मुंबई : प्रतिनिधी प्रेमाची कुठलीही मर्यादा नसते असं म्हणतात. काही व्यक्तींकडे पाहिल्यावर लगेचच ही बाब पटते. वयाचा आकडा या व्यक्तींना दूरदूरपर्यंत स्पर्शही कर नाही, हेच त्यांना पाहून लक्षात येतं. अशाच व्यक्तींमध्ये येणआरं एक गाजलेलं नाव म्हणजे किम कार्दशियन चं. किम कायमच तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांना घायाळ करत असते. नो मेकअप असो किंवा मग अगदी मेट गालाच्या रेड कार्पेटवरचा तिचा लूक असो. नजरा वळवण्यात ती कुठंच मागे पडत नाही. सध्या किम पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचे काही नवे फोटो. चार मुलांची आई असणारी किम सध्या तिचा प्रियकर पीट डेविडसन याच्यासोबत काही खास क्षण व्यतीत करत आहे. बीच आउटिंगसाठी गेलेली किम…
Author: Saimat
यावल प्रतिनिधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे शहरात दोन समाजात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे वादाचे पडसाद मंगळवारी रात्री जमावात रूपांतरित झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. शहरात सध्या शांतता प्रस्थापित असून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे . यावल शहरात एका समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट,सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची तक्रार करीत असतांना मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होत पोलीस ठाण्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी शहरातील बुरूज चौकात जमावाला थांबवत परत जाण्याच्या सूचना केल्या मात्र जमाव पांगत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.यामुळे दि.14 मंगळवारी रात्री शहरात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच फैजपूर…
कजगाव: ता.भडगाव प्रतीनिधी कजगाव: ता.भडगाव येथे चोरट्यांनी चांगलेच डोके वर काढले असुन चोरीचा चा सपाटाच लावला आहे. गेल्या आठवड्यात दोन मंदिरातील वस्तू चोरीला गेल्या , या पाठोपाठ आज नव्वद हजाराचे किमतीचे दोन बैल चोरट्यांनी लांबवले. सदर घटनेमुळे ग्रामस्थासह शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली आहे. बाबत वृत्त की गेल्या आठवड्यात कजगाव वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी जीन या भागातील महादेव मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील काहि साहित्य चोरत पोबारा केला होता. या नंतर कजगाव चाळीसगांव मार्गावरील ऋषीबाबा मंदिरातून देखील साहित्य चोरत पोबारा केला होता. लागोपाठ दोन दिवसात दोन मंदिरात चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. मंदिर चोरी ची चर्चा थांबत नाही तोच कजगाव पारोळा…
सोयगाव प्रतिनिधी ग्रामीण भागात मृगनक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात! या नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा किडा बघायला मिळत असल्यामुळे याला मृग नक्षत्राचा किडा किंवा मृगाचा किडा असंदेखील म्हटलं जातं. हा किडा दिसला की पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातील लोकांची आहे. त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद-कुंकू वाहतात त्याची पूजा करतात. हा किडा जसा ग्रामीण भागासाठी आकर्षणाचा विषय आहे, तसंच शहरी भागात देखील या किड्याने प्रचंड आकर्षण निर्माण केलेला आहे. या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. ह्या किड्याला संस्कृत मध्ये बिर बाहुती, उर्दूत राणी किडा, तेलगू अरुद्रा तर मराठीत काही ठिकाणी गोसावी कीडा…
यावल प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार,माजी आमदार आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन हरिभाऊ जावळे हे दि.16जून 2020 ला आपल्या प्रिय शेतकरी बंधूंना आणि राजकारणाला, समाजाला सोडून निघून गेले, त्यानिमित्त गुरुवार दि.16 जून 2022 ला यावल तालुक्यातील भालोद येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता सखाराम महाजन पतसंस्था सभागृहात हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावल तालुक्यातील तसेच रावेर विधानसभा,रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणार आहे. हरिभाऊंच्या आठवणी शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना येत नाही असा एकही दिवस उगवला नाही रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि निमित्ताने या विकास पुरुषाची सतत आठवण आल्याशिवाय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरी एक मॉडर्न स्मार्ट टीव्ही असावा असे प्रत्येकाला वाटते. तुम्हीही नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा प्लान करत असाल तर, Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये तो खरेदी करण्याची हीच योग्य संधी आहे. LG 32 इंच स्मार्ट टीव्ही फक्त १८,९९० रुपयांमध्ये तुम्ही घरी आणू शकणार आहात. या स्मार्ट टीव्हीची MRP २३,९९० रुपये आहे. सेलमध्ये ५ हजार रुपयांची सूट देण्यात येत असून या LG TV वर एवढी मोठी सूट येण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर, या टीव्हीवर क्रेडिट कार्ड ऑफरचा लाभ देखील ग्राहकांना मिळेल. क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर १० % इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल सांगायचे तर आधीच…
यावल प्रतिनिधी मंगळवार दिनांक १४ जुन २०२२ रोजी ग्रामपंचायत जवळ सांगवी बु तालुका यावल येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपरेशन साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार केले. डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची,राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १०५ नेत्र रुग्णांची तपासणी व ११ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिये साठी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील काव्य रत्नावली चौकातुन अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील विठ्ठल पेठेतील रहिवासी सुनिल गोपाल वर्मा (वय-४७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोनारकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनिल वर्मा हे दुचाकी (एमएच १९ एव्ही ५६१९) ने काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोर आले. त्याठिकाणी दुचाकी पार्क करून ते उद्यानात गेले. रात्री ८ वाजता परत असल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध केली परंतू मिळून आली नाही. अखेर तीन दिवसांनतर…
मेष राशी: मेष राशीच्या लोकांना आज घरात प्रेम आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका मिळेल. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. जोखीम आणि तारणाची कामे टाळा. तरुणांच्या करिअरला गती मिळेल. जुन्या नकारात्मक गोष्टींना वर्तमानात वरचढ होऊ देऊ नका. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. अनुभवी आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. सध्या, तुम्हाला एखाद्या मालमत्तेबद्दल अभिमान वाटेल. बर्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. व्यावसायिकांसाठी…
पुणे : प्रतिनिधी काही वेळेपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषणच करू न दिल्यावरून खुद्द पंतप्रधान मोदींनाच याचे आश्चर्य वाटले. दरम्यान घडलेल्या या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील कार्यक्रमात मोदींशेजारी बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडूनच अजितदादांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात…