फैजपूर ता यावल l प्रतिनिधी पंतप्रधान ना. नरेंद्र जी मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या केंद्र सरकारची यशस्वी आठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरसेवा, सुशासन, गरिबांचे कल्याण या पर्वाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यंत्री देवेंद्रजी फडणवीस ,भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून माजी मंत्री आ गिरीशभाऊ महाजन,भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेषदादा पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्यासह सर्व जिल्हाभरातील पक्षाचे सर्व आमदार प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले. जळगाव जिल्हा युवा मोर्चा च्या माध्यमातून…
Author: Saimat
फैजपूर l प्रतिनिधी येथील विद्यानगर मधील रहिवासी तथा म्युनिसिपल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत हिरामण भिरुड (वय -७२ ) यांचे दि. ११-६-२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले, एक सून व नातू असा परिवार आहे.
चाळीसगांव प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष,व जेष्ठ पत्रकार किसनरावजी जोर्वेकर यांना फोनवर आमदार मंगेश चव्हाण यांनी “आयुष्यातून उठवून टाकेल” अशी एकप्रकारे जीवे मारण्याची धमकी दि.८जून रोजी दिली, त्याबाबतची ऑनलाइन तक्रार जोर्वेकर यांनी पोलिस स्टेशन येथे दिली असून सोशल मिडियाद्वारे ती आम्हा सर्वांना ज्ञात झाली आहे, मागील काळात मुख्यमंत्री महोदयांना अपशब्द वापरनारे आमदार एका जेष्ठ पत्रकारांना आशा प्रकारची धमकी देत असतील तर,समाजात सदर घटनेचा मोठ्याप्रमाणावर निषेध व्यक्त होत आहे , या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कायदेशीर कार्यवाही करावी.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले. यावेळी जि.प गटनेते शाशीभाऊ साळुंखे,अतुलदादा देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,शहर अध्यक्ष शाम…
नाशिक प्रतिनिधी धावपळीची जीवनशैली, वाढत्या जबाबदाऱ्या आणि ताणतणावामुळे बहुतांश व्यक्ती स्वतःच्या आरोग्याकडे,व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करतात.स्वतःची अशी एक स्पेस असते हेदेखील विसरून जातात. जीवनाच्या एका टप्प्यावर याची जाणीव होते आणि आपण काही गोष्टी गमावल्याची भावना मनात तयार होते.विशेषकरून महिलांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक प्रमाणात घडते. घरातल्या जबाबदाऱ्या,कुटुंबाची देखभाल,नोकरीतले ताणतणाव आदी गोष्टींमुळे महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात.परंतु,ही गोष्ट भविष्यात महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते,असे प्रतिपादन फिटनेस तज्ञ सई संघई यांनी व्यक्त केले. स्वतःकडे दुर्लक्ष झाल्यानं भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करता येणं शक्य आहे. महिलांनी स्वतःवर प्रेम करण्यासाठी नेमकं काय करावं,यासंदर्भातील घे भरारी आनंदी सखी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात…
ओझर प्रतिनिधी नुपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ओझर मुस्लिम समाज कडून करण्यात आली आहे. त्यासाठी ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्याकडे निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे दि.२८/५/२०२२ रोजी रिपब्लिक भारत न्युज चैनलवर डिबेट करतांना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपुर शर्मा हिने इस्लाम धर्माचे पैगंबर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बद्दल अपशब्द वापरून संपुर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुःखविल्या आहेत. या प्रकरणी संपुर्ण मुस्लिम समाज संत्पप्त झालेला आहे, तरी सदरहु भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपुर शर्मा हिच्यावर आयपीसी धारा कलम २९५ए व १५३ए…
यावल प्रतिनिधी शुक्रवार दि.10जुन2022रोजी यावल तालुक्यातील सातोद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची दि.24एप्रिल रोजी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत हर्षलभाऊ पाटील यांच्या नेतुत्वाखाली बिनविरोध विजय झाल्यामुळे सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे युवा सामाजिक कार्यकर्ते व विकासो चे सभासद डॉ.कुंदनदादा फेगडे यांनी पुष्यगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सतीश पाटील तर व्हाईस चेअरमनपदी केशव तळेले यांची बिनविरोध निवड होऊन सलग 3वेळा या पॅनलचे वर्चस्व त्यांनी कायम ठेवले.या प्रसंगी सुधाकर फेगडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, डॉ.कुंदन फेगडे,विकासो चेअरमन सतीश पाटील,व्हाईस चेअरमन केशव तळेले,सदस्य अशोक पाटील,सतीश फेगडे,रुपचंद तळेले रवींद्र महाजन,केदार धांडे, त्र्यंबक तळेले,सौ.लीलाबाई तळेले,सौ.युगंधराबाई पाटील, सचिव अंबादास मराठे,खत विभाग…
यावल प्रतिनिधी गुरुवार दि.9रोजी रावेर विधानसभा मतदार संघात रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांना नुकसानीचा मोठा फटका बसला,या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना रावेर मतदार संघातील यावल येथील समाजसेवक तथा भावी लोकप्रतिनिधी डॉ.कुंदन फेगडे व रावेर येथील समाजसेवक, उद्योगपती तथा श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. सावखेडा ता.रावेर येथे ग्रामपंचायत जवळ प्रल्हाद बाबुराव पाटील व समाधान पाटील यांच्या घरावर सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष पूर्वाचा जुना मोठा वटवृक्ष कोसळून घराचे नुकसान झाले.तसेच शेती मशागती साठी लागणारे ट्रॅक्टर सुद्धा या वृक्षा खाली दाबले जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले.अशा नैसर्गिक आपत्ती व संकटाच्या काळात त्यांना दिलासा दिला व…
बोदवड, प्रतिनिधी – बोदवड येथील न्यायालयात शनिवारी फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जलद न्यायासाठीच लोकअदालतीचा गरजुंनी लाभ घ्यावा असे अवाहन न्या.सरवरी यांनी केले. बोदवड येथील न्यायालयात फिरत्या लोक अदालतीचे तसेच मोफत कायदेविषयक सल्ला शिबीर घेण्यात आले. न्यायधीश क्यू.ए.एन.सरवरी अध्यक्षस्थानी होते. फिरत्या लोक अदालतीत एकुण १६ प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. १६ फौजदारी प्रकरणांत तडजोड झाली. व्यासपीठावर बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष व पंच म्हणुन ॲड.अर्जुन पाटील, ॲड.धनराज प्रजापति उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मोठया प्रमाणावर पक्षकार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. फिरत्या न्यायालयामाफर्त पक्षकाराच्या केसेसचा ताबडतोबनिपटरा झाल्यामुळे पक्षकारानी समाधान व्यक्त केले तसेच सदर कार्यक्रमास यशस्वितेसाठी ॲड. के.एस.इंगळे, ॲड. व्हि.के…
बोदवड प्रतिनिधी आज दिनांक 11 जून रोजी महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मा. विरोधीपक्ष नेते देवेंद्र; फडणवीस यांच्या चाणक्य नितीने भारतीय जनता पार्टी ने ज्यांच्यावर राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती असे भाजपा चे ज्येष्ठ नेते गिरीषभाऊ महाजन, आशीषजी शेलार, व प्रसादजी लाड़ यांनी केलेल्या योग्य नियोजन व रणनीतीमुळे राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत पुरेशे संख्याबळ नसतांना महाविकास आघाडीत फुट पाडून तीन जागेवर भारतीय जनता पार्टीचे पियुषजी गोयल, डॉ.अनिल बोंडे व धनंजय महाडिक या उमेदवारांचा विजय झाला. म्हणून भारतीय जनता पार्टी,बोदवड़ तर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात…
लोणार(शेख गुलाब) नुपूर शर्मा, दिल्ली (माजी प्रवक्ता भाजप ) ह्यांनी टाईम्स नाव, या चैनलवर “न्यूज हावर डिबेट कार्यक्रमात” इस्लाम, प्रेषित मोहम्मद पैगंबर व त्याच्या तत्त्वांवर टिप्पणी करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावले व प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले. ह्या टिप्पण्यांमुळे देशात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो असे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे. नवीन कुमार जिंदल, (भाजपचे माजी मीडिया प्रमुख, दिल्ली सर्कल) यांनी १ जून २०२२ रोजी भारतातील मुस्लिम समुदायांना लक्ष्य करून प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात त्याच मुद्द्यावर टिप्पणी केली होती. नॅशनल टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतातील मुस्लीम समुदायांना लक्षकरून अशा निंदनीय टिप्पण्या करून धार्मिक समुदायांमध्ये शत्रुत्व, द्वेष आणि…