Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :- जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. ही बातमी पण वाचा : खडसेंनी व्यक्त केली कृतज्ञता ;शरद पवारांनी मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता मंत्र्याकडील खातेवाटपात बदल : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे…

Read More

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत बंडाचा झेंडा रोवणारे आणि गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये सध्या वास्तव्यास असलेले एकनाथ शिंदे  यांच्यासह आठ मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. या मंत्र्यांनी बंडखोरी केल्याने प्रशासकीय आणि सार्वजनिक कामे रखडली आहेत. परिणामी, सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही याचिका आज सादर करण्यात आली. तसेच याचिकेत उपस्थित मुद्यावरून त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. मात्र तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. सातजणांनी ही याचिका केली आहे. या मंत्र्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी बंडखोरी केली आहे. त्यांनी असे करून आपल्या घटनात्मक कर्तव्याशी…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :- संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता,असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनियुक्त आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले आहे. भाजपमध्ये असताना मी प्रामाणिकपणे काम केले. मात्र तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राजकारण इतक्या खालच्या स्तराला जाते हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले आहे. यानंतर माझ्या कुटुंबालाही त्रास देण्यात आला. गेल्या आठवड्यात माझ्या बँकखाते गाेठवून खात्यात एक रुपयाही ठेवलेला नाही. त्यानंतर राहते घर १० दिवसांत रिकामे करण्याची नोटीस आली. न्यायालयातून जाऊन स्टे आणला म्हणून त्या घरात राहत आहे. माझ्या हातात इतकी ताकद…

Read More

मुंबई :- अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘आमचं बाळ…लवकरचं येत आहे’, यासोबतच तिने तिच्या सोनोग्राफीचा फोटोही शेअर केला आहे. या पोस्टवरून रणबीर-आलीय लवकरच आई -बाबा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आलियाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर देखील दिसत आहे. फोटोमध्ये आलिया खूप आनंदी दिसत आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी आलिया आणि रणबीर यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर सेलिब्रेटी सुद्धा कमेंट करत दोघानांही शुभेच्छा दिल्या. रणबीर कपूरची बहीण रिधिमा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन केलं. यावेळेस संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात तापलेले वातावरण शांत होण्याची कोणतीही चिन्हं सध्या दिसत नाहीये. शिवसेनेचे 39 आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे ही घटना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील बंडाळी सर्वांसमोर आली. अनेक आमदार सूरत आणि नंतर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला सामील झाले आहेत. काही आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही शिंदे गटाला सामील झाले आहे. यामध्ये सेनेचे महत्वाचे नेते गुलाबराव…

Read More

धरणगाव ः प्रतिनिधी एकीकडे राज्याचे राजकीय वातावरण बंडखोरीमुळे ढवळून निघालेले असताना दुसरीकडे धरणगाव नगरपालिकेत 20 कोटींचा अपहार झाला असून याबाबत धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याचिकाकर्ते श्री. महाजन यांच्या वतीने ॲड.भूषण महाजन हे कामकाज बघत आहेत. धरणगाव पालिकेच्या 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात जवळपास 20 कोटींच्या रकमेची अनियमितता तसेच अफरातफरी नमूद केल्या आहेत. त्या अहवालाच्या अनुषंगाने धरणगाव येथील जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे सचिव, धरणगाव पोलीस स्टेशन, पोलिस अधिक्षक यांच्याकडे गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार केली होती.…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी समाज परिवर्तनाचा आधार म्हणजे राजकारण असते. मात्र, तेथेही पदोपदी मनाच्या विपरीत घटना, घडामोडी घडतात. चढ-उताराची परिस्थिती निर्माण होऊन पक्षनिष्ठा, राजकीय चारित्र्याचा कस लागतो. अशावेळी पक्षासोबत एकनिष्ठ राहून समर्पित भावनेने काम करणारे माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्यासारखे मोजके कार्यकर्ते वेगळे ठरतात, असे मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले. भालोद येथे स्व.हरिभाऊ जावळे स्मृतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

Read More

जामनेर/ चोपडा/ भुसावळ ः साईमत चमूकडून मुंबईहून आलेले रावेर लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख विलास पारकर व जामनेर विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांनी पारकर यांना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे रक्ताच्या शाईचे पत्र सुपुर्द केले.दरम्यान त्यांनी भुसावळ ,चोपडा व शेंदुर्णी येथेही बैठका घेऊन शिवसैनिकांना जनतेला सत्य परिस्थिती सांगून,नवे कार्यकर्ते जोडून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. जामनेर येथे तालुका विधानसभा क्षेत्राची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, जामनेर विधानसभा संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील उपस्थित होते. या वेळी जामनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या रक्ताच्या शाईने पत्र लिहून पाठिंबा दर्शवला.…

Read More

साईमत लाईव्ह भडगाव प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव येथे दिनांक 24 च्या मध्यरात्री कजगाव पारोळा रस्त्यावरील उड्डाण पुलावर आठ लाख रुपये किमतीचे जनरेटर चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता पारेकरी ला जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला व ते पळून जाण्यास यशस्वी ठरले होते मात्र भडगाव पोलिसांनी चोरी ला 48 तास होत नाही तोच आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. चोरीतील आरोपींची नावे कुमार सिंग राजपूत 23 वर्ष राहणार चाळीसगाव गणेश महेंद्र पवार वय 21 वर्ष राहणार चाळीसगाव ऋषिकेश राहुल कासार वय 18 वर्ष आठ महिने राहणार चाळीसगाव वाल्मीक ऊर्फ रमेश सोमनाथ सुपेकर वय वीस वर्ष राहणार चाळीसगाव असे एकूण पाच आरोपींवर भादवि…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी आरपीएफ व वाणिज्य विभागाच्या संयुक्त पथकाने विविध स्थानकांवर शनिवारी अचानक तिकीट तपासणी केली. या मोहिमेत 180 तिकीट तपासणीस, 140 रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी 46 रेल्वे गाड्या व जंक्शनवर तपासणी केली. त्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 6 हजार 506 प्रवाशांकडून 37 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेतून अनेक फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याने त्याचा परिणाम रेल्वेच्या तिकीट खिडकीवर होत आहे. यामुळे डीआरएम एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे, आरपीएफ आयुक्त क्षितिज गुरव यांनी शनिवारी सकाळी 6 वाजेपासून विविध रेल्वे स्थानकांत 30 पथकांद्वारे 46 गाड्यांमध्ये 37 लाखांचा दंड वसूल केला.या मोहिमेमुळे फुकट प्रवास करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली…

Read More