मुक्ताईनगर प्रतिनिधी येथील जी.जी.खडसे महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आज दिनांक ०६ जून रोजी शिवस्वराज्य दिन अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव भीमराव पवार यांचे “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी महाराजांनी केलेल्या स्वाऱ्या त्याच पद्धतीने महाराजांनी खऱ्या अर्थानं जनतेचे स्वराज्य निर्माण केले, त्यासंदर्भातील अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.ए. महाजन होते. त्यांनीही महाराजांच्या एकंदरीतच कार्यकर्तृत्वांवर भाष्य केलं आणि महाराजांना यानिमित्ताने वंदन करून त्यांच्या स्मृती जागृत केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.…
Author: Saimat
सोयगांव प्रतिनिधी आठवडाभरापासून मृग नक्षत्र कोरडे जात असतांना रविवारी भूर- भूर झालेल्या पावसावर सोयगाव तालुक्यात मृग नक्षत्राचा पहिला दिवस उजाडला होता.जिल्ह्यात पावसाच्या सरींवर सरी कोसळत असतांना मात्र सोयगाव तालुका कोरडा ठाक झाला होता . रविवारी झालेल्या भूर – भूर पावसामुळे तहानलेल्या जमिनीचा घसा कोरडाच राहिला आहे . मात्र वातावरणाने दिलासा दिला असल्याचे वातावरण सोयगाव तालुक्यात निर्माण झाले आहे . मृग नक्षत्रात आठवडाभरापासून खंड दिल्याने खरिपाच्या पेरण्यांची तयारीही खोळंबली होती सोयगाव तालुक्यात आठवडाभराचा खंड यामुळे मशागत झालेल्या जमिनींवरील ताण वाढला होता तर दुसरीकडे बियाणे घरात आणून आठवडा झाला परंतु अद्यापही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत मशागतीच्या कामात व्यस्त झाले होते रविवारी भूर भूर…
कोरोना महामारीचा सर्वाधिक तडाखा ज्या क्षेत्रांना बसला त्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश आहे. मात्र आता अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असताना आणि विविध आर्थिक घडामोडींनी गती आली असताना ऑटोमोबाईल क्षेत्रदेखील जोरदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत झाले आहे. कोरोनानंतर भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या वाहनांची मागणी जोरात आहे. यावेळी भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे, त्यामुळे कंपन्यांना दीर्घ प्रतीक्षा कालावधीचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीचा सर्वाधिक तडाखा ज्या क्षेत्रांना बसला त्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश आहे. मात्र आता अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असताना आणि विविध आर्थिक घडामोडींनी गती आली असताना ऑटोमोबाईल क्षेत्रदेखील जोरदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत झाले आहे. कोरोनानंतर…
जळगाव ः प्रतिनिधी सिव्हिलच्या आवारात सुमारे 90 हजार स्क्वेअर फूट जागेत तीन मजली 100 खाटांचे माता व बालसंगोपन केंद्र येत्या 18 महिन्यांत उभारण्यात येणार आहे. या केंद्रात 5 लेबर रूम, 4 ऑपरेशन थिएटर, 20 डिलिव्हरी टेबल, 3 महिला, 2 लहान मुलांचे वॉर्ड, 4 बेडचा अतिदक्षता कक्ष, सोनोग्राफी केंद्र आदींचा समावेश असेल.जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाकडून माता-बालसंगोपन केंद्राला 2020-21 मध्ये मंजुरी मिळाली असून, 29 कोटी 95 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे 15 जून 2022 रोजी अयोध्या दौऱ्यावर असून अयोध्या येथे रामलल्ला, हनुमान गढी, इस्कॉन टेम्पल या ठिकाणी दर्शन घेणार आहेत व सायंकाळी शरयू नदीच्या घाटावर शिवसैनिक व युवासैनिकांच्या उपस्थितीत भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील युवासैनिक, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेना विभागीय सचिव अविष्कार भुसे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, विस्तारक कुणाल दराडे, विस्तारक किशोर भोसले यांच्या नेतृत्वात रावेर लोकसभेतील युवासेना जिल्हा अधिकारी चंद्रकांत शर्मा, पवन सोनवणे, विष्णू इंगळे, प्रविण पंडीत, राकेश घोरपडे, ॲड.भरत पवार, मोहन जोशी यासह…
चोपडा प्रतिनिधी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय गुणवत्ता वाढ व विकास कार्यक्रम अंतर्गत संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व संचालक पंकज बोरोले यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाचे विभाग प्रमुख ,प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वृंद यांच्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि. ८ ते १० जून रोजी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. प्रथम दिनी डॉ विवेक काटदरे – जळगाव (विद्यार्थी जीवनात विकसित करावयाची जीवन कौशल्ये व मानवी वैयक्तिक संपत्तीचे प्रकार ) व डॉ अतुल सुर्यवंशी -पाचोरा (कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल्स ) यांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी डॉ…
शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. मात्र त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ५ जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे उद्या अयोध्येला पोहचणार आहेत. काकांच्याआधीच पुतण्या अयोध्येत रामाच्या दरबारी हजेरी लावणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची शिवसेनेने जय्यत तयारी केली असून, काल विशेष रेल्वेने ठाणे आणि नाशिकहून हजारो शिवसैनिक अयोध्येला निघाले. यावेळी निघताना शिवसैनिकांनी राज ठाकरेंना…
पुणे प्रतिनिधी : समर्पित भावनेने तिन शतक निरंतर निरपेक्षपणे सामजिक,वैद्यकीय,शैक्षणीक,अध्यात्मिक,धार्मिक,अपंगसेवा पुनर्रवसन कार्ये,मूकबधिर मतिमंद सेवा,वृक्षारोपण ,ग्राम स्वछता कार्ये,व्यसनमुक्ती,प्रवचनद्वारे समाजप्रबोधन कार्ये ,राष्ट्रीय् सेवा योजना ,नेहरु युवा कार्ये,व्होकेसनल ट्रेनिंग कोर्सेस,नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना पान्डेमिक मधे महत्वपूर्ण लोक सेवा कार्ये इत्यादी क्षेत्रात निष्काम कर्मयोगी कार्ये केल्याबद्दल नुकताच भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.बंगलोर येथील राष्ट्रीय पातळीवर कार्य करनारया संस्थेच्या वतीने वरिल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.डॉ रविंद्र भोळे आरोग्यसेवा केन्द्रा उरुळीकांचन द्वारे डॉ रवींद्र भोळे अनेक वर्षपासुन अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा देत असुन डॉ मणीभाई देसाई मनवसेवा ट्रस्ट निती आयोग सल्ग्नीत दिल्ली संस्थेच्या वतीने विविध लोकसेवेचे उपक्रम राबवित आहेत.तसेच डॉ मनिभाई देसाई प्रतिस्ठान एन…
जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील भारुड खेडा येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले भारुड खेडा गावी 13 जून रोजी सायंकाळी सहा वाजता शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते फटाक्यांची अतिषबाजी ढोल ताशाच्या गजरात शिवसेना शाखेचे फलक अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना तालुका प्रवक्ता गणेश पांढरे जिल्हा उपसंघटक सांडू मामा गुरव भरत पवार रोजगार हमी सदस्य कृष्णा चोरमारे मोहन जोशी विनोद जोशी चिचखेडा उपसरपंच अमित तडवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बस स्टँड परिसरात शिवसेना शाखा फलक अनावरण शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमा वेळी नवनिर्वाचित…
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी ते वारकऱ्यांशीही संवाद साधतील. देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईतील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार आहे. संध्याकाळी ६ च्या सुमाराला पंतप्रधान मोदी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहे. तसेच नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचा उदघाटन सोहळा राजभवन इथं पार…