धरणगाव ः प्रतिनिधी एकीकडे राज्याचे राजकीय वातावरण बंडखोरीमुळे ढवळून निघालेले असताना दुसरीकडे धरणगाव नगरपालिकेत 20 कोटींचा अपहार झाला असून याबाबत धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याचिकाकर्ते श्री. महाजन यांच्या वतीने ॲड.भूषण महाजन हे कामकाज बघत आहेत. धरणगाव पालिकेच्या 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात जवळपास 20 कोटींच्या रकमेची अनियमितता तसेच अफरातफरी नमूद केल्या आहेत. त्या अहवालाच्या अनुषंगाने धरणगाव येथील जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे सचिव, धरणगाव पोलीस स्टेशन, पोलिस अधिक्षक यांच्याकडे गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार केली होती.…
Author: Saimat
यावल ः तालुका प्रतिनिधी समाज परिवर्तनाचा आधार म्हणजे राजकारण असते. मात्र, तेथेही पदोपदी मनाच्या विपरीत घटना, घडामोडी घडतात. चढ-उताराची परिस्थिती निर्माण होऊन पक्षनिष्ठा, राजकीय चारित्र्याचा कस लागतो. अशावेळी पक्षासोबत एकनिष्ठ राहून समर्पित भावनेने काम करणारे माजी खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांच्यासारखे मोजके कार्यकर्ते वेगळे ठरतात, असे मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले. भालोद येथे स्व.हरिभाऊ जावळे स्मृतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
जामनेर/ चोपडा/ भुसावळ ः साईमत चमूकडून मुंबईहून आलेले रावेर लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख विलास पारकर व जामनेर विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांनी पारकर यांना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे रक्ताच्या शाईचे पत्र सुपुर्द केले.दरम्यान त्यांनी भुसावळ ,चोपडा व शेंदुर्णी येथेही बैठका घेऊन शिवसैनिकांना जनतेला सत्य परिस्थिती सांगून,नवे कार्यकर्ते जोडून पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. जामनेर येथे तालुका विधानसभा क्षेत्राची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, जामनेर विधानसभा संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील उपस्थित होते. या वेळी जामनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या रक्ताच्या शाईने पत्र लिहून पाठिंबा दर्शवला.…
साईमत लाईव्ह भडगाव प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव येथे दिनांक 24 च्या मध्यरात्री कजगाव पारोळा रस्त्यावरील उड्डाण पुलावर आठ लाख रुपये किमतीचे जनरेटर चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता पारेकरी ला जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला व ते पळून जाण्यास यशस्वी ठरले होते मात्र भडगाव पोलिसांनी चोरी ला 48 तास होत नाही तोच आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. चोरीतील आरोपींची नावे कुमार सिंग राजपूत 23 वर्ष राहणार चाळीसगाव गणेश महेंद्र पवार वय 21 वर्ष राहणार चाळीसगाव ऋषिकेश राहुल कासार वय 18 वर्ष आठ महिने राहणार चाळीसगाव वाल्मीक ऊर्फ रमेश सोमनाथ सुपेकर वय वीस वर्ष राहणार चाळीसगाव असे एकूण पाच आरोपींवर भादवि…
जळगाव ः प्रतिनिधी आरपीएफ व वाणिज्य विभागाच्या संयुक्त पथकाने विविध स्थानकांवर शनिवारी अचानक तिकीट तपासणी केली. या मोहिमेत 180 तिकीट तपासणीस, 140 रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी 46 रेल्वे गाड्या व जंक्शनवर तपासणी केली. त्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 6 हजार 506 प्रवाशांकडून 37 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेतून अनेक फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याने त्याचा परिणाम रेल्वेच्या तिकीट खिडकीवर होत आहे. यामुळे डीआरएम एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे, आरपीएफ आयुक्त क्षितिज गुरव यांनी शनिवारी सकाळी 6 वाजेपासून विविध रेल्वे स्थानकांत 30 पथकांद्वारे 46 गाड्यांमध्ये 37 लाखांचा दंड वसूल केला.या मोहिमेमुळे फुकट प्रवास करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली…
जळगाव ः प्रतिनिधी चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रविवारी डॉ. मिलिंद वायकोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिराचा 45 सभासदांनी लाभ घेतला. डॉ. मिलिंद वायकोळे, डॉ. रूपाली वायकोळे यांनी सभासदांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले. शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्येष्ठांना निष्पन्न झालेल्या आजारांबाबत चाचणी करून औषधोपचाराचे आवाहन करण्यात आले. चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडितराव सोनार, उपाध्यक्ष ॲड अरुण धांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव विकास बोरोले व सदस्यांनी नियोजन केले. ॲड अरुण धांडे यांनी आभार मानले.
औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. यातच शिवसेनेच्या एका आमदाराने केलेल्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटात सामील होण्यासाठी आपल्याला ५० कोटींची ऑफर दिल्याचा दावा शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा गौप्यस्फोट राजपूत यांनी केला. पण आपल्याला १०० कोटी दिले तरी आपण शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, अशा शब्दांत आमदार राजपूत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. उदयसिंग राजपूत औरंगाबादचे कन्नडचे आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत येऊ शकतात . शिवसेनेशी बंडखोरी करण्यासाठी मला ५० कोटीहून अधिकची ऑफर होती.…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल नगरपालिका कार्यक्षेत्रातील ओला व सुका घनकचरा वाहतूक करण्याचा ठेका एका ठेकेदाराला दिला असला तरी ठेकेदाराकडे असलेल्या कचरा वाहतूक करणाऱ्या काही वाहनावरील घंटा आणि रेकॉर्डिंगचा आवाज नागरिकांना येत नसल्याने घंटागाडी आली किंवा नाही याबाबत नागरिकांना समजत किंवा ऐकू येत नसल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत याकडे यावल नगरपरिषद साफसफाई व स्वच्छता विभाग कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होत असून ठेकेदाराचे बिल मात्र तो कर्मचारी टक्केवारी घेऊन नियमित काढीत असल्याचे यावल शहरात बोलले जात आहे.या ठेकेदाराची कचरा वाहतूक यंत्रणेची वाहनांची मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून त्याचे बिल अदा करू नये अशी संपूर्ण यावल शहरातून मागणी होत…
कजगाव : आमीन पिंजारी येथे चोरीचे सत्र सुरूच असून चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येते आता पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडस करून तब्बल आठ लाख रुपये कीमतीचे जनरेटर चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र पहारेकरी ला अचानक जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली व चोरटे तेथून फरार झाले सदरील चोरीच्या घटनेमुळे गावात एकच चर्चेला उधाण आले आहे अलिकडच्या काही दिवसांपासून गावात विविध ठिकाणांना चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे महादेव मंदिर,ऋषीबाबा मंदिर कालिका माता मंदिरावर चोरट्यांनी हात साफ केल्याचे आढळून आले आहे त्यातच कनाशी रस्त्यावरून काही दिवसांपूर्वी बैल जोडी चोरी झाल्याची घटना घडली होती तर त्याच रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील…