साईमत जळगाव प्रतिनीधी
जिल्हा कारागृहातील ३०२ कलमातील न्या बंदीसाठी दिनांक २ एप्रिल रोजी मोफत “आयुष्यमान भारत कार्ड”कॅंप घेण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त जळगांव जिल्हा कारागृह अधिक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ अधिकारी ग. वि. पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थीत होते.
महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रिद वाक्य सुधारणा व पुनर्वसन च्या अंतर्गत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अभिताभ गुप्ता, यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधारसेवा डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या प्रेरणेने, तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग, नाशिक. यु. टी. पवार यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र कारागृह विभाग व समता फाऊंडेशन, मुंबई याचे संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा कारागृहात कॅंप घेण्यात आला.