साईमत जळगाव प्रतिनिधी
आज च्या तरुणाईने एकमेका विरुद्ध असलेले धार्मिक द्वेष भावना सोडून आपण भारतीय आहोत व भारत देशाचे हित जोपासण्याचा प्रयत्न केल्यास आपसातील मतभेद व मनभेद होणार नाही असे भावनिक आवाहन बबनराव आव्हाड यांनी केले.
बकर ईद निमित्त एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे झालेल्या शांतता समितीच्या सभेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड बोलत असताना त्यांनी तरुणांना उद्देशून अत्यंत मार्मिक व रोखठोक असे मत मांडून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले.
उपस्थिता पैकी मणियार बिरादरीचे फारुक शेख यांनी आपले विचार मांडताना पोलीस दलाने शिक्षेकडून शिक्षणाकडे न वळता प्रथम कायद्याचे व त्या पासून होणारे फायदे तोटे शिक्षणा द्वारे समजावे व त्यानंतर शिक्षा करावी.तसेच दोन्ही समाजातील तरुणांनी देश हित जोपासावे व आव्हाड साहेबांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन सुद्धा केले.
अयाज अली यांनी सुद्धा दोन्ही समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले तर नगरसेवक रियाज बागवान यांनी सुद्धा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असे आश्वासन दिले. डोणगाव चे पोलीस पाटील यांनी सुद्धा मतभेद असावे मनभेद नसावे असे सांगितले. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विश्वास बोरसे यांनी सूत्रसंचालन केले तर यांनी ग्रेड पो उप निरीक्षक उगले. यांनी आभार मानले.