Author: Saimat

ज्येष्ठ उद्योजक आणि ‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (९२) यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवारी) निधन झाले. त्यांच्यामागे राजकुमार, डॉ. प्रवीण, प्रदीप, धन्यकुमार हे चार मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे माजी सभापती विशाल चोरडिया हे त्यांचे नातू होत. हुकमीचंद यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० रोजी नगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. कमलबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिल्ह्यात वास्तव्याला होते. तेथे त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करून विकला. नंतर, पुण्यात हडपसर परिसरात नोकरी करत असतानाच संध्याकाळी घरोघरी फिरुन मसाले विकलेत. मिरची बियाणे विक्री करता करताच हुकमीचंद यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली…

Read More

बोदवड़ प्रतिनिधी शिवसेनेच्या नेत्या दिपाली सैय्यद नावाच्या एका महिलेने भारत देशाच्या महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्ती पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींजी विषयी काही वादग्रस्त विधाने केलीत हे खरंच खूप भयानक आहे जर मोदींना मारायची त्यांची गाडी फोडायची “धमकी” वजा “इशारा” जर या श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात दिली जात असेल तर हा राष्ट्रद्रोह का समजू नये तसेच अश्या लोकांवर गुन्हा दाखल करून कारवाई का होवू नये माननीय नरेंद्रभाई मोदीजी ते कुण्या एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत किंवा एका राज्याचे मुख्यमंत्री ही नाहीत ते संपूर्ण भारत देशाचे नेतृत्व उत्तमरित्या सांभाळणारी एक जबाबदार व्यक्तीमत्व आहेत आणि हे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगातील देशांनाही माहिती आहे. जर…

Read More

अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग-६ वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण 5 दिवस, रस्त्यावर अखंड बिटुमिनस काँक्रिट पेव्हिंगचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पहिल्या दिवशी, 3 जून रोजी,सकाळी सात वाजून 27 मिनिटांनी प्रारंभ झाल्यानंतर, सायंकाळी 6 वाजेपर्यंत, ९ मीटर रुंदीच्या रोडवर, 4000 रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रिटचा टप्पा गाठला. म्हणजेच दोन्ही लेन मिळून 8 किलोमीटरचा टप्पा पार झालेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, रखरखत्या उन्हात, राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे समन्वयक व चमू न थकता, न दमता, हा विक्रम गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करून काम करीत आहेत. अमरावती-अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेचा तडाखा असतानादेखील, महामार्ग बांधकामाचे…

Read More

मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवार यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे  पुजाअर्चा व अभिषेक करत आहेत. नातू आ. रोहित पवार  हे देखील मोठ-मोठ्या लोकांवर वक्तव्य करुन पुढे येत आहेत. तर पवारांचे पुतणे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे, सुप्रिया, अजित की रोहित… यापैकी पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा नेमका उमेदवार कोण? हे पवारांनी घरच्या घरी ठरवून घ्यावे, असा टोला भाजप नेते प्रविण दरेकरांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. रोहित पवारांना दरेकरांचा खोचक सल्ला आ. रोहित पवारांनी नुकतीच आमदार बनून राजकारणाची इनिंग सुरु केली आहे. आपली उंची काय आपण बोलतोय काय याच भान रोहित पवारांनी ठेवाव.…

Read More

विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी दि. 02/06/2022 रोजी मौजे घोसला येथील राखीव वनात काही इसम अवैध शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती वन विभागास मिळाली. सदरील माहितीच्या अनुषंगाने श्री राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव (प्रा.) हे त्यांच्या टीमसह तात्काळ घोसला राखीव जंगलाच्या दिशेने निघाले. सदर ठिकाणी पोहचले असता वनाधिकाऱ्यांना एक अज्ञात इसम पाठीवर रानडुक्कर घेऊन जात असताना दिसला. वनाधिकारी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून आरोपीने रानडुक्कर खाली जमिनीवर टाकून डोंगराच्या दिशेने पळ काढला. दरम्यान आरोपी पळ काढत असल्याचे पाहून वनाधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने त्याला पकडले. सदरील आरोपीस विचारणा केली असता अजून 7 इसम त्याच्या सोबत असल्याची माहिती…

Read More

विजय चौधरी,सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.03 रोजी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता कामाचे शुभारंभ महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले , यावेळेस गावचे प्रथम नागरिक सरपंच चंदाताई शिवदास राजपुत , शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड , तालुका प्रमुख आबा (प्रभाकर)काळे , तालुका संघटक दिलीप मचै राजपुत , शहराध्यक्ष बोडके , माजी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव , युवासेनेचे कुणाल राजपुत , नगरसेवक लतीफ शहा , यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमिपुजन सोहळा संपन्न झाला , यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ , विस्तार अधिकारी साळवे , अभियंता राजगुरू , सहाय्यक तांत्रिक अधिकारी प्रदीप घुंगरे , सचिन…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी भाजपच्या ढोंगी नेतृत्वाचा समाचार घेण्यासाठी येत्या 8 जून रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री ना. उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा होणार असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील सभेत केले. ही सभा ऐतिहासिक होणार असून सभेत मुख्यमंत्र्यांकडून भाजपचा पर्दाफाश होणार असल्याने भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेच्या पूर्व तयारी साठी तसेच भाजपच्या ढोंगी नेतृत्वाची पोलखोल करण्यासंदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची शुक्रवार ( दि.3 ) रोजी सोयगाव शहरात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

भुसावळ : प्रतिनीधी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे मक्तेदार मनवानी हे गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेचे ठेके घेण्याचे काम करीत असून, आपले काम चालावे म्हणून ई. एन. ऑफिस च्या शेजारी तसेच अकाउंट ऑफिस च्या पाठीमागे ” के “टाइप कॉटर मध्ये आपले ऑफिस तयार करून मोठ्या थाटात आपले कामकाज  चालवत होते, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेश तायडे यांनी सदर कॉटर संबंधीची माहिती  माहिती अधिकारात मागताच सदर ठेकेदाराने रेल्वे कॉटर मध्ये नटवलेले आपले आलिशान ऑफिस जमीनध्वस्त  केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन वर्षांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे हद्दीतील अतिक्रमण  रेल्वे कर्मचारी राहत असलेल्या “के” टाइप कॉटर वरती हातोडा चालविला सदर रेल्वे अधिकाऱ्यांनी…

Read More

रावेर प्रतिनिधी  रावेर परिसरात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांना नुकसानीचा फटका बसला असून, जोरदार पावसासह वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मुख्यता केळी बागांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावेळी आज मौजे अहिरवाडी (रावेर) येथे मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसाग्रस्त केळी बागांना परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, तहसिलदार यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले शेतातील पिके दाखवून विदारक परिस्थितीचे कथन केले व शेतकऱ्यांची कैफियत मांडली. यावेळी त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता, पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांना धीर दिला व लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन खा.रक्षाताई खडसे यांनी दिले. यावेळी  महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख श्री.सुरेश…

Read More