Author: Saimat

यावल प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा मधुकराव चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यावल व परिसरातील दिव्यांग बांधवांना सायकल वाटपाचा कार्यक्रम दि.15 रोजी सकाळी यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात पार पडला.या प्रसंगी जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, यावल शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड,कृउबाचे माजी सभापती नितिन चौधरी,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीरखान,सकलेन शेख,नईम शेख,हाजी गफ्फार शाह,अजय बढे,पुंडलीक बारी, विक्की गजरे,काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे,कोरपावली सरपंच विलास अडकमोल,माजी सरपंच जलील पटेल,काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे,यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक अस्लम शेख,समिर मोमिन,सैय्यद…

Read More

ओझर प्रतिनिधी ओझर :- येथील एच ए एल कंपनीच्या सी एस आर निधीतून नव्याने बांधकाम करून देण्यात आलेल्या जि प प्राथमिक शाळेत पहिल्या इयत्तेत दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे पावले उमटवत तसेच त्यांचा सेल्फी फोटो घेत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर मुले क्र २ या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना आपला शाळेचा पहिला दिवस सदैव स्मरणात रहावा यासाठी विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे उमटविण्यात आले व सेल्फी पॉईंट वर सेल्फी देखील घेण्यात आले.सर्वप्रथम विद्यार्थ्यांसोबत पुस्तकांची दिंडी वाजत गाजत काढण्यात येऊन पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत औक्षण करत स्वागत करण्यात आले.त्यानंतर शाळा पुर्व तयारी भाग २ चेही आयोजन करण्यात…

Read More

 भारत गौरव योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन गुरुवारी सकाळी शिर्डीत दाखल झाली आहे. या ट्रेनला मंगळवारी कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर भारतीय रेल्वे सेवेअंतर्गत खासगी ट्रेन प्रथमच धावली आहे. या पहिल्या खाजगी रेल्वेत ८१० प्रवाशांनी कोईम्बतूर ते शिर्डी असा प्रवास केला आहे. रेल्वे विभागाने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला दोन वर्षांसाठी कराराने दिली आहे. ही ट्रेन चालविणार्‍या कंपनीने कोचमध्ये नूतनीकरण केलं. या ट्रेनच्या कोईम्बतूर ते शिर्डी अशा महिन्याला किमान तीन फेऱ्या होणार आहे. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० डबे आहेत. ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल. ट्रेनमध्ये फ्लेमलेस किचनची…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी  चाळीसगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने “जन परिवर्तन पॅनलच्या” प्रचाराचा शुभारंभ आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रामदेवता “आनंदामाता मंदिर” याठिकाणी नारळ फोडून करण्यात आला. यावेळी देवीची आरती करून साकडे घालण्यात आले. जनपरिवर्तन पॅनल “छत्री” निशाणी मिळाली असून सध्या पावसाळा सुरु झाल्याने सर्वसामन्यांना छत्रीची आवश्यकता भासत असते. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण व जनपरिवर्तन पॅनलची छत्री कुणाच्या एकाधिकारशाहीला कात्री लावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जवळपास एक शतकानंतर चाळीसगाव विकास सोसायटीची निवडणूक होत असून आतापर्यंत राजकीय दबाव टाकून, विविध माध्यमातून निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या. एकप्रकारे मतदारांचा हक्क त्यांच्यापासून डावलला जात होता. संस्थेच्या शेकडो सभासदांना आपण चाळीसगाव विकास सोसायटीचे…

Read More

चाळीसगांव-प्रतिनिधी  शाळेतील मुलांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी केडगाव ता.दौंड येथील एक मित्र एक वृक्ष ही संस्था वृक्षसंवर्धनावर आधारित स्पर्धेचे आयोजन करत असते, याच धर्तीवर जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे सन २०२० पासून हरित चाळीसगांव चषक या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठीच्या ह्या दोन्हीही स्पर्धांना विद्यार्थ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुलांना स्थानिक झाडांची माहिती व्हावी, झाडांचे फायदे समजावे यासाठी आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. विद्यार्थ्याच्या झाडाची सर्वांगीण वाढ विचारात घेऊनच त्यांना बक्षीस दिले जाईल. ह्यावर्षी दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हरित चाळीसगांव चषक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी टी. एम. नगर येथील रहिवासी तथा फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हिरानंद टोपणदास मंघवानी (वय 74) यांचे मंगळवारी महाबळेश्‍वर येथे हृदयविकाराने निधन झाले. सिंधी समाजात उच्चशिक्षित, सुसंस्कृत व सेवाभावी व्यक्तित्व अशी हिरानंद यांची ख्याती होती. ते अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, केशवस्मृती सेवा संस्था समूह, कंवरनगर एज्युकेशन सोसायटी, जनता बँक या संस्थांशी जुळलेले होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, जावई, मुलगा, पुतण्या, सून, नातवंडे असा परिवार आहे.ते प्रेम मंघवानी यांचे वडील होत.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी काथार कंठहार वाणी समाज सेवा संघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात त्रैवार्षिक हिशेब, ताळेबंद वाचन व घटना दुरुस्ती करणे यावर चर्चा झाली.त्यानंतर जीवन गौरव पुरस्काराचेे वितरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी विजय वाणी हे होते. यावेळी म्हाडाचे सभापती संजय केणेकर हे उपस्थित होते. सभेत अनंत वाणी यांना जीवन गौरव, वसंत बाविस्कर, विजय वाणी, सुधाकर वाणी, मुकुंद वाणी, नंदकुमार नांदेडकर, डी. एल. वाणी, मोहनदास वाणी, नारायण वाणी, नंदकिशोर कामळस्कर यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच संजय केणेकर, राजेंद्र फुलंब्रीकर, डॉ. विजय बाविस्कर, दीपाली वाणी, वासुदेव वाणी, अजय कामळस्कर, रेखा वाणी यांनाही सन्मान पत्र देण्यात आले. अनिल वाणी यांनी सूत्रसंचालन…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून देशभरात तणाव निर्माण झाला आहे. याबाबत कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल करणे, स्टेटस ठेवणाऱ्यांवर पोलिस सुमोटो कारवाई करून गुन्हा दाखल करणार आहेत. पोलिस ठाणे, सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याचे लोक गोळा करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. नूपुर शर्मा यांच्या संदर्भात पोस्ट करणाऱ्यांवर संबंधित पोलिस ठाण्यात तीन गुन्हे आत्तापर्यंत दाखल झाले आहेत. तर यावल पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव आणल्याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन जमावावर एक गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना गर्दी करणाऱ्यांवर नजर आहे. पोलिस ठाण्यात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कापूस लागवडीला वेग आला आहे. गेल्या आठवडाभरात बागायती कापूस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. तब्बल दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होत असते त्यापैकी दोन लाख हेक्टरवर बागायती कापसाची लागवड होते. यावर्षी ठिबक सिंचनावर ही लागवड वाढली आहे. कापसाला गेल्या हंगामात मिळालेल्या चांगल्या दरामुळे यावर्षी कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. 3 जूनपासून कापसाच्या बियाणे विक्रीवरील बंदी उठवल्यानंतर ठिबकवरील कापूस लागवडीला वेग आला आहे. जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. पावसामुळे वेग… पूर्वमोसमी पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली आहे. पुढील आठवड्यात मान्सूनचे आगमन होण्याची…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यात राबवण्यात आलेला ‘स्कूल कनेक्ट प्रोग्रॅम’सह आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर थेट अभियांत्रिकीत प्रवेश मिळणार आहे. या कारणाने यंदा आयटीआयचे प्रवेश वाढू शकतात. दहावीच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झाला नसला तरी निकालाची वाट न पाहता शासकीय आयटीआयच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध झाली आहे. 17 जूनपासून 21 ट्रेडच्या 940 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 15 जूनपासून संकेतस्थळावर माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. त्याचा लाभ इच्छुक विद्यार्थ्यांना घेता येईल. दोन ट्रेड मंजुरीसाठी प्रस्ताव इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल, ऑपररेटर मेकॅनिकल मशिनिष्ट ट्रेड वाढीव जागांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे. मंजुरीनंतर प्रवेश संख्या वाढेल. 17 जूनपासून अर्ज नोंदणी व निकालानंतर प्रवेश सुरू होतील.…

Read More