Author: Saimat

मुंबई : त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला ५२ आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत, अशी नाराजी शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुवाहीतील बैठकीत व्यक्त केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. आपल्या सर्वांवर आरोप होत आहेत. ते होत असतानाही महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीशी आहे. आपल्यावर भरपूर टीका झाली. आपले बाप काढले. आपली प्रेते आणण्याची भाषा वापरली. पण आमच्या जीवनाचा संघर्ष या लोकांना माहीत नाही. संजय राऊतांना आमची राजकीय वाटचाल त्यांना माहीत नाही. १९९२च्या दंगलीत आम्ही तिघं भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. त्यावेळी राऊत कुठे होते माहीत नाही. कलम…

Read More

यावल : प्रतिनिधी  जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रातील हतनुर धरण यावल उपविभागीय कार्यालयातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अभियंता एन.पी.महाजन हे आपल्या 38 वर्षाच्या यशस्वी प्रदीर्घ सेवेनंतर दि.30 जून2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. एन.पी.महाजन प्रथम 1984 मध्ये नाशिक येथील पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग सेवेत रुजू झाले.त्यानंतर 1987मध्ये जळगाव जिल्ह्यात मध्यम प्रकल्प विभागात हिवरा प्रकल्पात,त्यानंतर चोपडा तालुक्यात धानोरा हतनुर कालवा कार्यालयात,बुलढाणा जिल्ह्यात चिखली लघु पाटबंधारे विभागात, देऊळगाव राजा(जिल्हा बुलढाणा)खडकपूर्णा प्रकल्प विभागात,1997 मध्ये पुन्हा जळगाव जिल्ह्यात जळगाव पाटबंधारे विभागात ,त्यानंतर एरंडोल तालुक्यात गिरणा पाटबंधारे विभाग,जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रात हतनूर प्रकल्प विभागात नंतर सर्वात शेवटच्या टप्प्यात हतनुर प्रकल्पाअंतर्गत यावल उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून त्यांनी यशस्वीपणे कर्तव्यदक्षतेने आपली 38…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहे. मी आपल्या सहकारी आमदारांसह बहुमत चाचणीसाठी ते मुंबईत येणार असल्याची माहिती स्वतः शिंदे यांनी दिली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधाभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र पाठवले. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला समोर जावे लागणार आहे. कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला ३० जूना बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही कारणास्तव अधिवेशन तहकुब करता येणार नाही. उद्या सकाळी ११ पासून तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी प्रक्रियेचे थेट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बुधवारी पहाटेच्या सुमारास नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर भयंकर अपघात झाला. जळगावकडून बुधवारी सकाळी बकऱ्या घेऊन मालवाहू पीकअप क्रमांक एमएच.४३.एडी.१०५१ व एमएच.४३.बीबी.००५० हे भुसावळच्या दिशेने जात होता. सिमेंट फॅक्टरी ते डॉ.पाटील वैद्यकीय महाविद्यालयजवळ रेल्वे उड्डाणपुलावर वळणावर समोरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमपी.०९.एजी.९५२१ ने त्यांना जोरदार धडक दिली. जिल्ह्यातील नशिराबाद येथील नशिराबादजवळ एक तिहेरी अपघात घडला असून आहे. सिमेंट फॅक्टरीच्या समोर रेल्वे पुलावर दोन मालवाहू वाहनांवर भुसावळ करून येणारा भरधाव ट्रक धडकल्याने चौघे जागीच ठार झाले मालवाहू वाहनातील नागरिक उड्डाण पुलावरून खाली कोसळले तर ट्रक उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढलेला होता. ट्रकच्या धडकेत तीन जण उड्डाणपुलावरून…

Read More

मुंबई : प्रतिनिधी एकीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी मोठा धक्का मनाला जातो.या घडामोडीदरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स जारी केले. आज त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजार राहायचे होते . मात्र काही कारणास्तव मी आज ईडीच्या चौकशीला हजर राहू शकत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात असणारे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनीधी येथील चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ  विरोधी दिवस ‘ या विषयावर ऑनलाईन शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , मुंबई व  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस या विषयावर तालुका विधी सेवा समिती , चाळीसगाव आणि वकील संघ चाळीसगाव तसेच व्हीजन क्लासेसचे संचालक प्रा.धनंजय पाटील यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिबीर घेण्यात आले. शिबीराची प्रस्तावना व सूत्रसंचालन तालुका वकील संघाच्या सचिव अॅड. माधुरी बी . एडके यांनी केली. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंग केले यांनी मार्गदर्शन केले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुढे जाणाऱ्या कारने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील महिलेसह मुलगा जखमी झाल्याची घटना भुसावळ रोडवरील राष्ट्रीय महामार्गावरील कपूर पेट्रोल पंपाजवळ घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की,मुक्ताईनगर तालुकयातील इच्छापूर येथील रहिवासी सुमाबाई लक्ष्मण बेलदार (वय-५०) ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार २७ जून रोजी सुमाबाई ह्या आपल्या मुलगा गोपाळसह दुचाकी (एमएच १९ सीएच २८३१) ने जळगावात आल्या होत्या. काम आटोपून पुन्हा जळगावून इच्छापूर येथे दुचाकीने जात होते. गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे असलेल्या कपुर पेट्रोल पंपाजवळून दुपारी ३ वाजेच्या सुमारास जात असतांना त्यांच्या दुचाकीच्या पुढे (एमएच ०४…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : संजय राऊत (Sanjay Raut) यांना आम्ही महत्त्व देत नाही. ते केवळ फिल्मी डायलॉग मारतात. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून आमचाच विजय होईल, संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी व्यक्त केला. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना (Shivsena) असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला. सोमवारी सकाळी शिंदे समर्थकांनी पुन्हा ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले. टेंभीनाका परिसरात शिंदे समर्थकांनी मोठी गर्दी केली. संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात. शिंदे समर्थक आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर गेलेत. शिंदे म्हणालेत की, आम्ही शक्तिप्रदर्शन करत…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना संपवत आहेत, म्हणून पुन्हा भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. यात, बंडखोरांचा राष्ट्रवादीवर जास्त राग आहे. यासाठी काही घटनांचा दाखल दिला जातो आहे. शिवसेनेतील कोकणामधल्या असंतोषाबाबत आदित्य ठाकरे यांनी आदिती तटकरे यांचा घरी घेतलेला पाहुणचार कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत तनातणी सुरू होती. तटकरे गट – खासदार सुनील तटकरे आणि कन्या व जिल्ह्याच्या पालक मंत्री आदिती तटकरे हे शिवसेनेला त्रास देतात, अशी शिवसेनेच्या नेत्यांची तक्रार होती. आमदार भरत गोगावले ही तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Read More