जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब जळगाव मिडटाउनतर्फे आजची काळजी उद्याची सुरक्षितता स्त्रियांचे कॅन्सर याविषयावर स्त्रीरोग व कर्करोग तज्ञ डॉ.श्रद्धा चांडक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गणपती नगरातील रोटरी हॉल येथे झालेल्या व्याख्यानात डॉ.चांडक ह्यांनी स्त्रियांमध्ये होणारे वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर व त्याच्या योग्य वेळी स्वतः किंवा वेगवेगळ्या क्लिनिकल चाचण्या कडून निदान करण्याची गरज, स्त्रियांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर, ओवेरियन कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर यांचे कारणे लक्षणे निदान पद्धत व त्याची उपचार पद्धत यांच्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कमी वयात मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व पुरुषांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर याच्यावर पण मार्गदर्शन केले. याशिवाय कॅन्सर निदानसाठी नवीन चाचण्या व कार्यक्रम रोगाचे निष्पन्न झाल्यानंतर…
Author: Saimat
जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील येथे केंद्रीय जिल्हा परिषद शाळा तसेच संतोषीमातानगर जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मिळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज शाळेत विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल या अंतर्गत शाळा पूर्वतयारी मेळावा केंद्र जिल्हा परिषद शाळा तसेच संतोषीमातानगर जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहूर शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे हार गुच्छ देऊन तसेच पुस्तके देऊन या सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोषीमाता जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी सभापती जळगाव तथा संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप भाऊ लोंढा…
यावल ः तालुका प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार,माजी आमदार आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन हरीभाऊ जावळे हे दि.16जून 2020 रोजी आपल्या प्रिय शेतकरी बंधूंना आणि राजकारणाला, समाजाला सोडून निघून गेले, त्यानिमित्त गुरुवार दि.16 जून 2022 ला यावल तालुक्यातील भालोद येथे सकाळी 9 वाजता सखाराम महाजन पतसंस्था सभागृहात हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावल तालुक्यातील तसेच रावेर विधानसभा,रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. हरीभाऊंच्या आठवणी शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना येत नाही असा एकही दिवस उगवला नाही. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि निमित्ताने या विकास पुरुषाची सतत आठवण…
पुणे प्रतिनिधी ऐतिहासिक दागिन्यांच्या निर्मितीसाठी बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध असलेल्या पीएनजी सन्सने महानयोद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित सम्राट पृथ्वीराज चित्रपटातील दागिन्यांचे डिझाइनिंग व क्यूरेशन केले आहे. तसेच या दागिन्यांचे प्रदर्शन पुणे, नाशिक व कर्नाटकातील कलबुर्गी येथील दालनात भरवले. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सम्राट पृथ्वीराज चित्रपटातील दागिन्यांसंदर्भात पीएनजी सन्सचे सीएफओ व मार्केटिंग हेड आदित्य मोडक म्हणाले, १९० वर्षांपासून संस्कृती व दागिन्यांचा अभ्यास सातत्याने करत आहे. पीएनजी सन्सकडे अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट आले. ऐतिहासिक चित्रपटांसाठी मूळस्वरूपातील दागिने घडवणारी सराफी पेढी, अशी पीएनजी सन्सची ओळख बनली. पृथ्वीराज चित्रपटामुळे पुन्हा शिक्कामोर्तब झाला. ’ मोडक म्हणाले, दागिन्यांसाठी पृथ्वीराज ज्वेलरी कलेक्शनमध्ये दागिने डिझाइन केले आहेत. राजपुताना शैलीतील…
यावल प्रतिनिधी आज देशामध्ये दर वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे.अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असला, तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करून भारताला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे.धर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करून त्यातील धर्माचा प्रचार करणे हा शब्द काढला पाहिजे.त्यासोबत गोवा सरकारने विधानसभेत या संबंधीचा ठराव पारित करून केंद्रशासनाला पाठवला पाहिजे.तरच अवैध धर्मांतरणावरती संपूर्ण बंदी येईल. स्वत:च्या धर्माचे पालन करण्याला कोणतीही आडकाठी आणण्याची आवश्यकता नाही; मात्र इतरांना फसवून, जबरदस्ती करून किंवा त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे,अशी मागणी सीबीआयचे माजी हंगामी संचालक एम.नागेश्वरराव यांनी…
मुंबई : प्रतिनिधी प्रेमाची कुठलीही मर्यादा नसते असं म्हणतात. काही व्यक्तींकडे पाहिल्यावर लगेचच ही बाब पटते. वयाचा आकडा या व्यक्तींना दूरदूरपर्यंत स्पर्शही कर नाही, हेच त्यांना पाहून लक्षात येतं. अशाच व्यक्तींमध्ये येणआरं एक गाजलेलं नाव म्हणजे किम कार्दशियन चं. किम कायमच तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांना घायाळ करत असते. नो मेकअप असो किंवा मग अगदी मेट गालाच्या रेड कार्पेटवरचा तिचा लूक असो. नजरा वळवण्यात ती कुठंच मागे पडत नाही. सध्या किम पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचे काही नवे फोटो. चार मुलांची आई असणारी किम सध्या तिचा प्रियकर पीट डेविडसन याच्यासोबत काही खास क्षण व्यतीत करत आहे. बीच आउटिंगसाठी गेलेली किम…
यावल प्रतिनिधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे शहरात दोन समाजात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे वादाचे पडसाद मंगळवारी रात्री जमावात रूपांतरित झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. शहरात सध्या शांतता प्रस्थापित असून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे . यावल शहरात एका समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट,सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची तक्रार करीत असतांना मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होत पोलीस ठाण्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी शहरातील बुरूज चौकात जमावाला थांबवत परत जाण्याच्या सूचना केल्या मात्र जमाव पांगत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.यामुळे दि.14 मंगळवारी रात्री शहरात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच फैजपूर…
कजगाव: ता.भडगाव प्रतीनिधी कजगाव: ता.भडगाव येथे चोरट्यांनी चांगलेच डोके वर काढले असुन चोरीचा चा सपाटाच लावला आहे. गेल्या आठवड्यात दोन मंदिरातील वस्तू चोरीला गेल्या , या पाठोपाठ आज नव्वद हजाराचे किमतीचे दोन बैल चोरट्यांनी लांबवले. सदर घटनेमुळे ग्रामस्थासह शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली आहे. बाबत वृत्त की गेल्या आठवड्यात कजगाव वाडे रस्त्यावरील मनमाड कंपनी जीन या भागातील महादेव मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील काहि साहित्य चोरत पोबारा केला होता. या नंतर कजगाव चाळीसगांव मार्गावरील ऋषीबाबा मंदिरातून देखील साहित्य चोरत पोबारा केला होता. लागोपाठ दोन दिवसात दोन मंदिरात चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. मंदिर चोरी ची चर्चा थांबत नाही तोच कजगाव पारोळा…
सोयगाव प्रतिनिधी ग्रामीण भागात मृगनक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात! या नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा किडा बघायला मिळत असल्यामुळे याला मृग नक्षत्राचा किडा किंवा मृगाचा किडा असंदेखील म्हटलं जातं. हा किडा दिसला की पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातील लोकांची आहे. त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद-कुंकू वाहतात त्याची पूजा करतात. हा किडा जसा ग्रामीण भागासाठी आकर्षणाचा विषय आहे, तसंच शहरी भागात देखील या किड्याने प्रचंड आकर्षण निर्माण केलेला आहे. या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. ह्या किड्याला संस्कृत मध्ये बिर बाहुती, उर्दूत राणी किडा, तेलगू अरुद्रा तर मराठीत काही ठिकाणी गोसावी कीडा…
यावल प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार,माजी आमदार आणि मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन हरिभाऊ जावळे हे दि.16जून 2020 ला आपल्या प्रिय शेतकरी बंधूंना आणि राजकारणाला, समाजाला सोडून निघून गेले, त्यानिमित्त गुरुवार दि.16 जून 2022 ला यावल तालुक्यातील भालोद येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता सखाराम महाजन पतसंस्था सभागृहात हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावल तालुक्यातील तसेच रावेर विधानसभा,रावेर लोकसभा मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणार आहे. हरिभाऊंच्या आठवणी शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना येत नाही असा एकही दिवस उगवला नाही रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आणि निमित्ताने या विकास पुरुषाची सतत आठवण आल्याशिवाय…