साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव
बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूल पूर्व प्राथमिक विभागात सोमवार, दिनांक १५ जुलै, रोजी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज भादुपोता यांचे हस्ते पालखी पूजन व ज्ञानेश्वरी पूजन करण्यात आले, त्यात पालकांनाही सहभागी करण्यात आले. यात नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका व “चल ग सखे चल ग सखे पंढरीला”,” विठ्ठल विठ्ठल”या गाण्यावर नृत्य सादर केले. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली.
दिंडीत लहान मुलांसोबत वयोवृद्ध नागरिकांनी देखील ठेका धरला. “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल” हा कार्यक्रमाचा विषय होता. मुला मुलींनी सुंदर वेशभूषा करून वारकऱ्यांच्या रूपात सजले होते. मुलींनी तुळशीची रोपे वाहून नेली आणि मुलांनी भगवान विठ्ठलाचे नाव मंत्रमुग्ध करणारे झांज धरली या कृतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यात विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशी चे महत्व आणि पंढरपूर यात्रेची भाविकांसाठी महत्त्वाची माहिती देण्यात आली. या उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती आणि अध्यात्माची भावना निर्माण झाली. अशाप्रकारे भक्तिमय वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पडला. प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सोहळ्यासाठी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.