साईमत / जळगाव / विशेष प्रतिनिधी जन्मताः दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने राज्यभर जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करून अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा आज मंगळवार,6 ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषद करण्यात आली.द स्माईल ट्रेन या संस्थेच्या माध्यमातून आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल व रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने 11 हजार 500 दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या राज्यातील व परराज्यातील रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना सौंदर्य व समाजात सन्मानाचं स्थान देण्याचं करण्यात आले आहे.अशी माहिती रेड स्वस्तिकचे राज्य सचिव…
Author: Saimat
साईमत / जळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई च्या वतीने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने शाळांसमोर बिकट समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासंदर्भात संघटनांच्या वतीने शासन दरवारी निवेदने देऊन पाठपुरावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. परंतु शासनाने हे प्रश्न सोडविण्यासाठी उदासिनतेचे धोरण अवलंबिलेले आहे. शाळांसमोर हे प्रश्न व त्यावरील उपाय मान्य झाल्याशिवाय प्रशासन सुकर होणार नाही. यासाठी विविध मागण्याचे निवेदन जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या वतीने जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. यावेळी शैक्षणिक व्यासपिठाचे अध्यक्ष जे.के. पाटील, समन्वयक एस्.डी. भिरुड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाची मंगळवारी दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी वृक्षारोपण देखील केले. चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम वेगात सुरु आहे. याठिकाणी महाविद्यालय, रुग्णालय, वसतिगृह, अतिथीगृह, प्राध्यापक निवासस्थान, अधिष्ठाता कार्यालय असे विविध प्रकल्प उभारले जाणार आहे. मंगळवारी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, संजय चौधरी यांनी पाहणी केली. यावेळी एचएससीसी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संदीप…
नाशिक रोड आरपीएफ कार्यालयातून होणार पाहणी साईमत/नाशिक/प्रतिनिधी : आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प, इगतपुरी, मनमाड रेल्वे स्थानकावर दर्जात्मक आणि गुणात्मक बदल होत आहे. वाढणारी गर्दी व सुरक्षेचे कारण लक्षात घेता देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन येथे सध्या ३८ सीसीटीव्ही बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सीसीटीव्हीचा रिमोट कंट्रोल नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस फोर्स कार्यालयात असणार असल्यामुळे नाशिक रोड येथील कर्मचारी थेट देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाचे २४ तास निरीक्षण करणार आहेत. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प हे दोन महत्त्वाचे स्टेशन मानले जातात. विशेष करून देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकामध्ये सैन्य दलातील जवान प्रवास…
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देणाऱ्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक सतीश साहेबराव सूर्यवंशी लिखित व ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिकद्वारा प्रकाशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देणाऱ्या आगळ्या वेगळ्या माझी शाळा… माझा उपक्रमाद्वारे ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तकाचे प्रकाशन शेठ नारायण बंकट वाचनालयात नुकतेच करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशन न्या.संगीतराव पाटील, उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मछिंद्र राठोड, चिटणीस राजेश राठोड, सेवानिवृत्त ज्येष्ठ मुख्याध्यापक एम.डी. बागुल, प्राचार्य बी.पी. पाटील, प्राचार्य एस.एस. राठोड, मुख्याध्यापिका मीना बागुल, पर्यवेक्षक सी.डी. पाटील व लेखक सतीश…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमुळे विद्यार्थी पुस्तके विसरले आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावली पाहिजे, त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांची आवड निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने हिंदी मराठी विभागातर्फे मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मेहरूण येथे पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शालेय ग्रंथालयातील सर्व हिंदी व मराठी विषयांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांची यादी करून या शैक्षणिक वर्षात वाचण्याची शपथ घेतली. पुस्तक मैत्री आणि हिंदी-मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हिंदी मराठी विभागाने या प्रदर्शनाची जबाबदारी घेतली. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक शेख हफीज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. सदर नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते करण्यात आल्या आहे. जळगाव तालुका अध्यक्षपदी प्रदीप पाटील, जळगाव तालुका उपाध्यक्षपदी देवेंद्र माळी, जळगाव तालुका सचिवपदी मनोज लोहार, जळगाव तालुका संघटकपदी विलास सोनार, जळगाव शहर सचिवपदी हर्षल वाणी, एरंडोल तालुका संघटकपदी शुभम महाजन, एरंडोल तालुका सचिवपदी देवानंद घुले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा,केळीला फळाचा दर्जा मिळावा, हमीभाव योग्य प्रमाणात मिळावा,शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना योजनाचा लाभ मिळवुन देण्यासाठी आमचा पक्ष काम करणार असल्याचे अमोल भिसे यांनी या…
साईमत / जळगाव / प्रतिनिधी मानराज पार्क हुंडाई शोरुम शेजारील रस्ता पिंप्राळा परिसरात जाण्यासाठी सोयीचा आहे. म्हणून हा रस्ता सुरु करण्यासाठी कायदेशीर लढ्यातून या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याच्या उद्देशाने हा सिमेंट कॉक्रीटचा बनविण्यास सुरवात करण्यात आली होती. मग मध्येच कुठ माशी शिंकली कि हा रस्ता अर्धवट सोडून काम बंद करण्यात आले आहे. या रस्त्याच्या काम बंद करण्यामागे कोण झारीतील शुक्राचार्य आहे असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला असून प्रशासनाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनमधून होत आहे. मानराज पार्क हुंडाई शोरुम ची बाजूचा रस्ता पिंप्राळा पर्साराला जोडतो या गल्लीमध्ये हुंडाई…
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दि. 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत ‘इनोव्हेशन स्ट्रॅटेजी इन इंग्लिश लँग्वेज’ या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इंग्लिश कम्युनिकेशन कोच आणि मोटिवेशन ट्रेनर भरत आर. साळवे सर यांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापकांना या पाच दिवसीय कार्यक्रमांमध्ये लाभणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी कार्यक्रमासाठी लाभलेले मुख्य वक्ते भरत आर. साळवे सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रमाकांत चौधरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक संदीप खाचणे, नितीन खर्चे, योगेश सुशीर,…
साईमत/न्यूज नेटवर्क/जळगाव भारतीय डाक विभाग व नवी दिल्ली येथे जळगाव येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू व प्रशिक्षक श्री. सुमेध प्रदीप तळवेलकर यांची थेट नियुक्ती दिल्ली येथे डाक विभागात करण्यात आली आहे. सुमेधने तीन वेळा भारतीय सॉफ्टबॉल संघाचे प्रतिनिधित्व केलेले असून नॅशनल गेम्स मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे तसेच सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत चार वेळा अजिंक्य प्राप्त केलेले आहे. सुमेध बरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी प्रियंका नहाळे, प्रवीण दवे,किशन कुमार,प्रकाश कुमार या आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडूंनाही डाक विभागात संधी मिळाली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल मा.ना गिरीश महाजन, मा. आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे ,पी.ही पाटोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक प्रशिक्षक किशोर चौधरी, राज्य सॉफ्टबॉल…