औरंगाबाद : वृत्तसंस्था महाराष्ट्रात दर दिवस आड पेट्रोल व डिझेलचे भाववाढ सुरूच आहे. त्यानिमित्त सरकारचा निषेध म्हणून व आपल्या नेत्याचा वाढदिवस पेट्रोलचे भाव कमी करून मनसे कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त आज अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमिवर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्त दरामध्ये पेट्रोलचं वाटप होत आहे. एक दिवस का होईना पण स्वस्तात पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांनी पेट्रोल स्थानकात मोठी गर्दी केली आहे. औरंगाबादमध्ये मनसेच्यावतीने अवघ्या ५४ रुपयांमध्ये पेट्रोल देण्याचा उपक्रम राबण्यात आला आहे. यावेळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली असून निम्म्या दराने पेट्रोल मिळत…
Author: Saimat
मलकापूर प्रतिनिधी मलकापूर येथून जवळ असलेल्या जनता कॉलेज जवळ जळगाव येथून बुलढाणा कडे जात असलेल्या जळगाव नांदेड बस ला संगितम ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी ने मागून येऊन धडक दिल्याने बस च्या फुटल्या काचा सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर नागरिकांनी गेली एकच गर्दी. महाराष्ट्र शासनाच्या जळगाव नांदेड बस बुलढाणा कडे जात असताना मागून येऊन ओव्हरटेक करत असलेल्या संगीतम ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी ने जबर धडक दिल्याने एसटी बस च्या मागील काचा फुटल्या आहे तर यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर विविध कंपनीच्या लक्झरी बसेस नेहमी संध्याकाळच्या वेळेस मलकापूर येथून पुने कडे 20 ते 25 लक्झरी बस अपडाऊन करत असतात तर…
चाळीसगाव प्रतिनिधी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष-प्रशांत गायकवाड व तालुका अध्यक्ष-अरूण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.तरी या बैठकीत शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी मराठा सेवा संघाचे धेय,धोरण काय असेल आपल्याला संघाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत असे सुतोवाच त्यांनी केले. त्यानंतर शहराध्यक्षांनी कार्यकारिणीचे इतर पदाधिकारीची निवड जाहीर केली.त्याप्रमाणे मराठा सेवा संघाच्या शहर कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदी-श्री.अजय गोपाळराव देशमुख,श्री.आण्णासाहेब कृष्णा धुमाळ,श्री.हर्षल आत्माराम पाटील, श्री.खुशाल रेवजी पाटील, कार्याध्यक्षपदी-संजीव हिरामण पाटील,श्री.सुनील तुळशीदास चव्हाण, सचिवपदी-श्री.मनोहर जोहरमल सुर्यवंशी, सहसचिव-श्री.समाधान हिरामण बच्छाव कोषाध्यक्षपदी-चंद्रकांत धर्मा पाटील, सहकोषाध्यक्ष-श्री.विजय जिभाऊ पाटील, शहरसंघटक-श्री.योगेश राजधर पाटील,श्री.राकेश भास्करराव राखुंडे, श्री.राजेंद्र सर्जेराव मांडे, सौरंभ अनिल पाटील, कार्यकारिणी सदस्यपदी-…
चाळीसगांव/प्रतिनिधी ब्राम्हणशेवगे येथे सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंंतदादा सोनवणे यांचे संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांचे प्रयत्नातून व लोकसहभागातून शिवरस्ता तयार करण्यात येत आहे. ब्राम्हणशेवगे व शेवरी शिवाराला जोडणारा दोन ते अडीच किमीचा निसर्ग टेकडी कडे जाणारा शिवरस्ता आहे.या पैकी एक किमी रस्ता हा सन 2013-14 साली एम.आर.जी.एस.मधून खडीकरण झालेला आहे.परंतु उर्वरित रस्त्याची अतिशय। दयनिय अवस्था आहे. म्हसोबा जवळ असलेल्या नाल्याजवळ पावसाळ्यात तर पुर्णपणे बिकट परिस्थितीत होत असते.आपल्या शेतातील माल ने आण करणे तर दुरच पायीही जाता येता येत नाही.शंभर फुट परिसरात अक्षरशः दलदल निर्माण होऊन दोन फुटापर्यत चिखल असतो. या रस्त्याचे काम व्हावे यासाठी ग्रामस्थांनी सोमनाथ माळी यांचे नेतृत्वाखाली…
मेष राशी: मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस महत्त्वाचा असेल. कापड व्यवसायात आज चांगला फायदा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजीपणा करू नका. आज ८२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूधमिश्रित पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली माहिती मिळू शकेल. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय आणि नोकरीत चांगले काम होईल. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकार्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. मिथुन राशी: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा…
जळगाव ः प्रतिनिधी सुधर्मा संस्थेच्या पाचवी ते नववीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम व. वा. वाचनालयाच्या टिळक सभागृहात नुकताच पार पडला. अरुण भोळे यांचा सपत्नीक व डॉ. हितेंद्र भोळे, शीतल भोळे व बळीराम पाटील यांचा सत्कार अनुक्रमे सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे,राजेंद्र चौधरी,सुनिता बेलसरे, सूर्यकांत हिवरकर यांच्याहस्ते गीता ग्रंथ देऊन करण्यात आला.निहारीका भोळेचे विद्यार्थिनींनी औक्षण केले.सुर्यकांत हिवरकर यांनी जगातील ‘कर्तृत्ववान प्रसिद्ध 101 महिला` हे पुस्तक भेट दिले. खेडी खुर्द, मन्यारखेडा, सावखेडा, समतानगर, नशिराबाद, राजीव गांधीनगर, बांभोरी येथील शंभर मुला-मुलींना वह्या, पेन, रजिस्टर, दप्तर असे साहित्य वाटप आले.
भुसावळ : प्रतिनिधी जळगाव जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रन मंडळ सदस्य राजेंद्र देविलाल दायमा { वय 70 } यांचे आज दि.13 जुन रोजी दुपारी एक वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि.14 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता त्यांचे राहते घर टी. व्ही. टावर येथुन निघेल. त्यांच्या पश्चात एक मुलगा , एक मुलगी , दोन पुतणे , जावई , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील विधी तज्ञ अॅड.निर्मल दायमा यांचे पिताश्री होत.
जळगाव ः प्रतिनिधी येथील जळगाव स्त्रीरोग तज्ज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ.सीमा राजेश पाटील यांची तर सचिवपदी डॉ.दीप्ती पायघन यांची निवड करण्यात आली. रविवार 12 रोजी सकाळी 10 वा. हॉटेल प्रेसिडेंटच्या सभागृहात स्त्रीरोग तज्ज्ज्ञ व माजी खा.डॉ.उल्हासदादा पाटील, रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल व आयएमए जळगावचे सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळ्याचे व एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मावळत्या अध्यक्षा डॉ.सुजाता महाजन व सचिव डॉ.सारिका पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदभार सुपूर्द केला. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ.प्रिती दोशी व कोषाध्यक्ष म्हणून डॉ.स्वप्निल रावेरकर यांची निवड करण्यात आली. डॉ.उल्हास पाटील व डॉ.प्रिती अग्रवाल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ.सीमा पाटील…
जळगाव ः प्रतिनिधी येथील माधवबाग क्लिनिक व कांताई नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पू.ना. गाडगीळ येथील सभागृहात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले. मधुमेह झाल्यानंतर अनेकांना रेटिना व ग्लुकामाचे आजार संभवतात. असे आजार उद्भवू नये, यासाठी जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात माधवबागच्या मधुमेह व अती ताणावात असलेल्या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचा पू.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतला. सदर शिबिर हे डॉ. अमोल कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.त्यात 100 हून अधिक रुग्णांनी सहभाग घेऊन लाभ घेतला. डॉ. अमोल कडू यांनी बोलतांना सांगितले की, प्रत्येक मधुमेह पेशंट ने वर्षात एकदा तरी नित्याने डोळे तपासणी करावी. वेळेत योग्य…