Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी मोफत शिक्षणाचा अधिकार या योजनेनुसार 25 टक्के प्रवेश अंतर्गत 2022-2023 वर्षांकरिता प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. यात जिल्ह्यातील 594 विद्यार्थांचा समावेश आहे. 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करावयाचे असून गुरुवारपर्यंत 346 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहे. दरम्यान,आज शुक्रवारी प्रवेशाची अंतिम मुदत असून आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. यंदा जळगाव जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील 2940 पैकी 2173 विद्यार्थ्यांनीच मुदतीअंती प्रवेश निश्‍चित केला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगावातील पिंप्राळा येथील श्रीराम संस्थानच्या मैदानावर शनिवार दिनांक 4 मे रोजी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मानराज पार्क नजीकच्या श्रीराम मंदिराच्या मैदानावर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या या किर्तनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प. गौ- प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांनी केले आहे.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ‘फाली सारख्या संस्थांच्या माध्यमातून भारतातील भविष्यकालिन शेतीत संशोधनाची दिशा निश्‍चित होत आहे. फालीच्या संमेलनातून युवा शेतकरी, संशोधक आणि नव उद्योजक समोर येत आहे. अशा घटकांना युपीएलसारखे उद्योग शिष्यवृत्ती व लघुउद्योग निर्मितीसाठी मदत करतील असे प्रतिपादन युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी केले. ‘फालीच्या उपक्रमामुळे शेतीकडे नव पिढी वळते आहे. शेतीतील नव संशोधन हे सर्वच उद्योगांसाठी पूरक आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा संकल्प सर्वांनी करायला हवा. आपले कुटुंब आणि आपला परिवार शेतीमय करण्याचा प्रयत्न केला तर देशातील शेतीची प्रगती उत्तम होईल असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन म्हणाले.’ ‘फाली’च्या आठव्या संम्मेलनाच्या पहिल्या सत्राच्या समारोपात मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना मेडल,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 रोजी ब्रह्माकुमारीज्‌ मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाधान आधारित पत्रकारितेने समृद्ध भारत या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील.त्यात वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदि क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील. संमेलनात सहभागासाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र माध्यम समन्वयक, मीडिया प्रभाग यांच्याशी 9850693705 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या माऊंट आबूकडे…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी धनगर समाज उन्नती मंडळ व मल्हार सेना चाळीसगाव यांच्या विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी  होळकर यांची 297 वी जयंती उत्सव मंगळवार दिनांक ३१/५/२०२२ रोजी सकाळी ९ वाजता समाजाचे ज्येष्ठ नागरिक व पत्रकार श्री रमेश  जानराव  व सौ रजनी जानराव यांच्या हस्ते सपत्नीक पुतळा पूजन करण्यात आले . सकाळी ९ वाजता पूजनानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोटर सायकल रॅली काढण्यात आली रॅलीला समाजाचे अध्यक्ष साहेबराव आगोने यांनी पिवळा झेंडा दावून प्रारंभ करण्यात आले यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते . सायंकाळी ५ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे. मिरवणूक सदर बाजार ,आंबेडकर चौक, घाट…

Read More

चाळीसगाव/प्रतिनिधी ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात सामाजिक वनिकरण विभाग व लोकसहभागातून तेरा हेक्टर पडीक ओसाड ग्रामपंचायत क्षेत्रावर टप्याटप्याने पंचविस हजार झाडांचे वृक्षारोपण सामाजिक कार्यकर्ते, जलमित्र, पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांच्या प्रयत्नातून होत आहे. ज्यात वृक्षारोपणाबरोबरच जलसंधारणाचे त्रिस्तरीय उपचारही केलेले आहेत. यात तलाव, रिचार्ज शाफ्ट, झिरपा कुंभ, भैरो कुंभ, सिसिटी हे उपचार करण्यात आलेले आहेत. झाडांना उन्हाळ्यात पाणी देता यावे यासाठी सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंतदादा सोनवणे यांच्या व इतरही दात्यांच्या आर्थिक मदतीने या परिसरात ईलेक्ट्रिक पंपसेट, बोअरवेल व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक पर्यावरणपुरक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. ०१ जून रोजी…

Read More

बोदवड प्रतिनिधी  तालुक्यातील शिरसाळा येथील मिळकत नंबर ३२२ मध्ये राजाराम कोळी यांच्या नावावर ती जागा असतांना त्यांच्या नावावर संजय नवलसिंग पाटील यांनी घरकुल बांधकाम करीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील संजय नवलसिंग पाटील यांचे घरकुल मंजूर झाले असतांना त्यांनी स्वतः लिहून दिले आहे की ही जागा माझी नाही.त्यामुळे त्यांच्या वारसांना ही जागा मिळावी. परंतु असे असतांना सुद्धा संजय पाटील यांच्या नावावर ही जागा झालीच कशी?असा संभ्रम निर्माण होत आहे.एवढेच नव्हे तर शिरसाळा गाव मध्ये अनेक अशा जागा आहेत की ते मागासवर्गीयांच्या नावावर जागा असतांना तिथे इतर समाजाच्या लोकांनी नमुना नंबर ८ ला नावे…

Read More

बोदवड प्रतिनिधी  शहरातील टायगर गृपचे धडाडीचे पदाधिकारी असलेले रंजनसिंग राजपुत यांचे दुर्धर आजाराने तिन महिन्या अगोदर दुःखद निधन झाले. हयात असतांना प्रत्येक वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेत असत. हा वारसा निरंतर चालु राहावा यासाठी त्यांचे मोठे बंधु अजय पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२ रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी भावनिक वातावरणात ८८ दात्यांनी रक्तदान केले. तसेच शहरातील आत्मसन्मान फाउंडेशनच्या मनोरुग्ण निवासी पुनवर्सन प्रकल्पाला मध्ये अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी फोनद्वारे आमदार चंद्रकांत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी खेवलकर , टायगर गृपचे अध्यक्ष तानाजी जाधव,राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांनी संवादातून कार्यक्रमाची प्रशंसा करीत भावपूर्ण श्रद्धांजली दिली.पोलिस निरीक्षक राजेंद्र…

Read More

विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी मुख्य वीजतारेचा शोर्ट सर्किट होवून शेतात घर्षण होवून वीजतारा पडल्याने शेतातील गोडावून सह शेताला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे एक लक्ष,पन्नास हजाराचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी रात्री जंगलीकोठा शिवारात घडली याप्रकरणी महसूल च्या पथकाने रात्रीच या घटनेचा पंचनामा केला असून यामध्ये सदरील शेतकऱ्याचे तब्बल वीस क्विंटल मक्यासह शेतीचे औजारे,ठिबक सिंचन आदी जळून खाक झाले आहे. जंगलीकोठा शिवारात शेतकरी भानुदास ढेपले यांचे गट क्र-८५ शेत आहे यामध्ये त्यांनी उन्हाळी मक्याची लागवड केली होती परंतु मजुरा अभावी कापणी व काढणी रखडल्याने निम्मा मका शेतात तर काही मका कापणी करून गोडावून मध्ये साठवून ठेवला होता परंतु गुरुवारी त्यांच्या शेतात अचानक…

Read More

प्रतिनिधी : कजगाव कजगाव ता.भडगाव येथील सबस्टेशन यार्डा मधील वाढलेल्या गवताला व घानेरीला सबस्टेशन मधील उच्चदाब वीज वाहिनेवर झालेल्या स्पारकीन ची ठिणगी गवतावर व घाणेरीवर पडल्या ने आग लागली सदर घटना विजवितरण च्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच आग ओकत असलेल्या उन्हात लागलेली आग अथक प्रयत्न करत आटोक्यात आणली यात ग्रामपंचायत कर्मचारी देखील धाऊन आल्याने आग विझविण्यासाठी मदत झाली अन्यथा संपूर्ण सबस्टेशन व आजूबाजूचा परिसर ह्या आगीत जळुन खाक झाला असता बाबत सविस्तर माहिती अशी की कजगाव भडगाव या मार्गावर विज वितरण चे सबस्टेशन आहे अत्यंत मोठ्या जागेत हे सबस्टेशन विस्तारले असुन येथेच अभियंता, लाईनमन,ऑपरेटर,सह काहि कर्मचारी साठी एक बिल्डिंग देखील उभी…

Read More