Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनीधी गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे कलाशिक्षक दत्तू शेळके यांच्या पोनोरोमा या चित्रकला प्रदर्शनाचे पु. ना. गाडगीळ गॅलरीत गोदावरी फौंडेशन सचिव डॉ. वर्षा पाटील व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांच्याहस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. चित्रकला प्रदर्शनात कला शिक्षक दत्तू शेळके यांनी काढलेले निसर्ग चित्र हे खूप मनभावक असे आहे. निसर्गचित्रातील रेखीवपणा आणि प्रत्येक स्ट्रोक हा दत्तू शेळके यांच्या कलेचा उत्तुंग आणि मनस्वी परिचय आहे, असा आभास प्रत्येक चित्र पाहतांना होत असल्याचे डॉ केतकी पाटील म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर गोदावरी फौंडेशन सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ केतकी पाटील, चोपडा येथील माजी प्राचार्य राजेंद्र महाजन, पु ना गाडगीळ अँड…

Read More

साईमत जळगाव प्रतिनीधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दि. १२ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ एप्रिल रोजी माजी सनदी अधिकारी ई झेड खोब्रागडे हे ‘फुले आंबेडकरी विचार प्रवाहातील जाणकारांचे सामाजिक दायित्व’ या विषयावरील परिसंवादात बोलणार आहे. दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर आणि त्यानंतर दुपारी डॉ. घन:श्याम थोरात यांचा प्रबोधनपर गीतगायन कार्यक्रम होईल. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मिरवणूक निघेल आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे ‘आजची तरूण पिढी आणि समाजवास्तव’…

Read More

साईमत जळगाव प्रतिनीधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत नंदुरबार जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या ‘सिलेज बेसड् एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP)’ चा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष व सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू व नियंत्रण समितीची बैठक बुधवार दि. ३ एप्रिल रोजी विद्यापीठात झाली. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या वतीने ‘सिलेज बेसड् एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम (CADP)’ राबविणेसाठी निधी देण्यात आला आहे. खेडी आणि शहरे यांच्यातील दरी कमी करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान वर आधारीत प्रक्रिया म्हणजेच सिलेज. यामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान आणि कामाची संधी ही गावातील क्षमता लक्षात घेवून पर्यावरण पूरक अशी असणार आहे.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनीधी जिल्हा कारागृहातील ३०२ कलमातील न्या बंदीसाठी दिनांक २ एप्रिल रोजी मोफत “आयुष्यमान भारत कार्ड”कॅंप घेण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त जळगांव जिल्हा कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ अधिकारी ग. वि. पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत होते. महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य सुधारणा व पुनर्वसन च्या अंतर्गत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अभिताभ गुप्ता, यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या प्रेरणेने, तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग, नाशिक. यु. टी. पवार यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र कारागृह विभाग व समता फाऊंडेशन, मुंबई याचे संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा कारागृहात कॅंप घेण्यात आला.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमधील इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी तुषीता आकाश सराफ हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ३६व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मुले आणि मुली २०२३-२४ या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. तिला पुरस्कार स्वरुपात कांस्य पदक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याबाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थिनी तुषीता हिचे अभिनंदन केले. ही विद्यार्थिनी याच शाळेतील क्रीडा शिक्षक आकाश सराफ यांची कन्या आहे. यानिमित्त विद्यार्थिनीसह तिचे वडील व क्रीडा शिक्षक सराफ यांचा सत्कार प्राचार्य श्रीधर सुनकरी यांनी केला.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यवसायिक कलावंताच्या तोडीचे आहेत. सदर प्रदर्शनात विशेषत्वाने उल्लेख करावा अशी एक रचना करण्यात आली ज्यामध्ये इयत्ता ९ चे विद्यार्थी रोहन पोतदार, चिन्मय पाटीदार आणि दिव्यांश बेद यांनी पॉटरी माध्यमातून साकारलेली ‘नो ट्री – नो बर्डस्’ (जिथे आधार संपतो, तिथे श्वासही थांबतो) ही इंस्टॉलेशन रचना विशेष उललेखनीय आहे. माती कामातून तयार केलेल्या पक्ष्यांना एका मृत झाडाच्या खोडाजवळ त्यात मृतावस्थेत दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनेनुसार आजकालच्या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मुले सकारात्मक पध्दतीने घडत असतात त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या,अनेकवेळा मुलांच्या कला दाबल्या जातात पालक त्यांना हे करू नको, ते करू नको, अभ्यास कर अहो चित्रकला हा पण अभ्यासाचा भाग आहे.मुलांना रागवू नका चित्रकलेतही आता करिअर असल्याचे चोपडा येथील ललित कलाकेंद्रचे प्राध्यापक संजय नेवे यांनी गुणगौरव सोहळा प्रसंगी प्रतिपादन केले. येथिल पिंप्राळा परीसरातील कलादर्शन ड्राॅईंग क्लासेस तर्फे एलेमेंटरी/ईंटरमिजिएट परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा दि.३१ मार्च रोजी पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी च्या प्रतीमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर एलेमेंटरी / ईंटरमिजीएट परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थाना स्मृतिचीन्ह देण्यात आले. यावेळी कार्यक्रमास ललित कला केंद्र…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पब्लिक स्कूल मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2024 -25 या वर्षाची एक एप्रिल पासून उत्साहात सुरुवात झाली. सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावरच सुंदर व आकर्षक अशी रांगोळी व फुग्यांची कमान बनवण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांनी त्यामधून प्रवेश करतांना त्यांचे औक्षण करून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, प्रतिष्ठानचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गोरे, शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, शाळेचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देशाची तमाशा लोककला येथील लोक परंपरा व लोक साहीत्य व बोली भाषेनी समृध्द अशी लोककला आहे आहे खान्देशाच्या तमाशा परंपरेला शंबर वर्षाचा इतिहास असुन लोकाश्रया वर जिवंत असलेली लोककला काळ ओघात लोप पावत चाललेली आहे खान्देशाच्या तमाशा लोककलेला पुर्नवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर या लोककलेला राजाश्रया सोबतच लोकाश्रयाची गरज आहे असे राज्य शासनाचा स्व विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त खानदेशातील जेष्ठ तमाशा कलावंत भीमा सांगवीकर यांनी केले. शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत जळगाव येथे दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिराचा समारोप जळगाव च्या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव खुर्द येथे नवीन स्वच्छतागृह उभारण्यात आले. ओरिएंट सिमेंट लिमिटेडमधील प्रमुख मान्यवर व गावातील ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वच्छतागृहाचे लोकार्पण करण्यात आले. मागील काही वर्षांपासून ओरिएंट लिमिटेड नशिराबाद कंपनीजवळ असलेले जळगाव खुर्द येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून गावातल्या सर्व आबाल वृद्धांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करून गावात नवीन स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली. यापारसंगी मनोगत व्यक्त करताना रोहित जोशी यांनी सांगितले कि, गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे नैतिक कर्तव्य असून भविष्यात हि असेच समाजहिताचे उपक्रम राबविले जातील. या स्वच्छतागृहाचे लोकार्पण प्रसंगी ओरीएंट सिमेंट कंपनीचे एच.आर. विभाग प्रमुख रोहित…

Read More