Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मागील आठ दिवसांपसून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिय गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आज निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असं म्हणत सहकारी…

Read More

राज्यात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे भाजपानं पहिल्यांदाच या सगळ्या वादामध्ये उडी घेत थेट राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यापाठोपाठ राज्यपालांनी ३० जूनला विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन पाचारण केलं आहे. मात्र, राज्य सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची याचिका फेटाळली असल्याने उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेनेने…

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी  जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक, कवी, समीक्षक पोलीस नाईक विनोद अहिरे(Vinod Ahire) यांचा नुकताच ‘हुंकार वेदनेचा’ काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, विनोद अहिरे हे आपल्या खाजगी कामानिमित्त मुंबई येथे गेले असता त्यांनी मुंबईचे सह पोलीस आयुक्त कायदा-सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला ‘हुंकार वेदनेचा’ काव्यसंग्रह भेट दिला. नागरे पाटील यांनी काही कवितांचे अवलोकन केले असता ते अहिरेंना म्हणाले की, आपल्या कविता नुसत्याच रंजन करणाऱ्या नसून तर त्या वास्तववादी,अत्यंत मार्मिक, पोलिसांचा धैर्याचा शौर्याचा,  त्यांच्या बलिदानाच्या कथा सांगणाऱ्या आहेत त्या भावी पिढीला प्रेरणा देतील. अशा शब्दात अहिरे यांचे कौतुक करून पुढील साहित्य प्रवासा साठी शुभेच्छा दिल्या.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पद्मालय विश्रामगृह येथील हॉटेलजवळ काहीही कारण नसताना ७ ते ८ जण हातात लोखंडे व तीक्ष्ण हत्यार घेऊन एकमेकांशी वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे जवळ असलेल्या हॉटेल रंगोली समोर मंगळवारी २८ जून रोजी दुपारी ३ वाजता काही कारण नसताना गणेश रवींद्र सोनवणे, अक्षय पाटील, गणेश उर्फ जग्गू सोनवणे, साबू, अण्णा राठोड, गौरव गायकवाड, दीपक सुकलाल सोनवणे, सुनील रसाल राठोड यांच्यासह इतर सात ते आठ अज्ञात व्यक्ती एकमेकांमध्ये काही कारण नसताना हातात लोखंडी व तिक्ष्ण हत्यार घेऊन वाद…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी  अमळनेर येथील गौशाळेची जनसेवा आणि धार्मिक विधीयुक्त,पर्यावरण पूर्वक अग्निसंस्कार कसा करावा हे यावल येथील देशमुख वाड्यातील नागरिकांनी आज प्रथम अनुभवले. यावल येथील मोठा मारोतीची सेवा करणारे आणि मोठा मारोतीवर दृढ श्रद्धा असलेले शरद शिंदे यांची पत्नी सौ.कल्पना शरद शिंदे यांचे काल मंगळवार दि.28 रोजी दुपारी एक वाजता अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी नऊ वाजता धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करताना यावल येथील हिंदू स्मशानभूमीत अमळनेर येथील जनसेवा फाउंडेशन व अमळनेर गौशाळा संचालक प्रा.डॉ.अरुण कोचर, नानाभाऊ धनगर,सुयोग धनगर यांनी मुंबई येथील के.एल.झवेरी यांचे धार्मिक विचारांना प्राधान्य देत समाजहिताचे निर्णय आणि उद्दिष्टानुसार धार्मिक…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी  गेल्या दोन दिवसात म्हणजे काल आणि आज यावल ग्रामीण रुग्णालयात एकूण 15 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.या कोरोना बाधित रुग्णांना होम क्वॉरनटाईन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात हे रुग्ण घरी क्वारनटाईन राहतील का…? असे अनेक प्रश्न जनतेत उपस्थित केले जात आहेत. काल दि.28 रोजी यावल शहरात श्रीराम नगर मध्ये 2,सुंदर नगरीमध्ये 1, बोरावल गेट परिसरात 2, नगिना मस्जिद परिसरात 1, ड़ांगपुरा भागात 1, निमगाव येथे 1, सातोद येथे 2 अशा दहा रुग्णांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. आज दि 29 रोजी बोरावल गेट परिसरात पुन्हा 2, संभाजी पेठ 1, डांगपुरा एक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गढोदा येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, जितेंद्र गोपाल सपकाळे वय ३५ असे मृत तरुणाचे नाव आहे . हा आपल्या आई, पत्नी, भाऊ, वहिनी यांच्यासह वास्तव्याला आहे. बँड पथकात वाजंत्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे जितेंद्र हा घरी एकटाच होता. मंगळवार २८ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गल्लीत खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात आला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जितेंद्र सपकाळे मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. आणि अशातच शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकी पत्राची देखील चर्चा सुरू झाली आहे. किशोरी पेडणेकर यांना आलेल्या पत्रात लिहले आहे, ‘मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय.…

Read More

सोयगाव : तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) जरंडी,ता.२८…शेतात जाण्याचा रस्ताच संबंधित ठेकेदाराने बंद केल्याने रस्त्यासाठी बहुलखेड्याच्या त्या पाझर तलावात जल समाधीच्या पावित्र्यात असलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रस्त्यासाठी अखेर तहसील कार्यालयाचे दरवाजे ठोठावून आम्हाला रस्ताच द्या अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार रमेश जसवंत यांचेकडे मंगळवारी ता.२८ केली आहे. बहुलखेडा गावालगत असलेल्या पाझर तलावातून असलेला शेताकडे जाण्याचा रस्ताच संबंधित ठेकेदाराने बंद केल्याने व जुना वापरता रस्ता पाझर तलावाच्या पाण्याखाली बुडत असल्याने या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ताच उपलब्ध नसल्याने या दोनशे शेतकऱ्यांना डोक्यावर खताच्या गोण्या व खरिपाच्या पिकांचे उत्पन्न घेवून यावे लागते वेळ प्रसंगी या पाझर तलावाने पाण्याची धोकादायक पातळी गाठल्यास हा रस्ताच बंद होतो…

Read More