साईमत जळगाव प्रतिनिधी
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूलमधील इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी तुषीता आकाश सराफ हिने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ३६व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप मुले आणि मुली २०२३-२४ या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. तिला पुरस्कार स्वरुपात कांस्य पदक, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याबाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थिनी तुषीता हिचे अभिनंदन केले. ही विद्यार्थिनी याच शाळेतील क्रीडा शिक्षक आकाश सराफ यांची कन्या आहे. यानिमित्त विद्यार्थिनीसह तिचे वडील व क्रीडा शिक्षक सराफ यांचा सत्कार प्राचार्य श्रीधर सुनकरी यांनी केला.