Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी पॉपुलर फ्रंट या संघटनेवर ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात संघटनेतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ईडीने संघटनेचे देशभरातील सर्व बँक खाते अनिश्चित काळासाठी गोठविली आहेत. याचा निषेध करण्यात आला. गेल्या काही वर्षात संघटनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केंद्र शासनाकडून केला जात आहे. त्याचाच हा एक भाग असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ईडीने पॉपुलर फ्रंटच्या बँक खात्याचा मागील 13 वर्षांची तपासणी केली आहे. ज्यामागे संघटनेला टार्गेट करणे हा हेतू असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे. पॉपुलर फ्रंट लोकशाहीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या सर्वांनी भाजपा नेतृत्वातील केंद्रातील सरकारच्या लोकशाही विरोधी कृतीचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी झाकी पटेल, तनझीर सैय्यद, दिलनवाज…

Read More

चंदीगड : वृत्तसंस्था देशात पुन्हा एकदा घातपात घडविण्याचा कट आखण्यात आला होता मात्र हा कट सुरक्षा यंत्रणा आणि रेल्वे पोलिसांनी उधळून लावला आहे. पंजाबमध्ये रेल्वे पटरी उखडून टाकणाऱ्यांचा कट फसला. एकाच रात्री पटरीच्या 1200 क्लिप गायब करुन अपघात घडवण्याचा प्लान होता परंतु सुरक्षा यंत्रणांकडून मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. पटियालाच्या प्लांटमध्ये कोळसा पुरवठा करणाऱ्या रेल्वेची पटरी उखडण्याची योजना होती. जेणे करुन कोळसा विद्युत प्रकल्पाला पोहोचू नये म्हणून हा सगळा कट आणख्यात आला होता.जर पटरी उखडून टाकली असती तर प्लांटला वेळेत कोळसा मिळाला नसता आणि मोठ्या प्रमाणात वीजेची टंचाई झाली असती पण, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा कट उधळला…

Read More

इस्लामाबाद : वृत्तसंस्था सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. असे असताना आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची येथे अफवा पसरली आहे. या चर्चेनंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या इस्लामाबाद येथील बनी गाला या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे येथील पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी इस्लामाबाद येथील बनी गाला या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच…

Read More

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे. कारण जवळपास 55 स्टार कलाकार पाहुण्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. करण जोहर याच्या पार्टीत कोरोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 55 बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूडमध्ये हादरा बसला आहे. मुंबईतील अंधेरी वेस्ट येथील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये करण जोहर याने त्याचा 50 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.हृतिक रोशन, शाहरुख खान , कतरिना कैफ , कियारा अडवाणी, जान्हवी कपूर , मलायका अरोरा, करीना कपूर यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील करणच्या अनेक जवळच्या मित्रांना पार्टीनंतर कोविडची लागण झाली…

Read More

लोणार/शेख गुलाब लोणार येथे भारतीय जनता पार्टी कडुन लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष बाप्पू देशमुख व डॉ.गणेश दादा मांन्टे,सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष प्रा.गजानन घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांनी आपले पूर्ण जीवन संघर्षमय परिस्थितीतून प्रवास करून सामान्य व्यक्तीला न्याय कसा मिळेल यासाठी त्यांनी आपले पूर्ण जीवन समर्पित केले.आपलं पूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले, तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. यासाठी सर्वसामान्य जनतेने त्यांना…

Read More

विजय चौधरी,सोयगाव प्रतिनिधी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या महाराष्ट्रभर सुरु असलेल्या निवडणुकीतील • मतपत्रिका नाशिक जिल्ह्यातील आहे. ती विविध भागातून गायब होत असल्याचा प्रकार सिन्नर पोलिसांच्या मदतीने मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांनी उघडकीस आणला आहे. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलची निवडणूक प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरु झाली असून राज्यभरातून ३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. यासाठी राज्यातून २ लाख ८५ हजार मतदार बॅलेटपेपर द्वारे करणार मतदान करत आहे. फार्मसी कौन्सिलद्वारे मतदारांना पोस्टाद्वारे बॅलेट पेपर पोहोच केले जात असून दिनांक २३ मे ते १७ जून दरम्यान मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत दरम्यान, पोस्ट ऑफिसमधून प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांचे बॅलेट पेपर परस्पर गायब होत…

Read More

विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी पोलीस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे. जिल्हा आणि शहरी भागात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार (कॅम्पस)’ संकल्पना राबविण्यात आली पाहिजे. या अंतर्गत रगिंग, छेडछाड, विनाकारण त्रास देणे, अत्याचार अशा गोष्टींना प्रतिबंध बसू शकेल. प्रत्येक आस्थापनेत विशाखा समितीची स्थापना व्हावी. महिला दक्षता समित्यांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात याव्यात, दामिनी पथकांच्या पोलिसांना वारंवार रिफ्रेशर प्रशिक्षणे द्यावीत, दक्षता समित्यांच्या संवेदनशील सदस्यांना पीडित महिलांच्या संपर्कात राहायला सांगून समुपदेशन व धीर द्यावा असे निर्देश आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस प्रशासनास…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी असो किंवा कौटुंबिक आनंद, आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. आज मूड चांगला राहणार आहे, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा आज तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. आज कमाई देखील वाढणार आहे. कुटुंबाच्या गरजांची पूर्ण काळजी घ्या. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. तुम्ही दिवसभर आनंदी राहाल, आज तुम्ही कुटुंब…

Read More