मुंबई : प्रतिनिधि राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईतल्या अनेक उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. इतकंच नाही तर आज हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस कोसळेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता असून पुण्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. यामुळे घाट माथ्यावर जोरदार पावसाने…
Author: Saimat
जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आपले लक्ष्य ठरवले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपचे अनेक सत्तास्थाने हातून गेले आहे. भाजपचे (BJP) नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचीदेखील कोंडी झाली. अशातच राष्ट्रवादीने खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत महाजनांची आणखी कोंडी केली आहे. त्यामुळे खडसे यांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी महाजनांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ही बातमी पण वाचा : शिवसेनेचं ठरलं ; विधान परिषदेत ४ मते काँग्रेसला देणार राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या यादीत त्यांचा नावाचा…
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेतील पराभवानंतर आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने भाजपाला पराभूत करण्यासाठी मोट बांधली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून अतिरिक्त ४ मते काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पारड्यात टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भांत काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेची चार ते पाच मतं काँग्रेसला देणार असल्याचे आश्वासन काँग्रेसला दिले आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. मतांचा कोटा गाठण्यासाठी छोटे पक्ष, अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक…
मलकापूर प्रतिनिधी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन च्या वतीने विभागीय क्रिडा संकुल गारखेडा औरंगाबाद येथे दि ३० जून ते २ जुलै दरम्यान आयोजित ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिक्यपद स्पधेसाठी भाग घेनाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पर्धा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्त साधुन बॅडमिंटन स्पोर्टस् असोशिएशन ऑफ बुलढाणा व विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ जुन पासुन जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले अहं. १३ व १९ वयोगटातील मुले-मुली यांच्या स्पर्धा दि. २२ जुन ला सिंगल व डबल्स अश्या स्पर्धा राहणार असून सदर जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पधेतुन बुलढाणा जिल्हा संघाची निवड केली जाणार असून हा संघ…
सोयगाव प्रतिनिधी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षाचा 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आबासाहेब काळे, नगर पंचायततील शिवसेना गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, गजानन कुडके,भगवान जोहरे,हर्षल काळे,लतिफ शहा,अशोक खेडकर तसेच ,राजू दुतोंडे,किशोर मापारी,डॉ.फुसे,रमेश गव्हांडे, शेख बबलू,शरीफ शहा,जावेद पिंजारी,अकील शेख,योगेश नागपुरे सह इतर शिवसैनिकांची उपस्थिती होती.
सोयगाव तालुका प्रतिनिधी तालुका कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून आत्महत्या ग्रस्त आणि कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला शेतकऱ्यांना तूर कीटचे मोफत वितरण करण्यात आले आहे.त्यामुळे खरिपाच्या हंगामात या महिला शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोयगाव तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे वारस आणि कोरोनामुळे निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना खरिपाच्या हंगामासाठी मदत म्हणून तूर कीटचे मोफत वितरण करण्यात आले यामध्ये तब्बल १२५ शेतकऱ्यांपर्यंत हि मदत पोहचली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संगीता पवार यांनी दिली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.तालुका कृषी विभागाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात प्राप्त लक्षांकानुसार मदतीचे वाटप पूर्ण झाले असून दुसया टप्प्यातही पुन्हा या…
यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयाची व दलित वस्तीत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी निळे निशान सामाजिक संघटना जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी केली आहे. जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि 16 जून 2022 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,शासनातर्फे स्वच्छता अभियान यशस्वी होण्याकरिता लाखो रुपयांचा खर्च केला जातो परंतु ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामविस्तार अधिकारी ठेकेदार संबंधितानी सार्वजनिक शौचालयाचे निकृष्ट प्रतीचे आणि थातूरमातुर अपूर्ण कामे केले जातात ती अपूर्ण कामे पूर्ण दाखवून बिले काढण्यात आली आहेत काही कामे वर्क ऑडर येण्या अगोदर आपल्या मार्जितील कामे दाखवून कामे सुरु करण्यात आली आहे.या…
यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात नावारूपाला आलेली अठरा वर्षा पासूनची विश्वसनीय शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल.या शाळेतील सन 2021-22 या वर्षाची पहिली दहावीच्या वर्गाची बॅचने घवघवीत यश संपादन केले. यात यावर्षी दहावीचे दहा विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन करून शाळेचे नाव लौकिक केले नर्सरी पासून ते दहावीपर्यंतचे आपल्या शाळेत असलेले हे विद्यार्थी 100% निकालाने पास झाले. त्यातील 90% मुले हे डिस्टिंक्शन मध्ये आले आहेत.पृथ्वी रमेश तायडे 86% मिळवत शाळेत सर्व प्रथम आली. तमन्ना फिरोज तडवी ही 83.80 % मिळून द्वितीय आली.ओम चौधरी 83.40% तर हिमांशू तडवी 82.40%, युगल नाफडे 80.20%,शेख बाशीद याला 77%,अबरार खान76%, जुनेद…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिकमध्ये देखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 75 नवे कोरणा बाधित आढळले आहेत. एका दिवसात 36 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे कुरणा बधितांचा आकडा 158 वर गेला आहे नाशिक शहरात यातील सर्वाधिक 103 बाधित आहेत. आतापर्यबत केवळ शहरात 4105 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाची संख्या नाशिक शहरासाठी पुन्हा ही धोक्याची घंटा आहे. हळूहळू घट्ट होणारा विळखा टाळण्यासाठी आरोग्य प्रशासनानं आतापासून कठोर भूमिका घेण्याची गरज आहे राज्यात आज 4 हजार 4 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात…
एरंडोल ; प्रतिनिधी तालुक्यातील नांदखुर्द येथील माहेर असलेल्या विवाहितेला नोकरीसाठी माहेरहून साडे तीन लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील नांदखुर्द येथील माहेर असलेल्या दिपीका तुषार पाटील याचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील तुषार बाजीराव पाटील यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती तुषार पाटील याने नोकरीसाठी माहेरहून साडे तीन लाख रूपये आणावे अशी मागणी केली. पैशांची पुर्तता न केल्याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या छळाला कंटाळून विवाहिता माहेर निघून आल्या. शनिवारी १८…