जळगाव ः प्रतिनिधी सुधर्मा संस्थेच्या पाचवी ते नववीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम व. वा. वाचनालयाच्या टिळक सभागृहात नुकताच पार पडला. अरुण भोळे यांचा सपत्नीक व डॉ. हितेंद्र भोळे, शीतल भोळे व बळीराम पाटील यांचा सत्कार अनुक्रमे सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे,राजेंद्र चौधरी,सुनिता बेलसरे, सूर्यकांत हिवरकर यांच्याहस्ते गीता ग्रंथ देऊन करण्यात आला.निहारीका भोळेचे विद्यार्थिनींनी औक्षण केले.सुर्यकांत हिवरकर यांनी जगातील ‘कर्तृत्ववान प्रसिद्ध 101 महिला` हे पुस्तक भेट दिले. खेडी खुर्द, मन्यारखेडा, सावखेडा, समतानगर, नशिराबाद, राजीव गांधीनगर, बांभोरी येथील शंभर मुला-मुलींना वह्या, पेन, रजिस्टर, दप्तर असे साहित्य वाटप आले.
Author: Saimat
भुसावळ : प्रतिनिधी जळगाव जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रन मंडळ सदस्य राजेंद्र देविलाल दायमा { वय 70 } यांचे आज दि.13 जुन रोजी दुपारी एक वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दि.14 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता त्यांचे राहते घर टी. व्ही. टावर येथुन निघेल. त्यांच्या पश्चात एक मुलगा , एक मुलगी , दोन पुतणे , जावई , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील विधी तज्ञ अॅड.निर्मल दायमा यांचे पिताश्री होत.
जळगाव ः प्रतिनिधी येथील जळगाव स्त्रीरोग तज्ज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ.सीमा राजेश पाटील यांची तर सचिवपदी डॉ.दीप्ती पायघन यांची निवड करण्यात आली. रविवार 12 रोजी सकाळी 10 वा. हॉटेल प्रेसिडेंटच्या सभागृहात स्त्रीरोग तज्ज्ज्ञ व माजी खा.डॉ.उल्हासदादा पाटील, रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल व आयएमए जळगावचे सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळ्याचे व एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मावळत्या अध्यक्षा डॉ.सुजाता महाजन व सचिव डॉ.सारिका पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदभार सुपूर्द केला. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ.प्रिती दोशी व कोषाध्यक्ष म्हणून डॉ.स्वप्निल रावेरकर यांची निवड करण्यात आली. डॉ.उल्हास पाटील व डॉ.प्रिती अग्रवाल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ.सीमा पाटील…
जळगाव ः प्रतिनिधी येथील माधवबाग क्लिनिक व कांताई नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पू.ना. गाडगीळ येथील सभागृहात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले. मधुमेह झाल्यानंतर अनेकांना रेटिना व ग्लुकामाचे आजार संभवतात. असे आजार उद्भवू नये, यासाठी जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात माधवबागच्या मधुमेह व अती ताणावात असलेल्या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचा पू.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतला. सदर शिबिर हे डॉ. अमोल कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.त्यात 100 हून अधिक रुग्णांनी सहभाग घेऊन लाभ घेतला. डॉ. अमोल कडू यांनी बोलतांना सांगितले की, प्रत्येक मधुमेह पेशंट ने वर्षात एकदा तरी नित्याने डोळे तपासणी करावी. वेळेत योग्य…
जळगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील भोकर आणि पिंप्राळा महसूल मंडळातील 21 गावांना 9 आणि 10 जून रोजी आलेल्या वादळी वारे व पावसाने दिलेल्या फटक्यामुळे सुमारे 2091 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्यात बहुतांश केळीचे क्षेत्र आहे. या नुकसानीची आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अनेक शेतकर्यांना आपल्या व्यथा-वेदना सांगतांना अश्रू अनावर झाले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली. अलीकडच्या काही वर्षांमधील सातत्याने होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात तरी शेतीच्या व्यवस्थापनाचा पॅटर्न बदलण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. या संदर्भातील माहिती अशी…
यावल : तालुका प्रतिनिधी यावल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण 11 प्रभागासाठी 23 पालिका सदस्य निवडले जाणार असून त्यासाठी आज सोडतद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती जमातीसाठी प्रभाग 2 व 5 तसेच अनुसूचित जमातीसाठी प्रभाग 3 व 11 मध्ये आरक्षण ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारण 19 जागा असून त्यात 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शहरातील प्रभागनिहाय आरक्षण असे – प्रभाग क्र. 1 अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 अ – अनुसूचित जाती, ब – सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. 3 अनुसूचित जमाती (महिला), ब- सर्वसाधरण, प्रभाग क्र.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ओपन ड्रग्ज प्रकरणात अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टार्सची नावे समोर आली आहेत. आता या यादीत सिद्धांत कपूरचे नाव जोडले गेले आहे. बंगळुरूमध्ये छापा टाकून बंगळुरू पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. “ड्रग्स सेवनात दोषी ठरलेल्या 6 लोकांमध्ये सिद्धांत एक आहे. हे सर्व लोक बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये होते, जिथे ही पार्टी सुरु होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून छापा टाकला”, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी…
महाविकास आघाडीने उमेदवार उभा केल्यानेच भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. धनंजय महाडिक यांचा विजयही झाला. या निवडणुकीत अपक्षांची मते ही भाजपच्या पारड्यात पडली असून त्यामुळे महाविकास आघाडीचा मोठा अपमान झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडले पाहिजे ‘उद्धव ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल राज्यसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते रविवारी मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी…
मेष राशी: आज मेष राशीच्या लोकांची साथ राहील. आज कामात तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्यातील बोलण्याची कला तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या कामात यश मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. आज ८१% नशिबाची साथ आहे. गरजू लोकांना मदत करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चपळतेचा असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय राहील. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी व्हाल. मनाला आनंद होईल. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. प्रेमसंबंधात…