साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक मध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षकांनी आपल्याला लळा लावला त्या शिक्षकांना गुरुवंदना म्हणून चरण स्पर्श केले .इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी कौशल वाघमारे शिक्षकाची भूमिका करून या चिमुकल्या शिक्षकाकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला . नव्या सुर्वे व पार्थ जगताप विद्यार्थिनीने इंग्लिश मध्ये गुरुपौर्णिमेवर उत्कृष्ट भाषण केले. यावेळी वर्गात बलून विनर हा गेम घेण्यात आला जे विद्यार्थी बलून वर आपले स्वतःचे नाव लिहीतील त्यांना बलून वाटप केले गेले. फुग्यांसोबत विद्यार्थ्यांनी फुगा रे फुग्या फुगशील किती कविता आनंद घेतला. या उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव येथील कै. बाबुरावजी काळे स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी केली शिक्षकासमवेत गुरुपौर्णिमा साजरी.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.रविंद्र जाधव सर हे होते या कार्यक्रमात इ.8 वी ते 10 चे विद्यार्थी प्राची पाटील धनश्री वाघ गुंजन पाटील भावेश गवळे दर्शन पाटील अथर्व मानकर सायली पाटील राजश्री मिसाळ आदिती पाटील किर्ती पाटील सोजल पवार आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व शाळेतील शिक्षकांना पुप्षगुच्छ देऊन अभिवादन केले..यावेळी उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे सर यांनी विद्यार्थ्यांना वीर एकलव्य यांच्या बद्दल ची गोष्ट सांगुन शिष्याच्या मनात गुरुचे काय स्थान…
जळगाव : प्रतिनिधी येथील गेंदालाल मिल परिसरात राहणार्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, लग्नाचे आमिष दाखवून तसेच खोटी आश्वासने देवून दिशाभूल केल्यामुळे तिने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोषी असलेला नराधम निलेश मंगलसिंग गायकवाड व त्याची आई लक्ष्मी मंगलसिंग गायकवाड यांना त्वरीत अटक करुन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत तरुणीचे काका विनोद रोहीदास जाधव यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पिडीत तरुणी कु. दिव्या दिलीप जाधव हिने गेल्या २४ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान निलेश गायकवाडच्या मानसिक व असह्य त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला वेळीच येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी : तालुक्यातील कोल्हाडी ते निमखेड रस्त्याचे काम मंजूर कामापेक्षा कमी झालेअसून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन कामाचा दर्जा सुधारावा व संबधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा याविरुध्द ९ ऑगस्ट क्रांतीदिनी याच रस्त्यावर उपोषणास बसणार असल्याचा रवींद्र बावस्कर यांनी इशारा दिला आहे. याबाबत माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंर्तगत कोल्हाडी ते निमखेड रस्त्याचे डांबरीकरण काम झाले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच निविदेत कोल्हाडी ते निमखेड या लांबीची असतांना केले गेलेले काम कोल्हाडीपासून ५०० मीटर कमी करण्यात आले आहे. हि बाब निदर्शनास आणून देण्यास दि:- ६ जून…
अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली. आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगारात ४० हजार रुपयांनी वाढ होणार आहे. एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एआयसीपीआयच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, ६ टक्के महागाई भत्ता वाढीवरून पडदा उचलण्यात आला आहे. आता ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीची घोषणा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या कैथाकीत डीए वाढीसह सरकार १८ महिन्यांच्या थकबाकीवरही निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून सरकारकडे त्यांचा थकित डीए देण्याची मागणी करत आहेत. एआयसीपीआय निर्देशांकात मोठी झेप फेब्रुवारीपासून एआयसीपीआय निर्देशांकाचा डेटा सातत्याने वाढत आहे. मे महिन्याची आकडेवारी समोर आली आहे, त्यामुळे जुलैमध्ये महागाई भत्त्यात किमान…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी बुधवारी होणाऱ्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी मंगळवारी सायंकाळी दिली. जुलै ते आक्टोंबर महिन्यात होवू घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी बुधवारी आरक्षण व सोडत काढण्यात येणार होती परंतु मंगळवारी अचानक सोडत व आरक्षण कार्यक्रमास नवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सोयगावला बुधवारी होणारी सोडत रद्द करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे कि,दि.५ जुलैच्या पत्रानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण व सोडत कार्यक्रम देण्यात आला आहे,परंतु सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष याचिकेबाबत राज्यशासनाने दाखल केलेल्या अर्जाबाबत दि.१२ जुलैला घेण्यात…
साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी : जवळपास २० दिवसांच्या सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने विविध मंडळांवर आणि आयोगामध्ये नेत्यांच्या केलेल्या नियुक्त्या कधीही रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षस्थानी नियुक्त केलेल्या रूपाली चाकणकरांना पदाचा मोह आद्यपही कायम आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. हे पद स्वीकारण्यापूर्वी आपण राष्ट्रवादी पक्षातील पद सोडले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन नवीन सरकार स्थापन झाले असले तरी आयोगाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली…
कळवणःसाईमत लाईव्ह साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडाच्या मंदिर गाभाऱ्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत असल्याने येत्या २१ जुलैपासून दीड महिना भगवती दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. देवस्थान ट्रस्टमार्फत सन २०१२-१३ पासून याबाबत नियोजन होत असून, पुरातत्व खात्याचे मार्गदर्शन व आयआयटी पवईसह नाशिकच्या मे. अजिंक्यतारा कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून मूर्ती संवर्धन व देखभालीचे नियोजन सुरू आहे. त्यादृष्टीने येत्या २१ जुलैपासून ४५ दिवस भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालयाजवळ भगवतीची प्रतिकृती भाविकांसाठी पर्यायी दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. तसेच भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद, भक्त निवास व इतर…
सोयगाव : विजय चौधरी कवळी येथील दूषित पाण्याबाबत निवेदन देण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत मध्ये गेलेल्या महिलांना ग्रामसेवक पी एस ढोले हे गैरहजर दिसल्याने त्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावले. कवली गावात दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत याबाबत निवेदन देण्यासाठी महिला ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या होत्या मात्र ग्रामसेवक गैरहजर होते त्यांनी महिलांसोबत मोबाईल वरून संपर्क साधला मात्र समाधानकारक उत्तर न दिल्याने महिला संतप्त झाल्या त्यांनी ग्रामपंचायतिला कुलूप लावले. ग्रामपंचायतीला कुलूप लावून देखील पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने गावाला भेट दिली नाही व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. ग्रामसेवक पी एस ढोले यांच्या सततच्या कामचुकारपणाविषयी वेळोवेळी पंचायत समितीला निवेदन देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याने देखील…