साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने सामाजिक शास्त्रे प्रशाळा, मानव्य विज्ञान प्रशाळा, भाषा आणि योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणातील इंटर्नशिप बाबत मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी १२९ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, डॉ. जगदीश पाटील, समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपस्थित होते. डॉ. जगदीश पाटील यांनी इंटर्नशिप व ओजेटी यातील फरक स्पष्ट करून करीअर साठी इंटर्नशिप फलदायी ठरणार असल्याचे सांगितले. प्रा. डोंगरे यांनी इंटर्नशिप हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. डॉ.…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील राहिवासी असणारे अक्षय गणेश इंगळे यांनी संशोधन करत सेल्फ लॉकिंग फूटवेयर संदर्भातील लावलेल्या महत्वपूर्ण शोधाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट जाहीर केले आहे. अक्षय इंगळे यांनी व्ही.आय.टी. युनिर्व्हसिटीतून कॅड, कॅम आणि रोबॅटिक्समध्ये एम.टेक. केले असून, सद्यस्थितीत ठाणे येथे जी.एस.टी. विभागात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत असून, शहरातील छाया व गणेश लक्ष्मण इंगळे यांचे चिरंजीव आहेत.
साईमत जळगाव प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात कलेतील विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले जाते. यातून स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ हे प्रदर्शन त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवते. पॉटरी (मातीकाम), आर्ट मेला मधील चित्र, शिल्प, पेटिंग हे एखाद्या व्यावसायिक कलावंताच्या तोडीचे आहेत. सदर प्रदर्शनात विशेषत्वाने उल्लेख करावा अशी एक रचना करण्यात आली ज्यामध्ये इयत्ता ९ चे विद्यार्थी रोहन पोतदार, चिन्मय पाटीदार आणि दिव्यांश बेद यांनी पॉटरी माध्यमातून साकारलेली ‘नो ट्री – नो बर्डस्’ (जिथे आधार संपतो, तिथे श्वासही थांबतो) ही इंस्टॉलेशन रचना विशेष उल्लेखनीय आहे. माती कामातून तयार केलेल्या पक्ष्यांना एका मृत झाडाच्या खोडाजवळ त्यात मृतावस्थेत दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनेनुसार आजकालच्या…
साईमत, जळगाव प्रतिनिधी दुर्गम भागातील नागरिकांना राष्टाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश एस.पी.सैय्यद यांनी केले. शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी ॲड. सतीश परदेशी व प्रल्हाद परदेशी यांचा तृतीय पुण्यस्मरण निमित्त तंट्या भिल झोपडपट्टी भागात नागरिकांना अन्नदान व विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. त्या पसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन शंकर परदेशी, गंगाबाई परदेशी, छाया केळकर यांनी केले. यावेळी वरिष्ठ न्यायाधीश एस.पी.सैय्यद यांनी आपल्या कार्यालया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ॲड. केतन सोनार व विधी सहाय्यक भारती कुमावत, ॲड. ऐश्वर्या मंत्री यांनी…
साईमत पारोळा प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने काल पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी जाहीर केले असून त्याबरोबरच जळगाव लोकसभेचे समीकरण झपाट्याने बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.भाजपाने यावेळी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी डावलून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी संधी दिली असली त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागल्याने त्यांची उमेदवारी पुन्हा रद्द होते की काय,अशीही चर्चा रंगू लागली.आता करण पवार यांची प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उध्दव ठाकरे यांनी घोषणा करताच,स्मिता वाघ यांची उमेदवारी कायम राहिल्यास या मतदार संघात भाजपाला धक्का बसू शकतो,असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे त्यामुळे स्मिता वाघ यांच्याऐवजी करण…
साईमत जळगाव प्रतिनीधी आईईईई बॉम्बे सेक्शन द्वारा दरवर्षी राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शन (टेक्नोवेशन) आयोजित करण्यात येते. हा एक राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट एक्सपो आहे. त्यात व्हीएलएसआय, रोबोटिक्स, सायन्सेस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या थीम असतात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आईईईई टेक्नोवेशन २०२४ या टेक्निकल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, प्रा. दत्तात्रेय सावंत (चेअरमन स्टुडन्ट ऍक्टिव्हिटीज कमिटी, आईईईई, बॉम्बे सेक्शन, मुंबई) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे तसेच अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे(स्टुडन्ट ब्रांच कौन्सिलर), कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (विभाग प्रमुख, AI&DS) आदी उपस्थित होते. कार्यक्रमास प्रा. ज्योती कुंडले (रामराव अदीक इन्स्टिट्यूट…
साईमत जळगाव प्रतिनीधी शहरातील गिरणा पाण्याची टाकी परिसरातील रहिवासी शेठ धनराज फुलचंद ललवाणी (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी केलेल्या संकल्पानुसार त्यांचे देहदान डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आले. शेठ धनराज ललवाणी हे मूळचे शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील मूळ रहिवासी व प्रसिद्ध सराफा व्यावसायिक होते. ते शेंदुर्णी येथील जैन ओसवाल संघाचे समारे २० वर्ष संघपती होते. त्यांनी त्यांचे कनिष्ठ पूत्र कांतीलाल ललवाणी यांना सुमारे ४० वर्षांपूर्वी किडनी दान करून मुलाला जीवनदान (अभयदान) दिले आहे. त्यांनी १० वर्षांपूर्वी संकल्प करून रितसर अर्ज भरून दिलेला होता. ते अतिशय धार्मिक विचारांचे आणि गरजूंना शक्य ती मदत करणारे, म्हणून परिसरात परिचित होते.…
साईमत जळगाव प्रतिनीधी जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या बालगृहे, अनाथाश्रम चालविणे, बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवणे, त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडत असल्याने अनाधिकृत संस्था चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अनाधिकृत संस्था सुरु असून तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करुन त्यावर काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची छायाचित्रे प्रसिध्द करुन बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच समाजातील विविध स्तरावरील नागरीकांना भावनिक आवाहन करून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करीत असल्याचे आढळून येत आहे. अशा अनधिकृत संस्थांचा शोध घेण्याच्या सुचना सर्व पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर बाल न्याय कायद्यातंर्गत कारवाही करण्यात येईल.…
साईमत जळगाव प्रतिनीधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एमआयडीसी भागातील वखार महामंडळाच्या गोदामात उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची तसेच दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी होणार असलेल्या केंद्राची नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवार दि. ४ एप्रिल रोजी पाहणी करत सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शक विविध सूचना केल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतूर्लिकर आदींसह अधिकारी उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जळगाव…
साईमत जळगाव प्रतिनीधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित आयएमआरमधील एमबीएचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी तेजस शिंपी याची ॲक्सिस बँकेत कॅम्पस ड्राइव्हद्वारे निवड झाली आहे. त्याची ही निवड असिस्टंट मॅनेजर पदावर झाली असून, त्याला वार्षिक ४ लाख ४० हजार रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. ॲक्सिस बँकेच्या कॅम्पस ड्राइव्हद्वारे यावर्षी आयएमआरच्या वतीने ८ विद्यार्थ्यांनी टेस्ट आणि ऑनलाइन इंटरव्यू दिले. यात तेजस शिंपी याची निवड झाली असून, अजून दोन विद्यार्थ्यांचे निर्णय बाकी आहेत. याबाबत केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार यांनी तेजसचे कौतुक केले. यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड पुनीत शर्मा यांनी परिश्रम घेतले.