Author: Saimat

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून शिवसेना व छावा संघटनेच्या वतीने शनी महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली. भडगाव पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरून शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणे अपेक्षित असल्याने आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळमध्ये स्थान मिळाचे म्हणून शनी महाराजांची महाआरती करून महाराजांना तेल अर्पण करून साकडे घालण्यात आले यावेळी शिवसेना तालुका संघटक अनिल महाजन अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष लालसिंग पाटील रविंद्र पाटील राजेंद्र पाटील गौरव…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. आता पक्ष संघटना पुन्हा उभारण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह पक्षातील निष्ठावान नेते मैदानात उतरले आहे. येत्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना बळ देण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत.शिवसैनिकांनी संबोधित करताना त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. धनुष्यबाण हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. आमचे धनुष्यबाण कोणीही हिरावून देऊ शकत नाही, शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल, हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला आणि शिंदे गटाला दिला आहे. …

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल येथील तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी तालुक्यातील सावखेडासिम येथील अजय आत्माराम पाटील यांची तर सचिवपदी अतुल निळकंठ यादव यांची येथील तालुका खरेदी विक्री संघाचे सभागृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे.मराठा सेवा संघाच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. मुकेश येवले हे होते. येथील तालुका मराठा सेवा संघाच्या कार्यकारणीची निवड यासह विविध विषयावर येथील तालुका खरेदी विक्री संघाची सभागृहात,गुरुवारी सायंकाळी बैठक संपन्न झाली बैठकीत तालुकाध्यक्षपदी अजय पाटील तर सचिवपदी अतुल यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अन्य कार्यकारणीत उपाध्यक्षपदी मोहराळे येथील धनराज जिजाबराव पाटील,के. यु.पाटील,बी.डी.पाटील,यांची तर कार्याध्यक्षपदी डी.बी.पाटील, सहसचिवपदी उंटावद येथील महेश पाटील,कोषाध्यक्षपदी दहिगावचे संदीप बाळकृष्ण पाटील,यावल…

Read More

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी  स्थानिक लोकसेवा शिक्षण बहुद्देशीय मंडळाद्वारे संचालित पद्मश्री डॉ.व्ही.बी.कोलते कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये चढा ओढ निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. नुकतेच दहावी व बारावीच्या राज्य परिक्षा मंडळाचा निकाल जाहीर झाला.त्यामध्ये हे शिक्षण झाल्यावर निश्चितच नोकरी मिळत असते.त्यामुळे उत्साह दाखवीत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.       नुकतेच यावर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये या महाविद्यालयाला एन.बी.ए.चे मानांकन मिळालेले आहे. सदर मानांकन हे ज्या संस्थांना प्राप्त होते.त्यांचे शिक्षण हे आंतर राष्ट्रीय व्यावसायिक कंपन्यांसाठी निगडीत असलेल्या कायद्यांना अनुसरून जे कॉलेज पात्र असेल त्यांना च दिले जात असते. ते या कॉलेजला मिळाले…

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी वैज्ञानिक चमत्काराने वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रगती झाली असली तरी मुंबई पुणे सारख्या शहराबाहेर या प्रगतीचा प्रवाह कधी आणि कसा पोहचेल हे सांगणे कठीण असले तरी रूग्णसेवा हीच इश्वर सेवा मानून कर्तव्य पार पाडणाऱ्या देवदूतांची प्रामाणिक इच्छाशक्ती शाबूत असेल तर असे चमत्कार जळगाव सारख्या शहरातही घडू शकतात, याचे जीवंत उदाहरण शिल्प हॉस्पीटलमध्ये यशस्वीपणे पार पडलेल्या अत्यंत किचकट शस्रक्रीयेद्वारे प्लॅस्टीक सर्जन डॉ. श्रीराज महाजन यांनी आपल्यासमोर ठेवले आहे. शरातील शिल्प हॉस्पीटलमधील प्रमुख प्लॅस्टीक सर्जन तज्ज्ञ म्हणून कर्तव्य बजावत असलेले डॉ. श्रीराज महाजन यांनी काही दिवसांपुर्वीच अत्यंत किचकट आणि अवघड प्रक्रियेतून जाणारी शस्रक्रीया अगदी लिलया पार पाडून जळगाव…

Read More

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी दि . मलकापूर अर्बन को . ऑप बँक लि . मलकापूरची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात आल्याने रिझर्व्ह बँकेने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका आदेशान्वये ६ महिन्यांसाठी निर्बंध जारी करीत ग्राहकांना त्यांच्या खात्यातून १० हजार रूपये काढता येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने काढलेल्या आदेशात व प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले होते . ६ महिन्याचा कालावधी झाल्यानंतर जून २०२२ मध्ये पुन्हा रिझर्व्ह बँकेने सदरचे निर्बंध ३ महिन्यांकरीता वाढविले होते . या सर्व प्रक्रियेत मात्र त्याठिकाणी असलेले ठेवीदार नाहक भरडले जात आहे . त्यांच्या हक्काचा पैसा त्यांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अशा ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी आपण रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी कवली ग्रामसेवकावर अनेक तक्रारी दाखल असुन सुद्धा कोणतीही कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांसह अर्जदार भ्रमात पडले आहे. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक पी.एस ढोले यांना आदेशित करुन प्रस्तावाची सत्य प्रत अर्जदाराला देण्याचे कळवले असता संबंधित ग्रामसेवक याने केराची पाटी दाखवून अर्जदाराला उडवा ऊडवीचे उतर दिले आहे. तसेच मला ज्याने रक्कम दिली त्याचेच मी ठराव दाखल केले आहे व ज्याने पैसे दिले त्याचेच ड यादीत मी ठरावामध्ये वर नाव घेतलेले आहे. तुम्ही मला रक्कम दिलेले नाही तुम्हाला जिथे जायचे तिथे जा. माझे कोणीही बरेवाईट करु शकत नाही. अशी उद्धट भाषा वापरुन सदर ग्रामसेवकने अर्जदाराचे मनःस्थिती दुखावली. तरी गटविकास…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व पत्रकार तथा सुवर्णकार समाजाचे माजी सचिव नितीन दिलीप सोनार यांची संत नरहरी सोनार युवा फाउंडेशन च्या भडगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली समाज हिताच्या कार्यात अग्रेसर असल्याने त्यांच्या कामाची दखल घेऊन फाउंडेशनने त्यांच्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याबद्दल त्यांचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शामकांत दाभाडे नागपूरचे सतीश हिंगोलीकर नाशिकचे राकेश दुसाने मुंबईचे सचिन घोडके संगीता कुलथे तेजश्री विसपुते निलेश भामरे लोटन भामरे विनोद भामरे कजगाव सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष विजय पोतदार उपाध्यक्ष सुरेंद्र बागुल सचिव रत्नाकर सोनार रमेश देवरे पंढरीनाथ सोनार विजय अहिरराव भगवान घोडके विठ्ठल बागुल…

Read More

जळगाव : विशेष प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील शासकीय कामे वाटप आणि कागद पत्रे अफरातफर प्रकरणाचा मागील आठवड्यापासून जिल्हाभर गाजावाजा सुरु असून लेखा सहाय्यक पी. एम. पाटील अद्यापही समोर आलेले नाहीत.  दरम्यान जि.प.तील अधिकाऱ्यांसमोर कोणाचीही दाळ शिजत नसल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. पी.एम.पाटील यांच्यावर कडक कार्यवाहीची बडतर्फी वा फौजदारी गुन्हे नोंद झाल्यास तपासात वरिष्ठ कार्यकारी अधिकारी श्री.धिवरे तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मोहन ह्यांची पूर्ण पोल खुलेल म्हणून ताबडतोब तत्वावर पी.एम.पाटील ह्यांची दुसऱ्या विभागात बदली देण्यात आली आहे.मुद्दाम पी.एम.पाटील यांना सावलीत ठेवून, वरिष्ठ अधिकारी आपआपली कातडी वाचवण्यासाठी धडपडत आहेत. आज सूचक सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीअन्वये, सदर प्रकरणाची दखल…

Read More