Author: Saimat

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव ग्रीन फाउंडेशन सिटी तर्फे देवेंद्र नगर परिसरात असलेल्या पटांगणावर पोलीस महानिरीक्षक तुरुंग विभाग डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा वन अधिकारी ए प्रवीण, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपक परदेशी, डॉ. धनंजय बेंद्रे, जिल्हा बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख, आरएफओ समाधान पाटील, मनसेचे जिल्हाप्रमुख जमील देशपांडे, हरित सेनेचे प्रविण पाटील आदींसह वृक्षप्रेमींच्या हातून १११ रोपांची लागवड करण्यात आली. या वेळेला सर्व वृक्षप्रेमी मंडळी आवर्जून उपस्थित होती. या कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कर्नल इंद्रनील अवस्थी कॅप्टन तसेच अग्निवीर यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान, या सर्व रोपांची संवर्धन करण्याची जबाबदारी…

Read More

विषेश प्रतिनिधी | जळगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवार,22 जून रोजी जळगाव येथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ येथील आदित्य लॉनवर सभा झाली. सभेला गर्दी म्हणून आलेले शिक्षक भाड्याचे होते.या सभेनंतर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने थोडीबहुत नीतिमत्ता शिल्लक असलेल्या शिक्षकांनी गरीब होऊन सभेत भाडोत्री यावे, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचारी तसेच संस्थाचालक यांची आज आदित्य लोन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव येथे किशोर दराडे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आले होते.यांच्या सभेनंतर जे शिक्षक आले होते, त्यांना…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी : (हेमंत काळुंखे) आज बकरी ईद.१७ जूनला देशभरात मुस्लिम समाजाकडून बकरी ईद हा सण साजरा केला जात आहे.त्याची तयारी जळगाव शहरासह जिल्ह्यातही पूर्ण झाली आहे. मुस्लिम बांधवांकडून वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश आहे. रमजान ईद झाल्यावर सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे, ज्याचा कुराणमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.त्यानुसार कुर्बानीची तयारी सात-आठ दिवस अगोदरच केली जाते.जळगावात शनिवारी गुरांचा बाजार भरतो त्यामुळे १५ जून रोजीच कुर्बानीचा बोकड खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी उसळल्याचे दिसून आले.सकाळी सात वाजेपासून तर…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी (विवेक ठाकरे) लोकसभेचा निकाल लागून अवघ्या दहा दिवसांचाच कालावधी लोटला अनं जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरु झाल्या.हे द्वव यापूढे जात आ. किशोरआप्पा पाटील यांच्या एकेरी भाषेमुळे आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रतिआव्हानाने चर्चेत असले तरी राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीत असलेल्या या दोघांची ही चढाओढ सद्यातरी नुराकुस्ती म्हटले तर वावगे ठरू नये.याउलट परिस्थिती असल्यास म्हणजे भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे मागील वेळेप्रमाणे बंडखोरी करू शकतात किंवा भाजपच्या वरिष्ठानी कदाचित त्यांना लढण्याचा हिरवा कंदील दिल्याच्या माहितीमुळे विद्यमान आमदारांची आदळआपट आतापासूनच सुरु झाली असावी. महत्वाचे फक्त श्रेयाच्या या लढाईत ऐन खरीपाच्या हंगामाच्या धामधूमीत शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी आज च्या तरुणाईने एकमेका विरुद्ध असलेले धार्मिक द्वेष भावना सोडून आपण भारतीय आहोत व भारत देशाचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्यास आपसातील मतभेद व मनभेद होणार नाही असे भावनिक आवाहन बबनराव आव्हाड यांनी केले. बकर ईद निमित्त एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे झालेल्या शांतता समितीच्या सभेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड बोलत असताना त्यांनी तरुणांना उद्देशून अत्यंत मार्मिक व रोखठोक असे मत मांडून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. उपस्थिता पैकी मणियार बिरादरीचे फारुक शेख यांनी आपले विचार मांडताना पोलीस दलाने शिक्षेकडून शिक्षणाकडे न वळता प्रथम कायद्याचे व त्या पासून होणारे फायदे तोटे शिक्षणा द्वारे समजावे व त्यानंतर शिक्षा…

Read More

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचा चांगला विकास व्हावा यासाठी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून दोन्हीही नेते एकत्र येऊन पुन्हा हातात हात घेऊन काम करतील असा मला विश्वास आहे,असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले. आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यावर ना.श्रीमती खडसे यांचे पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन झाले आहे.मुक्ताईनगर येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.या पार्श्वभूमीवर त्यांनी नाथाभाऊ व गिरीषभाऊ यांना एकत्र आणण्याचा आपला मनोदय बोलून दाखवल्यावर या बाबीचे अनेकांनी स्वागत केले आहे. मंत्री श्रीमती रक्षाताई म्हणाल्या की,नाथाभाऊ मोठे नेते आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे…

Read More

विशेष प्रतिनिधी | जळगाव : रब्बी हंगामात घरी आलेली ज्वारी हमीभावात खरेदी करण्याची शासनाची घोषणा कुचकामी ठरली असून फक्त 30 जूनपर्यंतच शासन ज्वारी खरेदी करणार आहे.जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली असताना जिल्ह्यातील अठरा खरेदी केंद्रापैकी आज (15 जून) अखेर फक्त दहा केंद्र सुरु झाल्याने उर्वरित पंधरा दिवसात खरेदी होऊच शकत नाही,अशी भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, जळगाव जिल्ह्याला फक्त 30 हजार क्विंटल ज्वारी खरेदीची मर्यादा असल्याने निम्मे अधिक शेतकऱ्यांना आपली ज्वारी बाजारभावाने कमी दरात विक्री करावी लागणार आहे. हमीभावाने शेतमाल खरेदीच्या नावावर शेतकऱ्यांची होते थट्टा : एकीकडे शासन मोठा गाजावाजा करून हमीभावात वाढ केल्याचे सत्तेतील लोकप्रतिनिधी सांगत असतात…

Read More

साईमत जामनेर प्रतिनिधी दी.९ रोजी तालुक्यातील चिंचखेडा बू. येथे ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तीला ठार मारल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेचा निषेध म्हणून जामनेरात आदिवासी बांधवांच्या वतीने येथील राजमाता जिजाऊ चौकातून तहसील कार्यालयावर दी.१३ रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना या घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संशईत आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात याचिका दाखल करून आरोपीस फाशीची देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थितीत होते. या घटनेचा संपुर्ण महाराष्ट्रात निषेद व्यक्त करण्यात येत असून काल दी.१३ रोजी जामनेर…

Read More

साईमत प्रतिनिधी मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्तेत दाखल होताच जनतेसाठी एक दिलासा पूर्वक निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने मोफत आधार कार्ड अपडते करण्यासाठी मुदत पुन्हा वाढवुन दिली आहे. गेल्या अनेक वर्ष पासून ही मुदत सातत्याने सरकारकडून वाढविण्यात येत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट, वीजेचा लपंडाव पाहता सरकारकडून मुदत वाढ दिली असेल. त्यामुळे देशातील कोट्यवधी जनतेला त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपला खिसा रिकामा करावा लागणार नाही. आधार कार्डला दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर त्याला अपडेट करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड मोफत रित्या अपडेट करण्यासाठी यापूर्वीची तारीख 14 मार्च होती.त्याला 14 जून, 2024 रोजीपर्यंत सरकत तर्फे मुदत वाढ देण्यात…

Read More

साईमत रावेर प्रतिनिधी तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षकाला दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगाव लाच लुचपत विभागाने रंगेहात पडकल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सदर कारवाई दि. १२ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार संशयित आरोपी कैलास ठाकूर नामक असल्याचे समजते. दरम्यान, संशयितास ताब्यात घेण्यात आले असून पथक जळगाव कडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Read More