Author: Saimat

वडोदरा : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आई हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदाबादला पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या आईचे पाय धुतले, त्यानंतर डोळ्यांना पाणी लावून आईची पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींच्या आईनेही वाढदिवसानिमित्त भेटायला आलेल्या मुलाचे तोंड गोड केले. आई हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले, त्यांनी आईचे पाय धुतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईचे पाय धुतल्यानंतर पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. प्रत्येक वाढदिवसाला पंतप्रधान मोदी त्यांच्या आईसोबत असतात, शनिवारीही ते त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदींनी आई हीराबेन यांना वाढदिवसानिमित्त शाल देऊन त्यांचे तोंड गोड केले. गुजरातमध्ये मातृशक्ती योजनेची सुरुवात शनिवारी पावागड येथील महाकालीचे दर्शन घेतल्यानंतर मोदी हे हेरिटेज वनातील लोकांची भेट…

Read More

पाचोरा ; प्रतिनिधी तालुक्यातील आखतवाडे येथील एका ४५ वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली असून पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील फिर्यादी विरुध्ददेखील आरोपींनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, “पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील अलकाबाई बाबुलाल धिवरे (वय – ४५) यांनी गावातील दौलत देशमुख यांच्या जागेवरुन सोनाबाई कैलास गढरी यांनी दगड उचलून नेल्याचे सांगण्याच्या संशयावरुन आरोपी सोनाबाई कैलास गढरी, दिपाली कैलास गढरी, कैलास नारायण गढरी व परमेश्वर कैलास गढरी सर्व रा. आखतवाडे ता. पाचोरा यांनी फिर्यादी अलकाबाई बाबूलाल धिवरे यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाठ्या…

Read More

मेष राशी: आज मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. सामाजिकदृष्ट्या सक्रिय लोकांना इतरांना मदत करण्यात आनंद होईल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करू शकाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचे कौतुक केले जाईल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. ​वृषभ राशी: आज वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने होतील. नोकरदार लोकांचे सहकाऱ्याशी वाद होऊ शकतात, काळजी घ्या. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत राहतील आणि तुमची चांगली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील ओरीएन इंग्लिशन मेडियम स्कूलमधी विद्यार्थीनी वेदश्री नितीन झोपे हिने दहावी परीक्षेत 94.60 टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळविले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वेदश्री झोपे हिला गणित व सायन्स या विषयांची विशेष आवड असून तिने डिप्लोमा करण्याचे ठरविले आहे. तिला प्राचार्य ब्रुस ॲडरसन शिक्षक निलेश पाटीलल शिक्षिका सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. वेदश्रीचे वडील नितीन झोपे हे ए.टी. झांबरे विद्यालयात तर आई वैशाली झोपे या नंदिनीबाई विद्यालयात शिक्षिका आहेत. तिला आई वडिलांचे देखील मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी विनापरवानगी बोगस शिक्षक भरती संदर्भात जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये शिक्षण विभागातील रागिनी चव्हाण, श्रीमती दिपाली पाटील यांनी यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची चौकशी केली.गेल्या 14 जून 2022 रोजी जिल्हा परिषद जळगाव शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात आली. नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षण संस्थेत विना परवानगी बोगस शिक्षक भरती करण्यात आली तसेच संस्था घटना मुद्दा क्र.25अन्वये संस्थेच्या कार्यरत मंडळाचे डिसेंबर2018 मध्ये कार्यकाळ संपला आहे.असे असताना संस्थेचे अध्यक्ष व संस्थाचालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी व धर्मादाय सहआयुक्त यांची परवानगी न घेता बिना परवानगीने अनधिकृतपणे बोगस शिक्षक भरती केली असल्याचे आढळून आले आहे.…

Read More

येवला ः प्रतिनिधी पुण्यात मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणाने मित्राशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले तसेच ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणासह त्याचे मित्र, आई आणि बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रेहान सय्यद, शाहरुख शेख, सोहेल पठाण तसेच रेहानची आई आणि बहिण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत तरुणी आणि आरोपी रेहान सय्यद ओळखीचे आहेत. रेहानने तिला जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. रेहानने मित्र अरबाज शेखशी संगनमत करुन मोबाइलद्वारे चित्रीकरण केले…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील सुप्रीम कॉलनीत वास्तव्यास असलेल्या रेहमानखॉ उर्फ रेशमा खान या तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. रेहमानखॉ उर्फ रेशमा खान या तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

मुंबई : प्रतिनिधी जून महिन्याचा पंधरवडा ओलांडला तरीही पावसाचा काही थांगपत्ताच नव्हता. पण, अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता आपल्या दारावर धडकण्यासाठी तयार झाला आहे. नुकतीच मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारपासून मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाने यासंदर्भातील अंदाज वर्तवला. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. शनिवारपर्यंत त्याचा प्रवासा पुढील रोखाने सुरु होऊन तो विदर्भातील उर्वरीत भागातही दाखल होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाउस पडेल. दरम्यान, कुठे मान्सून तग धरत नाही तर कुठे एकाएकी आलेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच…

Read More

मुंबई : प्रतिनिधी बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता मागोमागच इयत्ता 10 वी परीक्षांचे निकालही जाहीर झाले आहेत. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्यात आल्याचे सांगत शिक्षण मंडळांकडून सुरुवातीला काही मुद्दे स्पष्ट करुन सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आले आहेत. नऊ विभागीय मंडळातून 15 लाखांहून अधिक नियमित विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. यंदाच्या परीक्षांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर मुलींनी यंदाही…

Read More