जळगाव – प्रतिनिधी सुप्रसिद्ध पेडियाट्रिक सर्जन डॉ.मिलींद जोशी यांना अथक प्रयत्नांती फॉल्स – रोबोटिक सर्जरीत फेलोशिप प्रदान करण्यात आली. डॉ.जोशी हे खान्देशातून एकमेव सर्जन आहे ज्यांना ही फेलोशिप जाहिर झाली. इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेशियल इंडो – सर्जन्सद्वारे डॉ.मिलींद जोशी यांनी अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सर्जरीतील फॉल्स – रोबोटिक सर्जरीसाठी खुप मेहनत घेतली असून त्यांच्या मेहनतीला यश आले ते १२ जून रोजी… फॉल्स – रोबोटिक सर्जरी चीफेलोशिप डॉॅ.मिलींद जोशी यांना प्रदान करण्यात आली. याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी डॉ.मिलींद जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच आपल्यासारखे अभ्यासु डॉक्टर येथे आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे सांगून, पुढील वाटचालीसाठी डॉ.पाटील…
Author: Saimat
जामनेर तालुक्यातील प्रतिनिधी – शेंदुर्णी येथील नगरपंचायतचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी संबंध नसलेल्या वादात शिवसैनिकाला ओढून त्याची बदनामी केल्याबद्दल व सतत शेंदुर्णीत शहरात जातीय सलोखा वारंवार बिघडवणार्या व जातीयवाद निर्माण करून शहरातील शांतता बिघडवणार्या मुख्याधिकारी यांचेवर कार्यवाही करणे बाबत आज पाऊस पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांना शेंदुर्णी शहर शिवसेना शाखेतर्फे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की, शेंदुर्णी नगरपंचायत चे मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने शहरात वाद निर्माण करीत असतात. गत सात तारखेला त्यांनी शेंदूरणी शहरातील काही लोकांना नगरपंचायतीच्या लेटर पॅड वर त्यांचे सहीनिशी धमकीचे पत्रे पाठवली त्यात …
पुणे :- प्रतिनिधी संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. त्यांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तो अभंग. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत” या शब्दात पंतप्रधान मोदींनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचे महत्त्व विशद केले. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण झाले. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते.…
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) लिव्ह इन रिलेशनविषयी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहाशिवाय (live in relationship) जन्माला आलेल्या मुलांचाही वडिलांच्या संपत्तीत हक्क असल्याचे न्यायालयाने मानले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र राहत असतील, तर ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळेल. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्वाळा देताना केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानले नव्हते. कारण त्याच्या पालकांचे लग्न झाले नव्हते. दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे (live in relationship) दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा देताना…
जळगाव प्रतिनिधी भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार राजु मामा यांचा वाढदिवस रोजी भाजपा जिल्हा महानगर तर्फे जनसेवेच्या माध्यमातुन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाजपा जिल्हा महानगर तर्फे जन सेवा हिच राष्ट्र सेवा या भावनेने आ सुरेश भोळे यांचा वाढदिवस साजरा केला सकाळी १० वाजता पांझरा पोळ येथे जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते गोशाळेत गाईंना गो ग्रास (लापसी देऊन) कार्यक्रमाची सुरुवात केली, या नंतर ११वाजता भाजपा कार्यालयात कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तीच्या २५ मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. दुपारी १२ मातोश्री वृध्दाश्रम येथे आजी आजोबा यांना पुरण पोळी व आमरस जेवनाचा आस्वाद दिला, भाजपा महानगरातील…
जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम मंदिरातून 14 जून रोजी श्रीराम मंदिर संस्थान संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला प्रस्थान करण्यात आले. त्याआधी सोमवारी जुन्या जळगावातील श्रीराम मंदिरात कुमारी मुलींच्या व मान्यवरांच्या हस्ते या पालखीचे पूजन करण्यात आले. प्रतिवर्षीप्रमाणे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात पालखी भोईटेगढी, कोल्हेवाडा, तळेलेवाडामार्गे गोपाळपुरा येथे श्री सद््गुरू बाबाजी महाराज समाधी मंदिरात भजन होईल. त्यानंतर या पालखीने श्री सद््गुरू अप्पा महाराज समाधी मंदिरात मुक्काम केला व आज 14 जून रोजी सकाळी 8 वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी भाजप खासदार खासदार रक्षा खडसे यांची शर्म-अल-शेख (इजिप्त) येथे होणाऱ्या दोनदिवसीय आठव्या आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खडसे यांचे नाव तीन सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी निश्चित केले आहे. शर्म-अल-शेख (इजिप्त) हे शिनाई द्वीपकल्पातील वाळवंट आणि तांबडा समुद्र यांच्यामधील किनारपट्टीवर वसले असून आंतरराष्ट्रीय परिषदा आणि राजनैतिक बैठकांसाठी या शहराला ओळखले जाते. या ठिकाणी होणाऱ्या संमेलनात जागतिक पर्यावरण हवामान बदलावर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रात जगातील तरुण पिढी सहभाग नोंदविणार असून आपले विचार मांडतील. खासदार रक्षा खडसे आयपीयू इंटर-पार्लमेंटरियन फोरमच्या एशिया पॅसेफिक ग्रुपवर चार वर्षांपासून बोर्ड मेंबर…
केंद्र सरकारने आज अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही घोषणा जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गंत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. तसंच, तरुणांना रोजगारही दिला जाणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलाचे प्रमुखांसह या योजनेचा आज घोषणा केली आहे. भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत एक निर्णय घेतला आहे. आज अग्नपथाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक योजनेची घोषणा आम्ही करत आहोत. अग्निपथ योजनेअंतर्गंत अग्निवीर सेनामध्ये सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ही योजना देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी व देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने सुरू करण्यात येत आहे, असं राजनाथ…
जळगाव प्रतिनिधी शाळा प्रारंभ दिनाचे औचित्य साधून, विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर ,येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. गेटवर विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, रंगीत फुगे तसेच शालेय आवारात विद्यार्थ्यांना साठी सेल्फी पॉइंट तयार करून आकर्षक पद्धतीने सजावट केलेली होती. यावेळी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी प्रत्येक वर्गाला एक झाड भेट देऊन त्याची लागवड आणि देखभाल, संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक वर्गाला दिली. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका वैशाली…