Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी हरियाणा (पंचकुला) येथे 4 ते 6 जूनदरम्यान खेलो इंडिया स्पर्धा घेण्यात आली. यात जळगावच्या रुद्राक्षी भावे हिने योगासन आर्टिस्टिक गर्ल्स ग्रुप या गटात रौप्य पदक तर आर्टिस्टिक सोलो प्रकारांत कांस्य पदक पटकावले. रुद्राक्षी ही ध्रू ग्लोबल स्कूल संगमनेर येथे स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण व योगाचा अभ्यास करत आहे. तिला डॉ. संजय मालपाणी, मंगेश खोपकर, प्रवीण पाटील, स्वप्निल जाधव, किरण वाडेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. ती प्रज्ञा अशोक नाईक यांची सुकन्या आहे.

Read More

विशाखापट्टणम ःवृत्तसंस्था आयपीएलच्या पर्पल कॅप विजेत्या युजवेंद्र चहल (3/20) व युवा गोलंदाज हर्षल पटेलने (4/25) शानदार गोलंदाजीतून यजमान टीम इंडियावरील मालिका पराभवाचे सावट यशस्वीपणे दूर केले. भारताने मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. त्यातून भारताने सलग सात पराभवानंतर आफ्रिकेवर मात केली. यासह भारताने घरच्या मैदानावरील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयाचे खाते उघडले. आता मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोटमध्ये होणार आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात आफ्रिकेसमोर 180 धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्युत्तरात आफ्रिका संंघाचा 19.1 षटकांत 131 धावांत धुव्वा उडाला. ऋतुराज-ईशानची विक्रमी भागीदारी पुण्याचा ऋतुराज गायकवाड (57) आणि ईशान किशनने (54) भारतीय संघाला…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जिड लाख लोकांच्या आरोग्याशी संबंधित घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले आहे. मक्तेदार काम करण्यास तयार नसेल तर मनपाने बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारावा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी केली आहे. आव्हाणे शिवारात मनपाच्या जागेवर घनकचरा प्रकल्पाचे काम नियोजित आहे. सध्या या प्रकल्पाच्या जागेवर सात वर्षांपासून कचरा साठवला जात आहे. मनपा व सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळू नये.घनकचरा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारावा. त्यामुळे मनपाच्या 48 कोटींच्या निधीची बचत होईल.तो निधी शहरातील विकास कामांसाठी खर्च करणे शक्य होईल,या मागणीचे निवेदन माजी उपमहापौर डॉ. सोनवणे यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना दिले.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जैन सोशल ग्रुप जळगावचा स्नेहमिलन सोहळा नंदग्राम (भुसावळ) येथे नुकताच झाला. त्यात 110 सदस्य परिवारासह सहभागी झाले होते. स्विमिंग, रेन डान्स, विविध खेळ खेळवण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष प्रियेश छाजेड, प्रोजेक्ट चेअरमन राहुल राका, रूपल राका, जितेंद्र बोरा, निर्मला बोरा, राजेश भंडारी, किशोर चोपडा व योगेश चोपडा, पंकज जैन, आनंद श्रीश्रीमाळ, अनिल पगारिया, विजय सांड, तेजस कावडिया, संदीप रेदासनी व जैन सोशल गृपच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी रेडक्रॉस रक्तकेंद्रात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम झाला. यात 18 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमात एक लहान मुलाची आई असलेल्या दीपाली शांताराम बारी यांनीही पहिल्यांदा रक्तदान करून आनंद व्यक्त केला. तर रेडक्रॉसचे कर्मचारी मंगेश ओतारी यांनी 23 वे रक्तदान केले. त्यांचे रेडक्रॉस चेअरमन विनोद बियाणी यांनी कौतुक केले. रेडक्रॉसचे सह कोषाध्यक्ष सुभाष सांखला यांचा ए.बी. निगेटिव्ह जे स्वत: दुर्मीळ रक्तगट असून त्यांनी आजपर्यंत 66 वेळा रक्तदान केलेले आहे असे रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले. एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन जणांचे प्राण वाचवण्यास मदत होते तसेच रक्तदानाने आत्मिक समाधान मिळते असे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब जळगाव मिडटाउनतर्फे आजची काळजी उद्याची सुरक्षितता स्त्रियांचे कॅन्सर याविषयावर स्त्रीरोग व कर्करोग तज्ञ डॉ.श्रद्धा चांडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गणपती नगरातील रोटरी हॉल येथे झालेल्या व्याख्यानात डॉ.चांडक ह्यांनी स्त्रियांमध्ये होणारे वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर व त्याच्या योग्य वेळी स्वतः किंवा वेगवेगळ्या क्लिनिकल चाचण्या कडून निदान करण्याची गरज, स्त्रियांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर, ओवेरियन कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर यांचे कारणे लक्षणे निदान पद्धत व त्याची उपचार पद्धत यांच्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कमी वयात मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व पुरुषांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर याच्यावर पण मार्गदर्शन केले. याशिवाय कॅन्सर निदानसाठी नवीन चाचण्या व कार्यक्रम रोगाचे निष्पन्न झाल्यानंतर…

Read More

जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा तसेच संतोषीमातानगर जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मिळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज शाळेत विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल या अंतर्गत शाळा पूर्वतयारी मेळावा केंद्र जिल्हा परिषद शाळा तसेच संतोषीमातानगर जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहूर शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे हार गुच्छ देऊन तसेच पुस्तके देऊन या सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोषीमाता जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी सभापती जळगाव तथा संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप भाऊ लोंढा…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार,माजी आमदार आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन हरीभाऊ जावळे हे दि.16जून 2020 रोजी आपल्या प्रिय शेतकरी बंधूंना आणि राजकारणाला, समाजाला सोडून निघून गेले, त्यानिमित्त गुरुवार दि.16 जून 2022 ला यावल तालुक्यातील भालोद येथे सकाळी 9 वाजता सखाराम महाजन पतसंस्था सभागृहात हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावल तालुक्यातील तसेच रावेर विधानसभा,रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. हरीभाऊंच्या आठवणी शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना येत नाही असा एकही दिवस उगवला नाही. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि निमित्ताने या विकास पुरुषाची सतत आठवण…

Read More

पुणे प्रतिनिधी  ऐतिहासिक दागिन्यांच्या निर्मितीसाठी बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध असलेल्या पीएनजी सन्सने महानयोद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित सम्राट पृथ्वीराज चित्रपटातील दागिन्यांचे डिझाइनिंग व क्यूरेशन केले आहे. तसेच या दागिन्यांचे प्रदर्शन पुणे, नाशिक व कर्नाटकातील कलबुर्गी येथील दालनात भरवले. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सम्राट पृथ्वीराज चित्रपटातील दागिन्यांसंदर्भात पीएनजी सन्सचे सीएफओ व मार्केटिंग हेड आदित्य मोडक म्हणाले, १९० वर्षांपासून संस्कृती व दागिन्यांचा अभ्यास सातत्याने करत आहे. पीएनजी सन्सकडे अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट आले. ऐतिहासिक चित्रपटांसाठी मूळस्वरूपातील दागिने घडवणारी सराफी पेढी, अशी पीएनजी सन्सची ओळख बनली. पृथ्वीराज चित्रपटामुळे पुन्हा शिक्कामोर्तब झाला. ’ मोडक म्हणाले, दागिन्यांसाठी पृथ्वीराज ज्वेलरी कलेक्शनमध्ये दागिने डिझाइन केले आहेत. राजपुताना शैलीतील…

Read More

यावल प्रतिनिधी  आज देशामध्ये दर वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे.अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असला, तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करून भारताला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे.धर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करून त्यातील धर्माचा प्रचार करणे हा शब्द काढला पाहिजे.त्यासोबत गोवा सरकारने विधानसभेत या संबंधीचा ठराव पारित करून केंद्रशासनाला पाठवला पाहिजे.तरच अवैध धर्मांतरणावरती संपूर्ण बंदी येईल. स्वत:च्या धर्माचे पालन करण्याला कोणतीही आडकाठी आणण्याची आवश्यकता नाही; मात्र इतरांना फसवून, जबरदस्ती करून किंवा त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे,अशी मागणी सीबीआयचे माजी हंगामी संचालक एम.नागेश्वरराव यांनी…

Read More