जळगाव ः प्रतिनिधी महिलांच्या मागणीनुसार वाघनगर परिसरातील कानाकोपऱ्यात पाणी पोहोचण्यासाठी 18.5 किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात येत असून, दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.वाघनगरातील पाणीपुरवठा योजनेत रेट्रोफिटिंगच्या अंतर्गत टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. या जलवाहिन्यांमुळे वाघनगरात वाघूरचे शुद्ध पाणी पोहोचणार असल्याने ग्रामपंचायत आणि परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. या परिसराचा झपाट्याने विस्तार होत असून, विकासकामांसाठी आपण येथील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. गेल्या सुमारे 1 वर्षापासून वाघनगरातील रहिवाशांना वाघूर धरणातील शुद्ध पाणी मिळत असले तरी पुरेशा पाइपलाइनच्या अभावी दूरवरच्या भागांमध्ये पाणी पोहोचले नव्हते. या…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी ओबीसी राजकीय आरक्षण हे सरकारच्या नाकर्तेपणामुळे घालवले गेल्याचा आरोप करत भाजपतर्फे सोमवारी आघाडी सरकारच्या विरोधात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत दुपारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, ओबीसी आरक्षण जरी लागू होणार नसले तरी आगामी निवडणुकीत ज्या जागा ओबीसीसाठी आहेत तेथे ओबीसी उमेदवार देणार असल्याची भूमिकेचा पक्षातर्फे पुनरुच्चार करण्यात आला. ओबीसीप्रश्नी भाजपतर्फे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय महाजन, भरत महाजन, रमेश सोनवणे, भारती सोनवणे,जयेश भावसार,देवेंद्र पाटील, हेमराज कोरडे, गोपाळ भंगाळे,संजय भोळे आदी उपस्थित होते. ओबीसीच उमेदवार देणार ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जरी…
जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे शनिवार दि.28 मे रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित जाहिर व्याख्यानासाठी बंगलोर येथील इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. आलोक श्रीवास्तव आणि सतिशचंद्र वाणी हे जळगावात येत असल्याची माहिती अध्यक्ष कृष्णकुमार वाणी व प्रा. नंदलाल गादिया यांनी दिली. इस्त्रोद्वारे संचालित चांद्रयान-1, चांद्रयान-2, इनसॅट या सारख्या अनेक मोहीमांमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतलेल्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व समोरासमोर प्रत्यक्ष भेटण्याची संधी जळगावकरांना यानिमित्ताने मिळत आहे. खानदेशात प्रथमच अशा प्रकारचे सर्वांसाठी प्रवेश खुला असलेले व्याख्यान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. व्याख्यानानंतर अर्धा तास खगोलशास्त्रीय प्रश्नांसाठी राखीव असणार असून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन रोटरी वेस्टतर्फे मानद…
जळगाव ः प्रतिनिधी ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांना मैदानावर खेळण्यासाठी पाठवावे जेणे करून मानसिक आणि शारिरीक विकास होईल. यश-अपयश पचविण्याची क्षमतासुद्धा विकास होईल. सकस आहार, मैदानी खेळ खूप महत्त्वाचे असून त्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे असे आवाहन मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले. जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा उन्हाळी शिबिराचा (समर कॅम्प) समारोपाप्रसंगी त्याबोलत होत्या. जैन स्पोर्टस अकॅडमीच्या विद्या इंग्लीश स्कूलजवळील मैदानावर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशन स्टिस्टिमच्या वतीने अविनाश जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व्हाईस प्रेसिडेंट एस. टी. खैरनार, सदस्य यूसूफ मकरा, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे उपस्थित…
मेष : आज तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ कुटुंबातील सदस्यांसाठी काढाल आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमचे मित्र तुम्हाला पैशांचा पुरवठा पूर्ण करण्यात मदत करतील. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : आजचा दिवस कार्यक्षेत्रात लाभदायक ठरेल. तुमचे सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. लोकांमध्ये सन्मान मिळेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल. पदोन्नतीचीही शक्यता आहे. आज ९२% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्यावा. मिथुन : आजचा दिवस आर्थिक…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांना रोजगार सेवक या पदावरून कमी करण्याचे आदेश दि.२० रोजी प्रभारी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे बोदवड यांनी नांदगाव येथील ग्रामसेवक व सरपंच यांना दिले आहे. निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये बाबुराव लक्ष्मण निकम व नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी एकाच शेतात दोन विहिरीचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान घेतले होते,परंतु एकाच विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले होते, दुसऱ्या विहिरीचे अंदाजित अनुदान १ लाख ३४ लाटून भ्रष्टाचार केला होता,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन रामा आसने यांनी तक्रार दाखल केली होती,वारंवार…
बोदवड प्रतिनिधी दररोज प्रमाणे चालणारी अवैध गुरे ढोरे वाहतुक चिंतेचा विषय बनलेली आहे. मुक्ताईनगर ते हिंगणे फाटा दरम्यान मृत गुरे-ढोरे सापडण्याचे प्रकार वाढत आहे. हिंगण्या जवळ मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने दि.२१ रोजी नागरिकांनी या मागील प्रकाराचा तपास घेतला.हिंगणे फाटा नजीक असलेल्या महादेव मंदिर परिसराच्या काही अंतरावर १० बैल मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर चेक पोस्ट वरुन अवैध गुरे-ढोरे वाहतुकीचे वाहने दलालांमार्फत पाकिटचोर अधिकाऱ्यांच्या संमतीने सोडली जातात. पुढे मुक्ताईनगर ते हिंगणा फाटा दरम्यान जंगल येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग रात्रीच्या सुमारास सामसूम असतो. अंधार्या रात्रीचा व कोणी नसल्याचा फायदा घेऊन राजस्थान, मध्य प्रदेश येथुन लांब पल्ला गाठत आणुन…
बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील तिस मार खां म्हणून ओळख असलेले ग्रामसेवक संदिप निकम यांच्यावर दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शेलवड येथील ग्रामपंचायतीच्या अपहारात ग्रामसेवक संदिप निकम यांचेसहित माजी सरपंच निलेश माळी यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. यापाठोपाठ सुरवाडे बुद्रुक , विचवा व मुक्तळ या चार ग्रामपंचायतीच्या अनियमितते बाबत ५२ लाख ९४ हजार १८० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांच्या फिर्यादीवरून १४ व १५ वा वित्त आयोगाच्या निधीचा स्वतःच्या फायद्याकरिता तोतयेगिरी व ठगवणुक करुन दस्तऐवज बनावटीकरण केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ४२०,४१९,४०९,४६७,४६८,४६९,४७१ प्रमाणे गुन्हा दि.२२ सकाळच्या सुमारास ९.३० वाजता दाखल झालेला आहे. शेलवड , सुरवाडे बुद्रुक…
यावल (सुरेश पाटील) लग्न समारंभ म्हटले की,मानपान नातेवाईकांचे रुसवे-फुगवे आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतोच. अनेकदा अशा काही कारणावरुन वादही उद्भवतात. मात्र,यावल तालुक्यातील साकळी येथे लग्नात मावस भावाला मान मिळाला नाही.या रागातून संबंधित व्यक्तीने बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे तात्काळ अर्ज पाठविल्याने बालविवाह रोखण्यात आला आल्याची घटना यावल तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज23 मे रोजी यावल तालुक्यातील साकळी येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गोपाळ ज्ञानेश्वर आढाळे (वय 27) याचा विवाह होत असताना. मात्र नवरीचा मावसभाऊ रविंद्र शालिक सोनवणे यांनी यावल येथे महिला व बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे या बालविवाह संदर्भात अर्ज…
यावल(सुरेश पाटील) यावल शहरात विकसित भागात पाणीपुरवठा योजनेचा “फियास्को” झाल्यामुळे पाईप लाईन दुरुस्ती साठी खड्डे खोदून ठेवल्याने तसेच खोदलेले खड्डे तात्काळ बुजविले जात नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,तसेच प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते साफसफाई आणि गटारी साफ-सफाई करण्यासह,ओला व सुका कचरा वाहतूक व त्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेमध्ये मोठा घोळ सुरू आहे याकडे यावल शहरातील काही आजी-माजी नगरसेवकांसह अध्यक्ष तसेच विविध संघटना गप्प असल्याने आणि यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषदेतर्फे पूर्वेकडील विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासह नवीन पाईप लाईन टाकण्यात…