जळगाव ः प्रतिनिधी कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड जळगाव आणि सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्यामध्ये ’डाळींबाच्या सोलापूर लाल’ या त्यांच्या संशोधित व हायब्रीड वाणाची टिश्यूकल्चरच्या सहाय्याने निर्मिती करून देशात प्रसार करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार झाला. डाळिंब केंद्राचे संचालक डॉ.आर.ए. मराठे,जैन टिशू कल्चरचे डॉ. अनिल पाटील व के. बी. पाटील यांच्या करारावर स्वाक्षरी आहेत. डाळिंबाची सोलापूर लाल ही जात किंवा वाण पोषण दृष्टीने उत्तम असून त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते.उष्णतेचा परिणाम कमी होतो. जास्त तापमानात सुद्धा दाण्यांचा रंग चांगला असतो. फळांचा रंग, गंध तसेच आतील दाण्यांचा लाल रंग व उत्तम चव तसेच प्रोटीन, झिंक आणि ’क’…
Author: Saimat
भुसावळ ः प्रतिनिधी येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निळकंठ सुदाम फालक उर्फ पंछी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजेच्या सुमारास तापी नदीकाठी वैकुंठधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वारकरी सांप्रदायाचे बेळी येथील गादीपती ह.भ.प.भरत महाराज, माजी मंत्री तथा आ.संजय सावकारे, माजी आ.निळकंठ फालक, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, पिंटू कोठारी, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, दीपक धांडे, किरण कोलते आदीसह नगरपरिषदेतील नगरसेवक व समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. ते माजी नगराध्यक्षा माधुरी फालक यांचे पती होत.
जळगाव : प्रतिनिधी दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजूतीने दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . दरम्यान मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. प्रमिला दिलीप सोनवणे (वय-५७) रा. दापोरा ता.जि.जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रमिलाबाई सोनवणे ह्या दोन मले व सुनांसोबत दापोरा येथे वास्तव्याला आहे. त्या घरकाम व शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १८ मे रोजी दापोरा गावात लग्न होते. बाहेरगावाहून चारचाकी वाहनातून दोन जण लग्नाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी प्रमिलाबाई सोनवणे यांचा मुलगा विजय हा…
मेष : राशीच्या लोकांनी आज इतर लोकांसोबत राजकारण करू नये. मनात काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि जोश राहील. खाण्यापिण्याच्या व्यापार्यांना चांगला काळ आहे. ऑनलाइन व्यवसाय करणार्यांना चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणे तणावपूर्ण असू शकते. आज ८५% नशिबाची साथ आहे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. वृषभ : राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आयात-निर्यात संबंधित कामांमध्ये मोठा प्रकल्प मिळू शकतो. तरुणांना नवीन नोकरी मिळू शकते. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बर्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. आज ८२% नशिबाची…
देशात नवीन रोजगार संधींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) २०२१-२२ या वर्षात १ कोटी २२ लाख नवीन रोजगारांची नोंदणी झाली आहे. संघटीत क्षेत्रात एका वर्षात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारकडून रोजगारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात एकूण १ कोटी २२ लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी २०२०-२१ या वर्षात ७७ लाख १० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. २०१९-२० या वर्षात ७८ लाख आणि २०१८-१९ या वर्षात ६१ लाख १० हजार नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. विशेष…
जळगाव (प्रतिनिधी) स्वाती गुप्ता, इंदौर यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. स्वाती गुप्ता यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेंतर्गत फिजिक्स मध्ये ‘इनव्हेस्टिगेशन ऑफ नॅनोपोरस लो-के डायइलेक्ट्रीक थिन फिल्म’ या विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इलेट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. ए.एम.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कबचौउमवि,जळगाव विद्यापीठात शोधनिबंध सादर केला. त्यांच्या यशाबद्दल कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.डी.एस.दलाल यांनी अभिनंदन केले आहे.
फैजपूर: प्रतिनिधी येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर कळमोदा येथे संपन्न झाले. सदरील शिबीरात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीकोणातून रोज सकाळी योग आणि प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले. योग आणि प्राणायाम प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे हे उपस्थितीत होते. डॉ. मारतळे यांनी योग यांचे प्रात्यक्षिक व त्या आसनाचे महत्त्व सांगितले. त्या सोबत प्राणायाम व त्यांचे प्रशिक्षक आणि त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. डॉ. मारतळे यांनी आधुनीक युगात मनुष्याची बदलेली जीवनशैली व त्यातून निर्माण झालेले विकार या बद्दल मार्गदर्शन केले. शरीरातील निर्माण झालेले विकार यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी योग व प्राणायाम हे उत्तम साधन आहे. मनुष्याने योग…
फैजपूर प्रतिनिधी यावल रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वर्ग अ जमीन शेत पोटखराब असलेलं क्षेत्र असल्याने तो पोटखराब दुरुस्त करून लागवडीखाली आणल्यास शेताच्या उत्पन्नात वाढ होईल, शेतीचे कर्ज मिळेल, नैसर्गिक आपत्ती झाल्यास भरपाई मिळू शकते. आपल्या शेताची पोटखराब क्षेत्र दुरुस्त केल्याने किमतीत वाढ होते. पोटखराब क्षेत्र दुरुस्ती मुळे शासनाचा महसूल वाढतो. बागायती असल्यास जास्त लाभ मिळू शकतो. त्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पोटखराब क्षेत्र दुरुस्त साठी जवळच्या तलाठी कार्यालयात अर्ज सादर करावा व सदर च क्षेत्र दुरुस्ती करून लागवडीखाली आणावे असे आवाहन फैजपूर प्रांत कैलास कडलग यांनी केली आहे. यात हंबर्डी जमीन 1.85, शेतकरी 72, मारूळ जमीन 2.55, शेतकरी 49, उंटावद जमीन 0.38,…
चाळीसगांव प्रतिनिधी आज चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळ मीनाक्षीताई निकम यांच्या स्वयंदीप दिव्यांग संस्थेच्या मार्फत आयोजित केलेल्या दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्यात जवळपास ८५ वर आणि वधू यांनी आपला परिचय करून दिला असून चाळीसगाव येथील धुळे रोड बायपास जवळील बालाजी लॉन्स येथे आयोजित मेळाव्यात अनेक विवाह इच्छुक मुला-मुलींच्या परिवारांचे एकमेकांशी बोलणे होऊन लग्न जुळवण्याच्या मार्गावर आलेत आजच्या या धकाधकीच्या जगात चांगल्या सुदृढ तरुण-तरुणींचे लग्न जमण्यात अनेक पालकांना दमछाक होते अशा परिस्थितीत दिव्यांग वधू-वरांचे लग्न जमणे आणि ते होणे ही मोठी कसरत होऊन बसली आहे म्हणून या बांधवांना देखील लग्न जुळवून ते पार पाडणे सुखकर व्हावे यासाठी या…