मुंबई: प्रतिनिधी सध्या कारागृहात असलेले मंत्री नवाब मलिक आणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार का! याचा फैसला बुधवार ता.8 रोजी होणार आहे. सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) केलेल्या आरोपांमुळे मंत्री मलिक व माजी मंत्री देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात अर्ज करून मतदानासाठी परवानगी मागितली आहे. दोन्ही नेत्यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर ईडीने बुधवारपर्यत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. येत्या 8 जुन रोजी यावर सुनावणी आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी राज्यसभेसाठी मतदान करता यावे म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केले होते. हे दोघे राष्ट्रवादीचे नेते…
Author: Saimat
विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी सोयगाव शहरातील जुना बाजार चौक भागातील कुलूपबंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा शनिवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११.वाजता जबरी चोरी केली होती या मध्ये ७० हजार रुपयांचे दागीने व रोख रक्कम ३० हजार असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. कुटुंबातील सर्व सदस्य लग्नासाठी आळंद ता. सिल्लोड तेथे गेल्यामुळे जुना चौक भागात राहणारे युनूस तुराब शहा यांच्या कुलूप तोडून व कोंडा तोडुन चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती याबाबत रमजान युनूस शहा यांनी सोयगाव ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता सोयगाव पोलीस सहायक निरीक्षक…
जळगाव : प्रतिनिधी ॲम्बीस संगणकीय प्रणालीचे उद्घाटन आज सकाळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस उपअधीक्षक (गृह) संदीप गावित, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक विठठल ससे, पोलीस निरीक्षक श्री. ठोंबे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक(अ.मु.) वसंत कांबळे, पोलीस उप निरीक्षक(अ.मु.) सचिन डोंगरे आदी अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. संगणकीय प्रणालीमध्ये आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, चेहरा (छायाचित्र). डोळ्यांचे बुबुळ हे डिजिटल स्वरुपात जतन करून जुळवण्याची क्षमता आहे. पोलीस ठाणे स्थरावर प्रणाली राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे.…
रायगड : वृत्तसंस्था रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. औत्सुक्याने आणि आदराने हा सोहळा जगभर पाहिला जातो. या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा सोहळा होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात – शिवराज्याभिषेक घराघरांत` ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.आकर्षक विद्युत रोषणाईने रायगड उजळून निघाला आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत कार्यकर्ते व जनतेच्या विश्वासाच्या बळावर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे, अशी गर्जना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पाळधी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. तीस वर्षांच्या कारकीर्दीत कमवलेली जनतेची ताकद आजही माझ्या पाठीशी आहे. संपर्क ही माझी शक्ती आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता व जनता ही माझे सावकार आहे. त्यांचे प्रेम शब्दातीत आहे. आजही 90 टक्के कार्यकर्ते माझ्या सोबतीला कायम आहेत. मंत्रिपद आज येईल, उद्या जाईल मात्र जनतेची साथ कायम राहणार आहे. जनतेची सेवा करताना अनेकांनी आरोप…
प्रतिनिधी : जळगाव आचार्य अत्रे कट्टा ठाणे यांच्या तर्फे दिला जाणारा ‘कृतज्ञता’ पुरस्कार दिव्यांग, अनाथ, आणि वंचित घटकातील तरुणांसाठी पूर्ण वेळ कार्यरत असणारी संस्था दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल व आदिवासी भागातील कार्यबद्दल कृतज्ञता ट्रस्टचे डॉ.राम गोडबोले यांना देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे आणि पितांबरी उत्पादनाचे व्यवस्थापकीय प्रमुख रवींद्र प्रभूदेसाई, आणि कट्ट्याच्या संस्थापिका विदुला ठुसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजात विधायक बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक कार्यात पूर्णवेळ निस्वार्थपणे वाहून घेतलेल्या संस्थाना हा कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला.सन्मान चिन्ह आणि पन्नास हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.संस्थेच्या वतीने मनोबलची दिव्यांग विद्यार्थिनी अमृता सूर्यवंशी, दीपस्तंभचे संचालक शैलेश कोलते, आजीवन सदस्य आनंद…
फैजपूर l प्रतिनिधी एक महिन्यापासून सुरू असलेल्या स्वामीनारायण मंदिरातील मोफत सुंदर हस्ताक्षर शिबिराचा समारोप परीक्षा घेऊन करण्यात आला. या सुंदर हस्ताक्षर परीक्षेत जे टी महाजन मीडियम स्कूल इयत्ता ९ वी चा विद्यार्थी गोपाल नंदकिशोर अग्रवाल याने प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक चेतना नितीन पाटील, तृतीय क्रमांक कल्याणी संदीप चौधरी यांनी मिळविला. या सुंदर हस्ताक्षर रत्नांचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक तथा कथाकथनकार प्रा. व. पू. होले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आजच्या डिजिटल युगात हस्ताक्षराला महत्व असून सुंदर हस्ताक्षर असणे हा माणसाचा एक दागिना, अलंकार आहे. हा अलंकार आपण एक महिन्यात वेगवेगळे पैलू रुपी आकाराने घडवला आहे. हस्ताक्षर रुपी अलंकार आता कायमस्वरूपी…
फैजपूर l प्रतिनिधी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, आमोदा, ता. यावल, जि. जळगाव येथे दोन महिने राहणार आहे. शेतकऱ्याची योग्य ती मदत करणार आहेत. या सर्व टीमचे स्वागत सरपंच श्रीमती हसीना तडवी, उपसरपंच पौर्णिमा राकेश भंगाळे, राकेश भंगाळे (समाजसेवक) पोलीस पाटील तुषार चौधरी, सदस्य राजेंद्र पाटील, माजी सरपंच हेमराज पाटील या मान्यवरांनी केले. ग्रामपंचायतीला भेट देताना ग्रामीण भागात शेती विषयी माहिती गोळा करणे तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत, विविध कीटकनाशक व खतांबद्दल माहिती देणे असे विद्यार्थ्यांचे कार्य राहील. कृषिदुत सौरभ भोस, सौरव बाविस्कर , आशिष भालेराव , कृष्णा बारी, अल्ला साई रवी आणि अलुरी दिनकर उपस्थित…
मेष : काही काळापासून चालू असलेला त्रास दूर होईल आणि घराच्या देखभालीशी संबंधित कामात अधिक लक्ष द्याल. तुमच्या जवळच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या रागावर आणि उत्कटतेवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रलंबित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नोकरीत कामाच्या प्रचंड ताणामुळे थकवा जाणवेल. यासोबतच तुमच्या प्रमोशनची शक्यताही वाढेल. कुटुंबात प्रेम आणि आनंदी सुसंवाद राहील. प्रेमाच्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे असते. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी धन आणि धनाच्या बाबतीत या दिवशी योग्य बजेट केले पाहिजे. तुम्ही केलेल्या कामाचे समाजात आणि लोकांमध्ये कौतुक होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्याऐवजी, आपली उर्जा…