विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी काढणीवर आलेल्या मका पिकाला वादळी वाऱ्याने मुख्य वीज प्रवाहाची वाहिनी दुसऱ्या वाहिनीला स्पर्शून गेल्याने अचानक झालेल्या शोर्ट सर्किटमुळे दोन आकार क्षेत्रातील मका पिकाला आग लागून शंभर टक्के जळून खाक झाल्याची घटना जरंडी शिवारात उघडकीस आली आहे याप्रकरणी वीज मंडळाच्या महावितरण विभागाकडून घटनेचा पंचनामा केला आहे.या घटनेत शेतकऱ्याचे तब्बल दोन लाख रु चे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मधून हाती आले आहे.मात्र महसूल विभागाने घटनास्थळी अद्यापही भेटी दिलेल्या नाही. सोयगाव परिसरात तीन दिवसापासून वादळी वाऱ्याचे वातावरण तयार झालेले आहे या तीन दिवसात वादळी वारा आणि वावटळ सुरु झाल्या असल्याने या वादळी वाऱ्याने रोहित्राच्या मुख्य वीज वाहिनी दुसऱ्या वीज…
Author: Saimat
भुसावळ : प्रतिनिधी येथील नगरपरिषद हद्दीतील आरक्षित भूखंडाचे आरक्षण रद्द करुन सदर आरक्षण 31 मे पर्यंत मुक्तीचे नोटीफिकेशन जाहीर करावे असे नोटीफिकेशन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नगरपालिकेला दिले आहे. दरम्यान, या नोटीफिकेशन विरोधात नगरपरिषदेने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणे आवश्यक आहे. मात्र, आजवर याबाबत कुठलीही कारवाई होतांना दिसत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश उपाध्याय यांनी एक जागरुक नागरीक म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासंदर्भात आदेश अथवा परवानगी द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. सदर मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अर्जावरील पुढील कारवाईसाठी उपसचिव सतिश मोघे यांच्याकडे अग्रेसीत केली आहे. दरम्यान, नगरपरिषद हद्दीतील आरक्षित भुखंडाच्या संदर्भात उच्च न्यायालयात…
पाचोरा : प्रतिनीधी केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल – डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून ही दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात पाचोऱ्यामध्ये महागाई विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आलीत. पेट्रोल -डिझेल, गॅस, भाजीपाला, खाद्य तेल तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु, आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. म्हणूनच जनतेचे जबाबदारी प्रतिनिधी म्हणून…
जळगाव : प्रतिनिधी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने वाढत्या महागाई विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरची आरती करून आंदोलन केले. पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे आंदोलन करीत मोदी सरकारचा निषेध केला . देशभरात महागाईमुळे त्रस्त झालेली असून नागरिक व सामान्य जनता त्यात भरडली जात आहे. हातावर पोट भरणाऱ्या मोल मजुरी करणाऱ्या वर्गाला तर गॅस महागल्यामुळे अन्न शिजवून खाणे देखील जड झालेले आहे. महागाईमुळे मूलभूत गरजा देखील भागविणे अवघड होत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच असून डॉलरच्या तुलनेत रुपया कमी होत चालला आहे. केंद्र सरकार या सर्वांकडे लक्षच देत नाही. या सर्व अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शहरतर्फे आज दि.२१ रोजी जळगाव…
पाचोरा प्रतिनिधी ” पाचोरा येथील केंद्र सरकारच्या विरोधात पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आलेला आहे यावेळी लॉट गाडीवर गॅस अंडी तसेच चूल मोटर सायकल व लाकडे ठेवून अंत्ययात्रा वर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली निवडणुका आधी भाजप सरकारने आश्वासन दिले होते की पेट्रोल-डिझेल, गॅस भाजीपाला तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही.केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला…
मेष राशी : मेष राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, पण जर तुमच्याकडे कोर्ट-कचेरीशी संबंधित काही प्रकरणे असतील तर त्यामध्ये आज तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. या दिवशी तुमची दाखवून तुम्ही तुमची कामे सहज पूर्ण कराल. कोणतेही ऑनलाइन काम सुरू करण्यासाठी तुम्ही योजना तयार कराल. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. आज ८२% नशिबाची साथ आहे. देवी लक्ष्मीची पूजा करा. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कार्यक्षेत्रात लाभदायक राहील. तुमचे सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. लोकांमध्ये सन्मान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल. प्रमोशनही होऊ शकते. तरुणांना कायमस्वरूपी नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. तरुणांना इच्छित जीवनसाथी मिळाल्याने मन…
लोणार : प्रतिनिधी लोणार तालुक्यातील तांबोळा येथे दिनांक 19 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडा मध्ये पावसाने हजेरी लावली होती यावेळीच तांबोळा येथील गावाशेजारी असलेल्या तीन गाईवर अचानक वीज पडून सदर काही जागीच ठार झाल्या होत्या या घटनेची माहिती लोणार पोलीस स्टेशन, पशुवैद्यकीय अधिकारी व तलाठी यांना देण्यात आली संबंधित अधिकारी यांनी आज 20 मे रोजी तांबोळा येथे येऊन घटनेची पाहणी करून मृत झालेल्या गाई चा पंचनामा केला यामध्ये मधुकर राठोड यांच्या दोन गाईचा मृत्यू होऊन अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले तर अशोक राठोड यांच्या एका गाईचा मृत्यू होऊन अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले…
तालुक्यात खरीप पेरणी साठी शेतकरी राजा सज्ज झाला असून पेरणी पूर्व मशागतीला वेग आला आहे. खरीपाच्या पेरणीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून रख रखत्या उन्हात म्हणजे 44 डीग्री च्या वर असलेल्या तापमानात सुध्दा शेतकरी राजा आपल्या शेतात राबतांना दिसून येत आहे. नांगरणी व रोटा व्हीटर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. इंधन दर वाढी मुळे नांगरणी व रोटा व्हीटर चे दर वाढले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी एकरी तीनशे ते चारशे रुपये वाढलेले आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्वच क्षेत्राला बसणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या अती पाऊसामुळे शेतकऱ्यांना खरीपाच्या हंगामात आतोनात नुकसान सोसावे लागले होते. मात्र जमिनीत पाण्याचा मुबलक…