Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव – पाचारो रोडवर असलेल्या जैन व्हॅली कंपनीजवळ असलेल्या राजपाल नगर येथे महिलेचा आज सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मयत महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छदेनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये समजल्यावरच या महिलेचा मारहाणीत खून की पाय घसरून पडल्याचे स्पष्ट होणार आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव – पाचोरा रस्त्यालगत असलेल्या जैन व्हॅली जवळ असलेल्या राजपाल नगरातील रहिवासी भाऊलाल भिल हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या पत्नी या दोघंही जैन व्हॅली येथे मजूरी करून आपल्या कुटूंबातील सहा मुली व एक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भडगाव तालुकयात दोन वर्षाच्या मुलीला विहिरीत फेकून खून करणाऱ्या फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काकनबर्डी येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जितेंद्र उर्फ नाना जंगलू ठाकरे रा. कराब ता. भडगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, जितेंद्र ठाकरे याचे पत्नीसोबत वाद झाला होता. या वादातून त्याने त्याची दोन वर्षाची मुलगीला घेवून जावून विहिरीत फेकून दिले. तिला फेकत असतांना परिसरातील नागरीकांनी पाहिले असता जितेंद्र ठाकरेने विहिरीत उडी घेतली. दरम्यान, नागरीकांनी त्याला विहीरीतून बाहेर काढून भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान संशयित जितेंद्र ठाकरे हा…

Read More

मेष राशी: मेष राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नात वाढ शक्य आहे. तुमच्याकडे नवीन गोष्टी असतील ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान होईल. आज महिला घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. कुटुंबियांकडून शुभवार्ता मिळतील. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आज ८५% नशिबाची साथ आहे. हनुमानाची पूजा करावी. वृषभ राशी: वृषभ राशीचे लोक कामाच्या ठिकाणी नवीन समीकरणांमुळे संपूर्ण वेळ व्यस्त राहतील. काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते आणि इच्छित ठिकाणी बदली देखील शक्य आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांसोबत काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद शाळेस भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार काल रोजी नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार शिरीषदादा चौधरी,आमदार संजयभाऊ सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया,आदिवासी प्रकल्प अधिकारी सौ.सोनवणे मॅडम,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,माध्यमिक शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व केंद्रप्रमुख किशोर चौधरी सर यांनी हा पुरस्कार स्विकारला.हा पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून शाळेचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी सर्वेक्षण द्वारा स्वयंमूल्यमापन पूर्ण करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.त्यानंतर पर्यवेक्षीय यंत्रणेद्वारे बाह्य मूल्यमापन…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील किनगाव हे बऱ्हाणपूर–अंकलेश्वर या महामार्गावरील मुख्य बाजार पेठेचे गाव आहे,आणि राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे किनगाव नायगांव लोकांची मोठ्याप्रमाणात रहदारी व वाहतूक प्रमाणात होत असते. किनगाव नायगाव रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडलेला आहे या पडलेल्या खड्ड्यांमुळे किनगाव ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद विभाग संबंधित कर्मचाऱ्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने किनगाव,नायगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच हा पडलेला खड्डा संबंधितांनी तात्काळ दुरुस्त न केल्यास हिंदवी स्वराज्य सेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. किनगाव नायगांव मुख्य रस्त्यावर किनगाव मधील तडवी वाड्यात एका गटारी वरचा धाप्याचा भाग खुप दिवसापासून तुटलेला आहे त्याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे परंतु याकडे…

Read More

मुबंई : प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपतर्फे मविआ आमदारांना धमकावले जात असल्याचा आरोप आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर पराभवानंतर काय कारणे सांगायची, याची तयारी पटोलेंनी आताच सुरू केली आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच, मविआच्या आमदारांना धमकावल्याची कॉल रेकॉर्डिंग नाना पटोलेंकडे असेल, तर त्यांनी ती पत्रकारांसमोर आणावीत, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजपचे पाचही उमेदवार जिंकतील चंद्रकांत पाटील म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान आहे. भाजपचे पाचही उमेदवार या निवडणुकीत जिंकतील. मविआने कितीही दावा केला तरी त्यांचा एक उमेदवार पराभूत होईल. फक्त तो कोणत्या पक्षाचा असेल,…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी माजी आमदार तथा खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांची 16 जून रोजी असलेल्या द्वितीय पुण्यतिथी निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या वतीने यावल तालुक्यातील वाघळूद येथील जिल्हा परिषद शाळेत 30 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यात अक्षरमित्र पुस्तक, पाटी, वही, पेन्सिल, खोडरबर हे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग.स.संचालक योगेश इंगळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजय पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, अंतर्नादचे सदस्य जीवन महाजन उपस्थित होते. स्व.हरिभाऊ जावळे यांची पुण्यतिथी सामाजिक बांधिलकी जोपासून उपक्रम राबवित वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे.हे समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ग.स.संचालक योगेश इंगळे यांनी केले.स्व.हरिभाऊनी त्यांच्या कार्यकाळात सर्वच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पावसाळा सुरु झाला तरी शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाही. जी झाली ती एका पावसात वाहून जातील. त्यामुळे थर्डपार्टी ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही मक्तेदाराचे पेमेंट करू नका अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काल केली. तर आमदारांना दरवर्षी पाच कोटी विकासनिधी मिळतो. त्यांनी आतापर्यंत एकदाही रस्त्यांसाठी निधी दिलेला नाही. तो दिला असता तर चित्र वेगळे असते असा मुद्दा माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी उपस्थित करीत आ. राजूमामा भोळे यांच्यावर पलटवार केला. भोळेंनी रस्त्यांसाठी निधी दिला नाही : नितीन लढ्ढा आमदारांना मतदार संघाच्या विकासासाठी दरवर्षी पाच कोटींचा निधी मिळतो.पाच वर्षात 25 कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ट्रॅफिक विभागाचे काम काय आहे, वाहतूक सुरळीत करणे की वसूली करणे? एका बाजूला वाहतूक कोंडी झालेली असताना वाहतूक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करून वाहनचालकाकडे कागदपत्रे तपासून वसूली करतात. त्यांना विचारले असता, आम्हाला वरुन टार्गेट देण्यात आले असल्याचे सांगतात. त्यांना कोणी टार्गेट दिले आहे का? असा गंभीर आरोप माजी पालकमंत्री तथा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. नियोजन भवनात ही बैठक झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावर पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना देऊन विषयावर तात्पुरता पडदा टाकला. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. ती सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक असताना…

Read More