जळगाव : प्रतिनिधी साईमत मीडिया प्रा.लि.च्या संचालकपदी सुप्रिया परेश बऱ्हाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. सुप्रिया परेश बऱ्हाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी साईमतच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात केक कापून त्यांना साईमत परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संपादक प्रमोद बऱ्हाटे यांनी सुप्रिया बऱ्हाटे यांची साईमत मीडिया प्रा.लि.च्या संचालकपदी नियुक्तीची घोषणा करून त्यांना वाढदिवसाची अमोल भेट दिली. तसेच त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान केले. याप्रसंगी लोकहित दर्पणच्या संपादिका सुरेखाताई बऱ्हाटे, साईमत मीडिया प्रा.लि.चे संचालक परेश बऱ्हाटे, तुळशीदास येवले, रत्ना येवले साईमतचे व्यवस्थापक सुनिल अहिरे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे, यांच्यासह साईमत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. या…
Author: Saimat
बोदवड: प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल साठी ग्रामपंचायत ने लावलेल्या यादीनुसार व ग्रामसभेच्या ठरावानुसार घरकुल मंजुरीसाठी जि. प. सदस्या वर्षाताई पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील. आणि जलचक्र बु.ता बोदवड सरपंच पंढरी शिरोळे, उपसरपंच सुमनबाई मुलतानी, सदस्य देवानंद सुरवाडे,मंदाबाई चव्हाण, गजानन पवार, विजय सपकाळ, सुनीता पाटील, विजय सपकाळ, तसेच लाभार्थी यांनी आज सकाळ पासून पंचायत समिती कार्यालयसमोर उपोषणास प्रारंभ केला आहे.
मेष राशी : मेष राशीच्या लोकांना आज चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदार्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय आणि नोकरीत चांगले काम होईल. नोकरीत प्रगती होईल आणि लाभाच्या संधी उपलब्ध होतील. पोस्ट इफेक्ट देखील वाढेल. व्यापार्यांसाठी नफ्याची स्थिती आहे. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ७५% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा. वृषभ राशी : आज वृषभ राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. आज तुमचा संपूर्ण दिवस उत्साहात जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या कौशल्याने आणि समजूतदारपणाने तुम्ही कामे चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. आज अचानक व्यवसायात…
कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव सध्या ऊस उत्पादक शेतकरी हे आपल्या शेतातील उभा ऊस पाहून चांगलेच वैतागले आहेत कजगाव सह परीसरातील अनेक शेतात ऊस अजूनही पडून आहे उभ्या उसाला कारखाना विचारीत नसल्याने हा ऊस आता नेमका काय करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे कारखान्याने ऊस उचलण्यात आखडता हात घेतल्याने परीसरातील अनेक शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत दिसून येत आहे वेळोवेळी विनंती करूनही कुठलाच साखर कारखाना हा ऊस घेण्यास तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना लाख मोलाचा ऊस आता पशूंना देण्यावाचून दुसरा पर्याय नाही तर अनेक शेतकऱ्यांनी घरीच उसाची कटाई करून ऊस जनावरांच्या स्वाधीन केल्याचे दिसून येते त्यामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक…
विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी दि. 02/06/2022 रोजी मौजे घोसला येथील राखीव वनात काही अज्ञात इसम शिकार करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची गुप्त माहिती वनविभागास मिळाली होती. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ त्यांच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सापळा रचून 8 जणांना रानडुकराची शिकार करताना रंगेहात पकडले. त्यानंतर सदरील आरोपींना अटक करून दिनांक 03/06/2022 रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता पुढील तपासासाठी मा. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची वनकोठडी सुनावली. दि. 06/06/2022 रोजी त्यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीकरीता मा. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सशर्त जमीन मंजुर केला आहे परंतु आरोपींनी अटी व शर्तीचे पालन न केल्याने त्यांची हर्सूल…
विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी छायाचित्रओळी-सोयगाव घरफोडी प्रकरणातील आरोपींना पोलिसांसोबत,दुसऱ्या छायाचित्रात आरोपींकडून हस्तगत केलेले कुलूप तोडीचे साहित्य. सोयगाव शहरातील जुना बाजार चौकात भरदिवसा झालेल्या जबरी घरफोडीत पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करून मंगळवारीही दुसरा आरोपी सराफा दुकानदार यास मंगळवारी शिताफीने अटक केली असून दोघांना मंगळवारी सोयगाव न्यायालयासमोर हजे केले असता,त्यांना गुरुवारपर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरम्यान सोयगाव घरफोडी प्रकरणाचे धागेदोरे शेंदुर्णी ता.जामनेर येथेच आढळून आल्याने सोयगावात खळबळ उडाली आहे.सोयगाव शहारापासून हाकेच्या अंतरावर शेंदुर्णी हे मोठे बाजारपेठ म्हणून गाव आहे याच गावात सोयगाव शहरातील जबरी घरफोडीचे धागेदोरे सोयगाव पोलिसांना हाती आले आहे. शेंदुर्णी ता,जामनेर गावातून सोमवारी संदीप गुजर यास…
-सत्ता स्थापनेवेळची रणनीती पुन्हा अमलात, अपक्ष आमदारांची साथ मिळवण्यात यश -राज्यसभेच्या चारी जागा निवडून येण्याचे स्पष्ट संकेत ;ट्रायडंट हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन प्रतिनिधी । मुंबई दाेन वर्षापूर्वी राज्यात तीन पक्षांच्या सरकार स्थापनेवेळी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या आमदारांची एकजूट करण्याची रणनीती आखली होती, त्याचपद्धतीने मंगळवारी (ता.७) राज्यसभा निवडणुकांसाठी एकजूट दाखवण्यात आली. अपक्ष व छोट्या पक्षांचे १३ आमदार आज ट्रायडंट हॉटेलमध्ये आघाडीने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे शुक्रवारी (ता.१०) होत असलेल्या सहा जागांच्या निवडणुकीत आघाडीचे ४ सदस्य राज्यसभेवर बिनदिक्कीतपणे निवडुन जाणार असे स्पष्ट संकेत दिसत आहेत. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील व निवडणूक प्रभारी मल्लिकर्जून खर्गे…
जळगाव ः प्रतिनिधी एमआयडीसीतील नेहा प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये उत्पादीत पिशव्यांची जाडी मोडण्याच्या पध्दतीवरून काल मनपा प्रशासनाविरूध्द मालक असा दोन तास वाद झाला. मायक्रॉन कशा पध्दतीने मोजावे यासाठी जळगाव, नाशिकपासून थेट मुंबईपर्यंत मार्गदर्शन घेण्यात आले. अखेर पिशव्यांची एका बाजूची मोजणी केली जाते हे स्पष्ट झाल्यानंतर कंपनीला सायंकाळी 7 वाजता सील ठोकण्यात आले तसेच मालकाला 10 हजारांचा दंड करण्यात आला. महापालिका पथकाकडून सध्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. 1 ते 6 जून या सहा दिवसांत तीन कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी जप्त केलेला माल सील बंद गोडावूनमधून हलवण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने आयुक्त विद्या गायकवाड…
जळगाव : प्रतिनिधी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यात सुरुवातीला गोंधळ गीत, शौर्यनृत्य, दांडपट्टा व कवायतींचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमात सादर करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यातर्फे सोमवारी शिवतीर्थ मैदानात शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने शिवजयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, करीम सालार, मुकुंद सपकाळे यांनी मार्गदर्शन केले. अनिता चौधरी यांच्या शिष्यांनी शौर्यगीत, शेखर कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी यांनी दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी आमदार राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, प्रतिभा शिरसाठ, अनंत जोशी, पुरुषोत्तम चौधरी,…
जळगाव ः प्रतिनिधी थॅलेसिमियाग्रस्त चिमुकल्यांची 40 चित्र प्रदर्शित झाली आहेत. ती कला संजीवनी चित्रप्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. भाऊंच्या उद्यानातील वानखेडे कला दालनात 10 जूनपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. केशव स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे, असे डॉ. सई नेमाडे यांनी सांगितले. कोसला फाउंडेशनने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.व्यासपीठावर डॉ. राधेश्याम चौधरी, डाएटचे माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड, चोपडा येथील कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन उपस्थित होते. सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपक्रम आहेे. थॅलेसेमिया रुग्णांवर कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. सई नेमाडे यांच्यासोबत आपण सर्वांनी या आरोग्य…