Author: Saimat
मेष राशी : मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस खूप भाग्याचा असणार आहे. नोकरीत प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात लाभाची परिस्थिती राहील. कुटुंबात एखादी शुभ घटना घडेल, तुम्ही त्यात सहभागी व्हाल. दिवस मजेत जाणार आहे. आज असे काही योग देखील घडतील ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमच्या समाधानात वाढ होईल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांचा संपूर्ण दिवस उत्साहात जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. कामात आर्थिक लाभ होईल. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. आज नशीबही तुमची साथ देईल, त्यामुळे तुमचे प्रयत्न…
पाचोरा : प्रतिनिधी राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओ. बी. सी.) मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्यांवर आधारित चरणबद्ध आंदोलन केले जात आहे. यापूर्वी धरणे आंदोलन आणि रॅली प्रदर्शन करण्यात आले होते ,त्याआधारे आज दि. २५ मे रोजी एकदिवसीय “भारत बंद” आंदोलन करण्यात आले. याआंदोनला पाचोऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पाचोरा शहरात सकाळी १० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, रेल्वे स्टेशन रोड, बस स्थानक रोड, भडगाव रोड, जारगाव चौफुली, भारत डेअरी स्टॉप, येथे अत्यावश्यक सेवा वगळता संमिश्र प्रतिसाद दिसुन येत आहे. या आंदोलनासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटनजीक भल्या पहाटे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपासाअंती हत्या झालेला मयत तरुण हा अनिकेत गणेश गायकवाड (राजमालती नगर जळगाव) असल्याचे समजते. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील मयत तरुण हा मालधक्क्यावर हमाली करत असल्याचे समजते. त्याच्याच एखाद्या सहका-याने त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. त्याची हत्या कुणी व का केली याचा अधिक तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मयताच्या हातातील कड्यावरुन त्याच्या नातेवाईकांनी त्याला ओळखले. दगडाने ठेचल्याने त्याची ओळख पटण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान घटनेची माहिती समजताच शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी…
मेष राशी : मेष राशीच्या लोकांची उदार वृत्ती लोकांना खूप प्रभावित करेल. तुम्हाला नवीन दागिने ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. झटपट पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवणार नाही याची काळजी घ्या. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील. विवाहितांना मुलांचे सुख मिळेल. अधिकारी काम पाहून कौतुक करतील. सासरच्यांकडून चांगली बातमी मिळेल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी सहकार्यांसोबत काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून…
यावल ः प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीच्या तिकिटाच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा दर अधिकतम दिडपटीपर्यंत आकारता येईल, असा शासनाचा निर्णय आहे मात्र हा शासन निर्णय धाब्यावर बसवून अनेक खासगी ट्रॅव्हल्सकडून दुपटीपेक्षा अधिक तिकीट दर आकारून प्रवाशांची भरमसाठ लूटमार केली जात आहे. याची तक्रार करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांची नुकतीच भेट घेतली. त्या वेळी त्यांनी तक्रारदारांना आश्वासित करण्याऐवजी जबाबदारी झटकणारे उत्तर दिले. या प्रकरणी परिवहनमंत्र्यांनी परिवहन आयुक्तांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी राज्यातील सर्वसामान्य जनता/प्रवाशांची लूटमार रोखण्यासाठी परिवहन विभागाने ठोस कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू, अशी…
नागपूर : वृत्तसंस्था सुरदेवी परिसरात वडिलांनीच दहा वर्षीय मुलाची गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरदेवी परिसरात घडलेल्या या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे. संतलाल मडावी असे नराधम दारुड्या बापाचे नाव आहे. गुलशन उर्फ गबरू असे मयत दहा वर्ष मुलाचे नाव आहे. मूळचे मध्यप्रदेशातील संतलाल मडावीला दारूचे व्यसन जडले होते. नव-याच्या या व्यसनाला त्रासून त्याची पत्नी घरून निघून गेली होती. आईने घर सोडल्यानंतर गुलशन आणि त्याची बहीण दोघेही संतलालसोबत रहात होते. दारूच्या आहारी गेलेला संतलाल मुलांना नेहमीच मारहाण करायचा. रविवारी, गुलशनने घरी पाणी भरले नाही म्हणून संतलाल यांनी गुलशनला हातबुक्तीने मारहाण केली.…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे गेल्या वर्षी पहिली ते आठवीतील शालेय विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळाला, तोही उशिराने. यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी दोन गणवेश देण्याचे नियोजन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे. जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार 744 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी 9 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शिक्षण विभागाकडून निधी प्राप्त होताच, त्याचे शालेय समितीकडे त्याचे वितरण केले जाणार आहे.राज्य सरकारकडून गणवेशाचा निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात येणार आहे. निधी प्राप्त होताच तो निधी तालुकास्तरावरून संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला पाठवला जाणार आहे.