अखिल भारतीय साहित्य परिषद ही सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धीसाठी कार्यरत आहे. जळगावातही साहित्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवणे व परिषदेची व्याप्ती वाढवण्यासाठी शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी साहित्यिक सुधीर ओखदे यांची निवड झाली. उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्ष सुहास देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र देशमुख, उपाध्यक्षा प्रा. संध्या महाजन, सचिव विशाखा देशमुख, सहसचिव वैशाली पाटील, कार्यक्रम प्रमुख प्रा. संदीप शिंदे, प्रसिद्धी प्रमुख मनोज महाजन, सदस्य प्रा. श्यामकांत बाविस्कर, विलास देशमुख, ज्योती पाटील, प्रा. मुक्ती जैन, नितीन मटकरी, शरद पाटील, मार्गदर्शक डॉ. सुभाष महाले, प्रा. प्रकाश महाजन व स्वानंद झारे असतील. घोषणा झाल्यावर पुढील कार्याची रचना या संदर्भात चर्चा…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगिती झाल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सकाळपासून अयोध्या दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. दौरा रद्द करण्यामागील कारण राज ठाकरे यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. पुण्यात २२ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे मनसैनिकांसमोर याबाबत स्पष्टीकरण देतील. पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राच्या सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगणा येथील एक तरूण बनावट नोटांची छपाई करत असल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पहूर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील हिंगणे येथील रहिवासी असणारा उमेश चुडामण राजपूत (वय २२) हा काल रात्रीच्या सुमारास पहूर बस स्थानक परिसरात संशयास्पद पध्दतीत फिरत होता. यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करून झडती घेतली. यात त्याच्याकडे दोनशे रूपयाची एक बनावट नोट आढळून आली. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या चौकशीत उमेश राजपूत याने आपण दोनशेच्या बनावट नोटांची आपल्या घरीच छपाई करत असल्याची माहिती दिली. यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी रात्री छापा टाकून बनावट नोटा प्रिंट…
मेष आज मेष राशीची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. दिवस चांगला जाईल. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. आज मूड चांगला राहणार आहे, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा पुरेपूर फायदा मिळेल. चांगले पैसे मिळतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. तुम्ही संपूर्ण दिवस आनंदी राहाल, आज तुम्ही कुटुंब किंवा मित्रासोबत प्रवास…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुका पंचायत समितीच्या इमारतीची मोठी दुर्दशा झालेली असून पंचायत समितीच्या इमारतीची जागा अपुरी पडते या जुनाट झालेल्या इमारतीमधून पंचायत समितीच्या कामकाजाचा गाडा ओढल्या जातो ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी वाटप करणाऱ्या या पंचायत समितीच्या इमारतीच्या नशिबी दारिद्र्यच आहे.एकाच छताखाली सर्व कार्यालये या योजनेत सोयगाव पंचायत समितीचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु अद्यापही या योजनेचा शुभारंभ झालेला नसल्याने जुन्याच इमारतीतून जीव मुठीत घेवून कामकाज सुरु आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील कारभार पाहण्यात येतो मात्र तालुक्याचा व्याप बघता व इमारतीची अवस्था बघता पंचायत समितीला प्रशस्त इमारतीची गरज आहे. जुन्या इमारतीला दुरुस्ती निधीच नाही दरम्यान पंचायत समितीच्या जुनाट झालेल्या या इमारतीला…
प्रतीनिधी कजगाव नगरदेवळा तालुका पाचोरा येथील रहिवासी व पाचोरा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नामदेव महाजन उर्फ नाना महाजन यांनी आपल्या गाळन रस्त्यातील शेतात सिल्वर वृक्षाची लागवड केली असून ज्या झाडाच्या लाकडापासून जहाज बनवले जाते सदरचे लाकूड हे पाण्यात सडत वा कुजत नाही या वृक्षाचा कालावधी जवळपास 17 वर्षाचा असतो नाना महाजन यांनी सन 2011 मध्ये सिल्वर ओक वृक्षाची 20 गुंठे लागवड व उर्वरित शेताच्या बांधावर अन्य शेतात सेंद्रिय लिंबूलागवड केली आहे या वृक्षाचे लाकूडला मोठ्या प्रमाणात मागणी असून गुजरात राज्यातील भुज मधील कच्च येथील व्यापारी लाकूड घेण्यास येणार असल्याची माहिती नाना महाजन यांनी दिली आहेसंपूर्ण शेती विषमुक्त असून या ठिकाणी कुठल्याही…
ओबीसींची जातीनिहाय जनगणना, ई. व्ही. एम मशीनद्वारे होत असलेला घोटाळा, महागाई, बेरोजगारी या व अन्य सामाजिक, शेक्षणिक व राजकीय विषयांच्या अनुषंगाने शुक्रवार दि. २० मे रोजी राजवाडा चौपाटी मैदान सातारा येथे सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा संपन्न होणार आहे. या सभेचे उद्घाटक प्रा. सुकुमार कांबळे यांच्या हस्त होणार असून यावेळी उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने, लोकायत प्रकाशनाचे राकेश साळुंखे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नलोकशाही टिकली तर तिची फळे चाखता येतील अन्यथा लोकशाही नाही टिकली तर विनाश अटळ…
जळगाव : प्रतिनिधी मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून तरूणाला चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, शंकर सुरेश सोनवणे (वय-२६) रा. रामेश्वर कॉलनी तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शंकर सोनवणे याने एका मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून मंगळवारी १७ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास योगेश भागवत कोळी, निलेश राजपूत (पुर्ण नाव गाव माहित नाही) यांच्यासह इतर दोन जणांनी शंकर सोनवणे हा दुचाकीने रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानासमोरून जात असतांना अडविले. मुलीचे नाव का घेतले असे बोलून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. योगेश कोळी व निलेश राजपूत यांनी…
Dearness Allowance Hike: सरकारने या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी दिली आहे. महागाई भत्त्यात 14 टक्क्यांची वाढ केली आहे. त्याचवेळी 10 महिन्यांचा फरकही दिला जाणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे. यामुळे वाढत्या महागाईत मोठा दिलासा मिळला आहे. सातत्याने महागाईचा सामना करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employee) सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे बोर्डाने (Railway Board) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाच वेळी 14 टक्क्यांनी वाढ केली आहे. महागाई भत्त्याची ही वाढ दोन पटीच्या आधारे करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. डीएमध्ये ही वाढ 1 जुलै 2021 पासून 7 टक्के आणि 1 जानेवारी 2022 पासून…