Author: Saimat

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील सुनील आर. मंत्री यांच्या मुख्य कार्यालयातील संगणक प्रणालीवर सायबर अटॅक होऊन सर्व डेटा हॅक करण्यात आल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली असून या हल्यास जबाबदार धरत सुनील आर. मंत्री यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येथील इंदू कॉम्प्युटर्स चे संचालक दीपक वडनेरे यांच्या विरोधात फसवणुकीची गुन्हा दाखल केला आहे. सुनील आर. मंत्री ही संस्था ऑटोमोबाईल, मोबाईल, सरकारी कॉन्ट्रॅक्ट, प्रॉपर्टी खरेदी-विक्री, मालमत्ता भाडेकरार, वैद्यकीय सेवा, वेअरहाऊसिंग असा व्यवसाय करीत असतात. संस्थेचे मुख्य कार्यालय जळगाव स्थित मेहरुण शिवार गट नं. 78, प्लॉट नं. 1 एमआयडीसी येथे आहे. या मुख्य कार्यालयातील संगणकाचे देखभाल-दुरुस्ती इत्यादीची कामे दीपक…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव जळगाव जिल्हयासह इतर जिल्हयातील गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला जेरबंद करत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ताब्यात घेतल्यानंतर त्यास गुन्हयाच्या पुढील तपासा कामी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना जळगाव जिल्हयातील व इतर जिल्हयातील गंभीर गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यांनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील प्रमोद लाडवंजारी , किरण धनगर यांना यावल भागातील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले. पोहवा प्रमोद लाडवंजारी , किरण धनगर यांना…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अपडेट झालेले जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वसामान्य रुग्णालय झाले असून इथल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गोर गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी हे अत्यंत महत्वाचे होते. म्हणून गेल्या एक वर्षात दोन्ही रुग्णालयाचे अत्याधुनिकरणासाठी 50 कोटी पेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आला होता. आता जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 15 कोटीचे अत्याधुनिक सिटी स्कॅन लवकरच उपलब्ध करणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी नवे मोड्युलर आय. सी. यु. आणि मोड्युलर ऑपरेशन थियटरचे लोकार्पण करण्यात…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूल पूर्व प्राथमिक विभागात सोमवार, दिनांक १५ जुलै, रोजी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज भादुपोता यांचे हस्ते पालखी पूजन व ज्ञानेश्वरी पूजन करण्यात आले, त्यात पालकांनाही सहभागी करण्यात आले. यात नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका व “चल ग सखे चल ग सखे पंढरीला”,” विठ्ठल विठ्ठल”या गाण्यावर नृत्य सादर केले. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीत लहान मुलांसोबत वयोवृद्ध नागरिकांनी देखील ठेका धरला. “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल” हा कार्यक्रमाचा विषय होता. मुला मुलींनी सुंदर वेशभूषा करून वारकऱ्यांच्या रूपात सजले होते. मुलींनी तुळशीची रोपे वाहून नेली आणि…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत ११ सुवर्ण, ५ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन जैन स्पोर्टस् अकॅडमी प्रथम विजेते ठरलेत. तर ८ सुवर्ण, ४ रौप्यपदक पटकावत रावेर तालुका द्वितीय, ४ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्यपदक पटकावुन पाचोरा संघ तृतीय क्रमांकाने विजयी ठरलेत. जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने (ता. १४) जुलै ला जिल्हास्तरीय कॅडेट आणि ज्युनियर मुलं व मुली यांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन गुणवंत खेळाडू पुरस्कार प्राप्त विशाल बेलदार यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन स्पोर्टस् अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी,…

Read More

साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात या खेळाडूंची निवड झाली. राज्य स्पर्धेतून महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड हरियाणा मधे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होईल. अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुणवंत कासार प्रथम, तसीन तडवी द्वितीय, प्रशांत कासार तृतीय, अजय परदेशी चतुर्थ यांची निवड झाली. जिल्ह्यातील एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फीडे आरबीटर अभिषेक जाधव, सीनिअर अर्बिटर परेश देशपांडे, नॅशनल अर्बिटर नथू सोमवंशी, फीड अर्बिटर आकाश धनगर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम केले. शकील देशपांडे, रवी दशपुत्रे, तेजस तायडे यांनी…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२२-२०२३ च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन दिनांक १० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी सोमवार दिनांक १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे नमूद जाहिरातीच्या अंतिम दिनांकापूर्वीचे मुळ कागदपत्र व त्या कागदपत्रांचा छायांकित प्रर्तीचा एक संच व ०२ पासपोर्ट साईज फोटोसह कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२२-२०२३ च्या जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे १३७ रिक्त पदांसाठी शारीरीक चाचणी, लेखी परीक्षा, एनसीसी सी प्रमाणपत्राच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन सामाजिक संमातर आरक्षण प्रवर्गनिहाय…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात मनपा स्तरीय आंतरशालेय सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धा चे आयोजन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन च्या माध्यमातून करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप शनिवारी संध्याकाळी झाला. स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात अंतिम विजेतेपद मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने तर उपविजेतेपद रायसोनी इंग्लिश मीडियम ने पटकाविले. मुलांमध्ये पोदार विजयी तर ओरियन सीबीएससी पोदार हा उपविजेता ठरला. तत्पूर्वी १५ वयोगटात सुद्धा पोदार विजयी ठरल्याने तिन्ही गटात पोदार विजयी ठरत तिहेरी मुकुट प्राप्त केला. विजेते उपविजेते संघांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस तर्फे सुवर्ण व रजत पदक प्रमुख अतिथींच्या हस्ते देण्यात आले. पारितोषिक समारंभास…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील शेळगाव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा लाभक्षेत्रातील शेतक-यांना लाभ होण्याच्या दृष्टीने शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या 592.01 कोटी किंमंतीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. 27 जून 2023 रोजी ‘शासन आपल्या दारी’ झालेल्या कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार तापी विकास महामंडळ, जळगाव यांनी वेळोवेळी…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क जळगाव येथील जीवन विमा योजना प्रतिनिधी मनोज संगीता जैन यांचे चिरंजीव संकेत जैन यांनी वयाच्या 23 व्या वर्षी सी. ए. परीक्षा प्रथम प्रयत्नात डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण होत यश प्राप्त केले आहे. संकेत जैन भविष्यात actuaries करणार आहे. त्यास सीए करण काबरा, सीए पदमसिंह पाटील, महेंद्र झवर, सीए मुर्तीजा बंदूक वॉला, सीए हर्षित मालपाणी, सीए श्रुती काबरा यांचे मार्गदर्शन लाभले. सीए संकेत यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. 10/12 वीत त्यास 95/96 टक्के मार्क्स मिळाले होते.

Read More