Author: Saimat

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आलेला आहे. महाविकास आघाडी सरकार कुठल्याही क्षणी पडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बंडखोर आमदार आपला स्वतंत्र गट स्थापन करणार, भाजपसोबत जाणार? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाने आपल्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे या गटाचे नामकरण करण्यात आले आहे. बंडखोर आमदारांच्या बैठकीत खूप विचार करून हे नाव ठरवण्यात आल्याची माहिती पुढे आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे नाही, यावरही निर्णय झाला आहे. दरम्यान, पुढील काही तासांमध्ये या सगळ्या राजकीय नाट्यामागे भाजपचा सहभाग आहे की…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलात स्व.अक्षय प्रकाश महाजन हे (क्युआरटी कंमाडो) कार्यरत होते. त्यांचा कोरोना काळात दुर्देवी मृत्यू ओढवला गेला. अशा या कोरोना योध्दाच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा पोलिस दलातर्फे नविन इमारतीत थंड पाण्याचा आर.ओ. तसेच शितशव पेटीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे यांच्याहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी स्व.अक्षय महाजन यांच्या पत्नी रिना अक्षय महाजन, चि.रिदम अक्षय महाजन हे उपस्थित होते. तसेच यावेळी पोलिस उपअधिक्षक संदीप गावीत, राखीव पोलिस दलाचे पोलिस निरिक्षक संतोष सोनवणे, तसेच 2014 च्या बॅचचे अंमलदार उपस्थित होते.

Read More

मुंबई / गुवाहाटी : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकार पडलं तरी भाजप सरकार स्थापन करणार नाही, अशी शक्यता आहे. तर शिंदे गटाला भाजपात घेऊन निवडणूक लढवणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. राजकीय पेचप्रसंगावर दीड ते दोन तास मंथन झाले आहे. गुवाहाटीतील हॉटेलमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना गटात शिवसेनेचे 38 आमदार आहेत. एकनाथ शिंदेंनी काल गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लू मधून बाहेर पडत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. काल दुपारी साडेबाराच्या सुमारास एकनाथ शिंदे अचानक…

Read More

दिल्ली : पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी टाका, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या महिला नेत्या जया ठाकूर यांनी दाखल केली आहे. शिवसेनेचेनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तापेच निर्माण झालेला असताना या याचिकेला विशेष महत्त्व आले आहे. या याचिकेवर २९ जून रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे. सभागृहाचा सदस्य दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरविण्यात आला असेल तर त्याला पुढील पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावर जानेवारी २०२१ मध्ये रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्या रिट याचिकेवर…

Read More

जळगांव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील नीळकंठेश्वर हायस्कुल येथे अमेरीकेतील प्रसिद्ध पॉलिमर शास्त्रज्ञ डॉ.अभिमन्यू ओंकार पाटील ( रा. बोरखेडा) यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते दहावीतील 200 गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. शैक्षणिक साहित्यांपासून गरीब होतकरु विद्यार्थी वंचित राहू नये या उद्देशाने कृती फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमाला डॉ.श्रीमती अंजली पाटील यांचे आर्थिक सहाय्य लाभले. प्रसंगी, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पक्षिमित्र डी.टी.महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी. महाजन, मुख्याध्यापक गोपाल पाटील यांचे हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. श्री मनोरे यांनी सुत्रसंचालन केले. विनोद पाटील, जयेश महाजन यांचे विशेष…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी न्यायालयात निकाल झाल्यानंतर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत निसटल्याने एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी याच्यासह अन्य तीन आरोपींना काल शुक्रवार दिनांक २४ जून रोजी न्यायालयात पोलीस घेऊन गेले होते. यात पोलिस मुख्यालयात कार्यरत रमेश पंढरीनाथ सोनवणे, अनिल बद्रीनाथ पवार, राकेश बारकू काळे, भगवान आनंदराव सूर्यवंशी या चौघा पोलीस कर्मचार्‍यांनी आपल्या सोबत या चारही आरोपींना कोर्टात सादर करून नंतर ते पुन्हा जिल्हा कारागृहाकडे रवाना झाले. त्यांना शासकीय वाहन नसल्यामुळे ते बसने न्यायालयात आले होते. तसेच ते बस स्थानकाकडे निघाले. दरम्यान, बस स्थानकावर पोहोचल्यावर आरोपी दादू…

Read More

मुंबई :प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे गट त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे, तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या आवाहनला एकनाथ शिंदेंनी नाकारलं आहे. तसेच, कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांनाही आव्हान दिले. बाळासाहेबांचे लाडके अपत्य म्हणजे शिवसेना होती. आता बंडखोरांना निष्ठा काय असते ती दाखवावी लागेल. यापुढे बाळासाहेब आणि शिवसेनेचे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर आज मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेमधील विश्वासू नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षात ज्यांचे मोठे स्थान होते, त्या एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षासोबतच बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास सर्वच आमदार सहभागी झाले आहे. शिवसेनेकडे आता अवघे दहा ते बारा आमदार शिल्लक आहेत. मुळात शिवसेनेचा उदय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाला होता. याच मुद्द्यावर पक्षाला प्रचंड जनाधार लाभला. पक्षाने राज्यातील सत्ता काबीज करण्यापर्यंत मजल मारली. मात्र याच मुद्द्यावरून आता पक्षात फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता पक्षावर दावा ठोकत आहेत. आमदारांनी साथ सोडल्यामुळे   हातबल झाले…

Read More

साईमत लाईव्ह भडगांव प्रतिनिधी  कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या लोन पिराचे येथील मूळ रहिवासी व सध्या व्यवसाया निमित्ताने उल्हासनगर येथे स्थायिक झालेले हबीब गुलाब पिंजारी व त्यांच्या पत्नी नवशाद हबीब पिंजारी हे दाम्पत्य हज यात्रेसाठी रवाना झाले आहेत मुस्लिम धर्मात अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी रवाना झाल्याबद्दल त्यांना नातेवाईक मित्रपरिवाकडून प्रत्यक्ष भेटून व फोन वरून शुभेच्या दिल्या जात आहेत तसेच त्यांच्यावर लोण सह कजगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हबीब पिंजारी हे कजगाव येथील व्यवसायिक शौकत पिंजारी यांचे लहान बंधू व पत्रकार अमीन पिंजारी यांचे काका आहेत.

Read More