बंगळुरु : वृत्तसंस्था राजकीय पक्षांमध्ये होणारे वाद काही लोकांसाठी नवीन नाहीत. जनकल्याण योजना, धोरणे, न्याय अशा अनेक मुद्यांवर राजकीय नेत्यांमध्ये चर्चा तसेच आरोप-प्रत्यारोप होत असतात पण कर्नाटकमधील एक वाद चक्क अंतर्वस्त्रापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध करण्यासाठी चड्ड्या जाळल्या जातील असे वक्तव्य केले होत. याला उत्तर देताना आरएसएसने काँग्रेस कार्यालयात पाठवण्यासाठी अंतर्वस्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने राज्याचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांच्या घराबाहेर खाकी चड्डी जाळली. राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांच्या कथित ‘भगवीकरणा`च्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यानंतर कर्नाटकातील विरोधी नेते सिद्धरमय्या म्हणाले की, “नॅशनल…
Author: Saimat
जळगाव ः विशेष प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे पूर्व नेते माजीमंत्री तथा सद्य स्थितीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व भाजपचे गिरीश महाजन यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे त्याचप्रमाणे जिल्हा पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचेही खडसे यांच्याशी सख्य नाही.अर्थात महाजन व गुलाबराव दोन्हीही वजनदार नेते खडसेंच्या विरोधात आहेत आणि उल्लेखनीय की, राज्यात भाजप-शिवसेनेची युती नसली तरीही या दोघा नेत्यांचे गळ्यात गळे आहेत हे लपून राहिलेले नाही.याचा परिणाम येत्या जिल्हा दूध संघ,जिल्हा परिषद,पंचायत समित्या तसेच बाजार समित्या व नगरपालिका निवडणुकात होणे निश्चित असून खडसे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या दोस्तीने नवे राजकीय समीकरण होण्याची चिन्हे असून तसे…
मुंबई : प्रतिनिधी एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण तापलेलं असतानाच आता विधानपरिषद निवडणुकांसाठी देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. लवकरच शिवसेनेकडून या दोन नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.त्यात मुंबईचे सचिन अहिर यांचा समावेश असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे. सचिन अहिर यांचे पुनर्वसन? 2019च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पाणी सोडणारे सचिन अहिर यांचे नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या माध्यमातून सचिन अहिर यांचे शिवसेनेकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा देखील अंदाज बांधला…
पहूर,ता.जामनेर प्रतिनिधी(विठ्ठल चव्हाण)- येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथील ग्रामपंचायत हद्दीतील इलेक्ट्रिक खांब तसेच हायमास्ट लँप वरील पथदिवे हे गेल्या २ वर्षापासून बंद आहेत.यामुळे गावात रात्रीच्या वेळी अंधार राहत असून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे. याबाबतीत सविस्तर माहिती अशी की,पिंपळगांव कमानी,ग्रामपंचायत हद्दीमधे हायमास्ट लँप(पथदिवे) सह एकूण २०-२२ इलेक्ट्रिक खांब आहेत त्यापैकी फक्त ३ खांब्यावरील पथदिवे सुरु असून बाकी सर्व बंद अवस्थेत पडले आहेत.याविषयी राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे माजी प्रदेशाध्यक्ष तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,ग्रामपंचायत चे उपसरपंच-संदिपभाऊ राठोड,ग्रामपंचायत सदस्या-अनुसया चव्हाण,कैलासभाऊ चव्हाण,यांनी येथील ग्रामपंचायत चे सरपंचसाहेब यांना या दिव्यांची दुरुस्ती कधी करणार हे विचारले…
यावल (सुरेश पाटील) अविज पब्लिकेशन कोल्हापूर व इन्मा गॅलॅक्सि पूणे व बँको यांच्या तर्फे लोणावळा येथील हॉटेल रेडीसन येथे चंद्रकांत बाळकृष्ण वाणी (सी. ई. ओ. श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लि. यावल )यांना बॅको ब्लू रिबन 2021 ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मध्ये प्रथम क्रमांकाच्या पूरस्काराने रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सी.जी एम काळे साहेब(मूंबई)बँकोचेअविनाश शिंत्रे गुंडाळे (कोल्हापूर)नाईक (पूणे) यांच्या हस्ते बँकेला सन्मानित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत बँकेच्या संचालक मंडळाने दिली. मंगळवार दि.7 जून 2022 रोजी यावल येथील बँकिंग क्षेत्रात सुरक्षित आणि मजबूत असलेली श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लिमिटेड यावल संचालक मंडळ व बँक मॅनेजर यांच्यातर्फे पत्रकार परिषद…
मुंबई :प्रतिनिधी एकीकडे राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकींसाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून कोणते उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवावे याकरिता चाचपणी सुरु झाली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषद उमेदवारीवर चर्चा करण्याकरिता काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भांत चर्चा झाल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचा कोणता नेता उतरवावा…
मेष राशी : मेष राशीच्या लोकांचे भाग्य तुमच्या सोबत आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील आणि प्रभाव व वैभवात वाढ होईल. व्यापार्यांसाठी नफ्याची स्थिती आहे. आज ७६% नशिबाची साथ आहे. हनुमानाला चोळ अर्पण करा. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांनी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटेल. व्यवसायात समजूतदारपणाने काम केले तर अडचणी सुकर होतील. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. राजकीय बाबी पक्षात सोडवता येतील. कौटुंबिक सुख चांगले राहील. मुलाकडे लक्ष…
भडगाव प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या लोनपिराचे येथील विकास सोसायटी ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली लोन बोदर्डे घुसर्डी बोरणार आदी गावातील शेतकरी ह्या सोसायटीत सदस्य आहेत बिनविरोध झालेल्या सदस्यांमध्ये सोमनाथ पाटील पंढरीनाथ पाटील दीपक पाटील संतोष पाटील भीमराव पाटील रायचंद परदेशी प्रदीप पाटील भाऊसाहेब पाटील सुरेश खैरनार अरुणाबाई पाटील सरस्वताबाई पाटील प्रभाकर पाटील विठ्ठल पाटील आदींची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे सदरील निवड बिनविरोध करण्यात आल्याने सर्व संचालकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले यावेळी रवींद्र पाटील भिला पाटील सतीलला पाटील गोकुळ पाटील नाना पाटील वाल्मिक पाटील नंदकिशोर पाटील विजय पाटील राजेंद्र पाटील भीमराव पाटील सुरेश…
मुंबई – प्रतिनिधी राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढायला लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.७) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली. यावेळी मास्कसक्तीबाबत सध्या कुठलाही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोविडबाबत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागामार्फत आपण संपूर्ण माहिती देतो. नेहमीप्रमाणं आजही याचं प्रेझेंटेशन झालं. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पॉझिटिव्हीटी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळं चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना आज कडक पद्धतीनं देण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्हीटी रेट सहा जिल्ह्यांमध्ये खूपच जास्त झाला आहे. ८ टक्के, ६ टक्के असा…