Author: Saimat

औरंगाबाद : वृत्तसंस्था गुरुवारी एकाने आपल्या मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. शुक्रवारी दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातील एकाने धारदार शस्त्राने दुसऱ्यावर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. तर, शनिवारी दुपारी देवगिरी कॉलेजमधील एका विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनांमधून शहर सावरत नाही तोच एका जोडप्याच्या खुनाने शहरात खळबळ माजली आहे. औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर गल्ली क्रमांक 4 मध्ये एका मंदिरासमोरील इमारतीत ही घटना घडली. येथे राहणाऱ्या कलंत्री दाम्पत्याची हत्या करण्यात आलीय. शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण शामसुंदर कलंत्री असे हत्या करण्यात आलेल्या जोडप्याचे नाव आहे. कलंत्री यांच्या घरातून दुर्गंध येत होता. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह,महाबळ,जळगाव येथे काल झाली. आचार्यदादांनी घालून दिलेल्या कार्यपद्धती, नितीमूल्य, कार्यतत्परता या आदर्शावर बँकेची प्रगती सुरू असून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सभेच्या सुरवातीस बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व.डॉ.अविनाशदादा आचार्य यांचे स्मरण करून सर्व संचालक व उपस्थित सभासदांनी स्व. दादांना आदरांजली अर्पण केली.या सभेत सन 2021-2022 या वर्षासाठी 10 टक्के लाभांश देण्यास मंजूरी घेण्यात आली ज्या सभासदांना सभेस प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसेल अशा सभासदांसाठी सभेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्था देखील बँकेच्या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी प्रत्येकाच्या जीवनात लग्न वाढदिवस हा एक अविस्मरणीय क्षण असतो.तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण साजरा करत असतो. पण ज्यांना समाजकार्याची आवड असते ते आपला आनंदी क्षण देखील समाजासाठी घालवतात. महापौर जयश्रीताई महाजन , वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, महिल पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील ,पर्यावरण प्रतिनिधी वसंतराव पाटील, मनोहर शिंदे यांनी काल आपल्या लग्नाचा वाढदिवस संत सावता नगर येथे वृक्षरोपण करून साजरा केला. एवढेच नव्हेतर पर्यावरण व निसर्ग वाचविण्यासाठी फक्त वृक्षरोपणच नाही तर त्या वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी देखील स्वीकारली. यात प्रामुख्याने कडुलिंब ,कदंब अर्जुन ,पाखड, बेहडा, करंज, जांभूळ,काशीद या वृक्षांची लागवड करण्यात आली. आपल्या लग्नाचा वाढदिवस…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पुणे येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे नुकत्याच झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनात जळगाव येथील कवयित्री पुष्पलता कोळी यांचा मानपत्र व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संमेलन चित्रकाव्य, लेखन स्पर्धा, परिसंवाद काव्यमैफल व प्रकट मुलाखतीने रंगले. महाकाव्य संमेलनाध्यक्ष हास्यकवी अशोक नायगावकरांनी महाकाव्य संमेलनाने कवींच्या प्रतिभेला फुलण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन केले. खान्देशच्या या कलावंतांची व कवी-कवयित्रींची कीर्ती सर्वदूर राहो असे नायगावकर म्हणाले. कवयित्री पुष्पलता कोळी यांनी महाकाव्य संमेलनामध्ये वृद्धाश्रम’ ही कविता सादर केली. चित्रकाव्य स्पर्धेत कुल्फी’ही कविता सादर केली. त्याबद्दल कोळी यांना नायगावकरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. कवी निवृत्तीनाथ कोळी यांनीही आईआणि बाबा’ ही कविता…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीतील बाबा तुलसीदास उदासी यांच्या 39 व्या वर्षी महोत्सवात रविवारी सिंधी समाजातील 56 बालकांवर जनेऊ संस्कार करण्यात आले. धार्मिक विधी प्रमाणे झालेल्या या संस्कारावेळी समाजबांधव उपस्थित होते. सिंधी कॉलनीतील पूज्य बाबा कालिदास उदासी दरबारात वर्षी उत्सवाला शनिवारपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. या महोत्सवात रविवारी सिंधी समाजातील 56 बालकांचे मंत्रोच्चारात जनेऊ (उपनयन) संस्कार करण्यात आले. सुमारे दोन तास हा धार्मिक विधी सुरू होता. यावेळी जनेऊ संस्कार होणाऱ्या बालकांच्या आई-वडिलांसह नातेवाईकांची उपस्थिती होती. या धार्मिक विधीसाठीची संपूर्ण व्यवस्था बाबा तुलसीदास बाबा कालिदास उदासी आश्रमातर्फे करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील तसेच मुंबई,कल्याण, नाशिक, इंदूर, सागर, बऱ्हाणपूर, विलासपूर, कटनी,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड जळगाव आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यामध्ये ’डाळींबाच्या सोलापूर लाल’ या त्यांच्या संशोधित व हायब्रीड वाणाची टिश्‍यूकल्चरच्या सहाय्याने निर्मिती करून देशात प्रसार करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार झाला. डाळिंब केंद्राचे संचालक डॉ.आर.ए. मराठे,जैन टिशू कल्चरचे डॉ. अनिल पाटील व के. बी. पाटील यांच्या करारावर स्वाक्षरी आहेत. डाळिंबाची सोलापूर लाल ही जात किंवा वाण पोषण दृष्टीने उत्तम असून त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते.उष्णतेचा परिणाम कमी होतो. जास्त तापमानात सुद्धा दाण्यांचा रंग चांगला असतो. फळांचा रंग, गंध तसेच आतील दाण्यांचा लाल रंग व उत्तम चव तसेच प्रोटीन, झिंक आणि ’क’…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निळकंठ सुदाम फालक उर्फ पंछी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजेच्या सुमारास तापी नदीकाठी वैकुंठधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वारकरी सांप्रदायाचे बेळी येथील गादीपती ह.भ.प.भरत महाराज, माजी मंत्री तथा आ.संजय सावकारे, माजी आ.निळकंठ फालक, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, पिंटू कोठारी, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, दीपक धांडे, किरण कोलते आदीसह नगरपरिषदेतील नगरसेवक व समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. ते माजी नगराध्यक्षा माधुरी फालक यांचे पती होत.

Read More

जळगाव :  प्रतिनिधी दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजूतीने दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . दरम्यान मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. प्रमिला दिलीप सोनवणे (वय-५७) रा. दापोरा ता.जि.जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रमिलाबाई सोनवणे ह्या दोन मले व सुनांसोबत दापोरा येथे वास्तव्याला आहे. त्या घरकाम व शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १८ मे रोजी दापोरा गावात लग्न होते. बाहेरगावाहून चारचाकी वाहनातून दोन जण लग्नाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी प्रमिलाबाई सोनवणे यांचा मुलगा विजय हा…

Read More

मेष : राशीच्या लोकांनी आज इतर लोकांसोबत राजकारण करू नये. मनात काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि जोश राहील. खाण्यापिण्याच्या व्यापार्‍यांना चांगला काळ आहे. ऑनलाइन व्यवसाय करणार्‍यांना चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे तणावपूर्ण असू शकते. आज ८५% नशिबाची साथ आहे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. वृषभ :  राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आयात-निर्यात संबंधित कामांमध्ये मोठा प्रकल्प मिळू शकतो. तरुणांना नवीन नोकरी मिळू शकते. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बर्‍याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. आज ८२% नशिबाची…

Read More