जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व मराठासेवा संघाचे जळगांव महानगराध्यक्ष,जलसंपदाचे शाखा अभियंता शिवश्री एच् एच् चव्हाण यांना लघु पाटबंधारे सर्व्हेक्षण ऊपविभाग जळगांव च्या वतीने ३७ वर्षाच्या इमानेइतबारे प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांना ऊपविभागाच्या वतीने एका कार्यक्रमात प्रेमाचा निरोप देण्यात आला.ऊपविभागिय अभियंता सौ.आरती सुर्यवंशी मॕडम यांचे हस्ते सपत्निक श्री व सौ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ऊपविभागिय अभियंता सौ आरती सुर्यवंशी मॕडम, मराठा सेवा संघाचे महानगर सचिव शिवश्री चंद्रकांत देसले ,ऊपाध्यक्ष शिवश्री सचिन पाटील,शाखा अभियंता शिवश्री अशोक देवराज,शिवश्री ऊमेश सपकाळे,व महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवश्री एन टी आढे,यांनी शिवश्री एच् एच् चव्हाण यांच्या अभ्यासात्मक,…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा हौशी रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे के. डी. गावित सैनिकी विद्यालय पथराई येथे स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. त्यात जळगावच्या एकलव्य स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. सोहम कोशेटीने खुल्या गटात रेस वन व रेस टू सुवर्णपदक, आर्यन सोनवणे रेस वन सुवर्णपदक व रेस टू रजत पदक, 14 वर्षे वयोगटात रोहित पाटील रेस वन व रेस टू सुवर्णपदक, 15 वर्षे वयोगटात अर्णव राजकुळे रेस वन व रेस टू कांस्यपदक, 11 वर्षे वयोगटात जितेश शर्मा रेस वन कांस्यपदक, 12 वर्षेे वयोगटात आर्या भालेराव रेस वन व रेस टू कांस्यपदक, 12 वर्षे वयोगटात गीतिका येवले रेस वन व रेस…
जळगाव ः प्रतिनिधी महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. कॅरीबॅगचे उत्पादन, विक्री व वापर करणाऱ्यांवर 1 जूनपासून कारवाई सुरू केली आहे. एमआयडीसीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग तयार करणाऱ्या हिंदुस्तान इंडस्ट्रीजची काल तपासणी करण्यात आली. त्यात साठा आढळून आल्याने कंपनीला सील ठोकण्यात आले आहे. आठवडाभरापुर्वीच व्यावसायीकांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर न करण्याचे आवाहन आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले होते. 1 जूनपासून कारवाईचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्या नेतृत्वात एमआयडीसीतील डब्ल्यू 16 सेक्टरमध्ये जगदीश लिलाराम भारवानी यांच्या हिंदुस्तानइंडस्ट्रीजची तपासणी करण्यात आली. तेथे पथकाला 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्या. त्यांचा नर्सिंग व…
जळगाव : प्रतिनिधी मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, जेष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या वाडःमय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाडःमय पुरस्कार 2022” अमरावती येथील कवी पवन नालट यांना त्यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय` या काव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. तर “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खान्देशस्तरीय वाडःमय पुरस्कार 2022` उषा हिंगोणेकर यांना ‘धगधगते तळघर` व लतिका चौधरींच्या ‘माती` काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. प्राचार्य डॉ. किसनराव पाटील हे साक्षेपी समीक्षक व सर्जनशील साहित्यिक होते. मराठी साहित्य व संशोधन क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे होते.त्यांच्या या योगदानाला स्मरुन प्राचार्य किसन पाटील सरांच्या विद्यार्थ्यांकडून ज्ञानपरंपरा स्थापन करून…
जळगाव : प्रतिनिधी महानगरपालिकेने नुकतेच काँक्रीट टेस्टिंग करिता टेस्टिंग हॅमर हे उपकरण खरेदी केले असून त्याद्वारे काँक्रीट टेस्टिंगची गुणवत्ता तपासणी मक्तेदाराने महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेल्या /सादर केलेल्या देयकानुसार करण्यात येत आहे त्यानुसार काल रोजी सर्वे नं.118गणपती मंदिर ओपन स्पेसमध्ये केलेल्या पेविंग ब्लॉकच्या कामाची तसेच पिंप्राळा येथील गट नं 5/1,5/2 अष्टभुजा नगर ओपन स्पेसमध्ये केलेल्या पेविंग ब्लॉकच्या कामाची गुणवत्ता स्वतः आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी स्थळ निरीक्षण करून केली. यावेळी त्यांचे समवेत शहर अभियंता नरेंद्र जावळे तसेच संबंधित मक्तेदार, प्रतिनिधी हे उपस्थित होते. आयुक्तांच्या सक्त सूचना यावेळी संबंधित शाखा अभियंता व मक्तेदार/ प्रतिनिधी यांना कामासंबंधी कुठलेही प्रकारचे कॉम्प्रमाईज कामात केले जाणार…
जळगाव ः प्रतिनिधी जमिनीची सुपीकता आणि मर्यादा पाहता उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे भविष्यात खूप महत्त्वाचे ठरेल.शेती व्यवसायातून आपली स्वत:ची उन्नती तर साध्य होते परंतु भूकेल्यांच्या पोटाला अन्न देण्याचे काम शेतकरी करतो, त्यामुळे तो जगाचा पोशिंदा ठरतो.भविष्यात शेतीशिवाय सर्वांगिण प्रगती करणे केवळ अशक्य` असा सूर फालीमधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शेतकऱ्यांमध्ये उमटला. जैन हिल्स येथे फालीचे आठव्या संमेलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरवात झाली. याप्रसंगी आघाडीच्या प्रगतीशील शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्सच्या आकाश मैदानावर सुसंवाद साधला. त्यात उमाळे येथील उमेश खडसे, पिंपळगावचे भागवत भाऊराव पाटील, पहुरचे शैलेश कृष्णा पाटील, नायगावचे विशाल किशोर महाजन, अटवाड्याचे विशाल अग्रवाल या शेतकऱ्यांचा समावेश होता.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल परिसरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी करीत एकमेकांना चाकूने वार करत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी बुधवार १ जून रोजी दुपारी परस्परविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, पहिल्या फिर्यादीत शेख तनविर शेख रहिम यांनी म्हटले आहे की, गेंदालाल मिल परिसरातून भावाच्या दुचाकीवरून शेख तनविर हा बुधवार १ जून रोजीच्या रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घरी येत असतांना सरला सुरेश बर्वे या महिलेला दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून आकाश सुरेश बर्वे आणि गोलू सुरेश बर्वे दोन्ही रा. रेणुका माता मंदीर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील महावितरण कंपनीत कंत्राटी महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील महावितरण कार्यालयातील एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे याने विभागातील एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी करत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महिला कर्मचाऱ्यासोबत सन २०१७ ते २०२१ दरम्यान सुरूच होता. असे असतांना १२ मे २०२२ रोजी देखील महावितरण कार्यालयातील एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे याने पुन्हा महिला कर्मचाऱ्याकडे शरिरसुखाची मागणी करत गैरवर्तन केले. मानसिक छळ व त्रास देत तिला कामावरून काढून दिले.…
बोदवड ः प्रतिनिधी संत सावता माळी नवयुवक मंडळाच्या सदस्यांनी येथील विश्रामगृहात आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देताना सभामंडपासाठी निधी देण्याची मागणी केली. लवकरच हा निधी मंजूर करुन आणू असे आश्वासन मिळाले. सांस्कृतिक तसेच लग्न समारंभासाठी बिन शेती गट नंबर 418 मध्ये ग्रामपंचायतीमार्फत जागा मिळालेली आहे. मात्र, ही जागा मोकळी असल्याने तेथे विविध कार्यक्रम होण्यासाठी बंदिस्त सभामंडप आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध मिळावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक नीलेश माळी, आबा माळी, रामधन माळी, विलास माळी, अनिल माळी, अजय माळी, सागर माळी, किशोर माळी, सुरेश माळी, युवराज माळी, अशोक माळी, अशोक माळी,…