Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील भोकर आणि पिंप्राळा महसूल मंडळातील 21 गावांना 9 आणि 10 जून रोजी आलेल्या वादळी वारे व पावसाने दिलेल्या फटक्यामुळे सुमारे 2091 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात बहुतांश केळीचे क्षेत्र आहे. या नुकसानीची आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अनेक शेतकर्यांना आपल्या व्यथा-वेदना सांगतांना अश्रू अनावर झाले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली. अलीकडच्या काही वर्षांमधील सातत्याने होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात तरी शेतीच्या व्यवस्थापनाचा पॅटर्न बदलण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. या संदर्भातील माहिती अशी…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी यावल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण 11 प्रभागासाठी 23 पालिका सदस्य निवडले जाणार असून त्यासाठी आज सोडतद्वारे आरक्षण निश्‍चित करण्यात आले. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती जमातीसाठी प्रभाग 2 व 5 तसेच अनुसूचित जमातीसाठी प्रभाग 3 व 11 मध्ये आरक्षण ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारण 19 जागा असून त्यात 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील प्रभागनिहाय आरक्षण असे – प्रभाग क्र. 1 अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 अ – अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. 3 अनुसूचित जमाती (महिला), ब- सर्वसाधरण, प्रभाग क्र.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ओपन ड्रग्ज प्रकरणात अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टार्सची नावे समोर आली आहेत. आता या यादीत सिद्धांत कपूरचे नाव जोडले गेले आहे. बंगळुरूमध्ये छापा टाकून बंगळुरू पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. “ड्रग्स सेवनात दोषी ठरलेल्या 6 लोकांमध्ये सिद्धांत एक आहे. हे सर्व लोक बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये होते, जिथे ही पार्टी सुरु होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून छापा टाकला”, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी…

Read More

महाविकास आघाडीने उमेदवार उभा केल्यानेच भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. धनंजय महाडिक यांचा विजयही झाला. या निवडणुकीत अपक्षांची मते ही भाजपच्या पारड्यात पडली असून त्यामुळे महाविकास आघाडीचा मोठा अपमान झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडले पाहिजे ‘उद्धव ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल राज्यसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते रविवारी मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी…

Read More

​मेष राशी: आज मेष राशीच्या लोकांची साथ राहील. आज कामात तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्यातील बोलण्याची कला तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या कामात यश मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. आज ८१% नशिबाची साथ आहे. गरजू लोकांना मदत करा. ​वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चपळतेचा असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय राहील. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी व्हाल. मनाला आनंद होईल. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. प्रेमसंबंधात…

Read More

मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार. मायक्रोसॉफ्ट कंपनीने २०१६ पासूनच इंटरनेट एक्सप्लोरर अपडेट करणे थांबवले आहे. यानंतर १७ ऑगस्ट २०२१ रोजी ‘मायक्रोसॉफ्ट ३६५’ने (Microsoft 365) आणि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मायक्रोसॉफ्ट टीम्सने (Microsoft Teams) इंटरनेट एक्सप्लोररला तांत्रिक मदत देणे थांबवले. आता १५ जून २०२२ रोजी इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर औपचारिकरित्या कायमचे बंद होणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर बंद होत असल्यामुळे सोशल मीडियावर इंटरनेट एक्सप्लोरर संदर्भात आठवणी सांगणाऱ्या पोस्टचा पूर आला आहे. मायक्रोसॉफ्ट एग्ज (Microsoft Edge) या नव्या वेब ब्राउझरसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी…

Read More

जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यात सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक हा सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला प्रक्रियेला सुरू झाली दोन गटात काट्याची लढत असून महा विकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनल तर विरोधात भाजपाचे शेतकरी विकास पॅनल अशा दोन पॅनल मध्ये ही एक आस एक लढत असून तेरा जागेसाठी 26 उमेदवार रिंगणात आहे. आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण आठशे अकरा मतदार मतदारांपैकी 380 मतदान शांततेत पार पडले.

Read More

नाशिक  प्रतिनिधी मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 108 रुग्णवाहिका ( 108 Ambulance ) चालकाने एका मृतासह एका जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेत रुग्णालयात दाखल केले होते, सदर रुग्णाचे पडलेले दागिने रुग्णवाहिका चालकाने पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की (दि.२ ) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर हॉटेल सयाजी पॅलेस समोर स्विफ्टकार व ट्रक मध्ये जोराची धडक होऊन मोठा अपघात झाल्याने आडगाव नाका पंचवटी येथे 108 रुग्णवाहिकेवर कर्तव्यावर असलेले डॉ. दानिश शहा, व चालक नारायण जेजुरकर यांनी जखमी व्यक्तीला औषधोपचारासाठी आडगाव नाका येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते व मयताला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान (दि. 9) रुग्णवाहिका…

Read More

फैजपूर l प्रतिनिधी येथील रथगल्ली येथील रहिवासी सौ. मीनाक्षी किशोर सितापुरे(राणा) ( वय – ६३) यांचे दि. ११ जून २०२२ रोजी हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. ते किशोर सितापुरे  यांच्या पत्नी व हितेश सितापुरे (राणा)यांचे आई होत.

Read More

चाळीसगांव प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहज जलबोध अभियानाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून त्यात जळगांव जिल्हा समन्वयक म्हणून गेल्या चार वर्षांपासून चाळीसगांव परिसरात जलमित्र परिवाराच्या माध्यमातून पाणी, पर्यावरणासाठी तसेच सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती चळवळीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विषमुक्त अन्न मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेले शशांक अहिरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शशांक अहिरे हे सहज जलबोध अभियानात अगदी सुरुवातीपासूनच जलसाक्षरतेच्या प्रसारासाठी निसर्गरक्षक म्हणून सक्रियपणे सहभागी आहेत. या घोषणेतून पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आणि केंद्रीय भूजल विभागात कार्यरत ज्येष्ठ भूजलवैज्ञानिक आणि सहज जलबोधकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रास सुपरिचित उपेंद्रदादा धोंडे यांच्या जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत समाजात जनजागृतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनी पुढचा टप्पा गाठला आहे.…

Read More