जळगाव जनता बँकेच्या संचालकपदी मधुकर पाटील यांची निवड

0
53

साईमत / जळगाव / प्रतिनिधी

जळगाव जनता सहकारी बँकेच्या संचालक पदी जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक मधुकर धोंडू पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातून स्थानिक मतदार संघातून रिक्त झालेल्या जागेवर अध्यासी अधिकारी विशाल ठाकुर सहाय्यक निबंधक अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्य कार्यालयात दुपारी 2 वाजता संचालक मंडळाच्या सभेत मधुकर धोंडू पाटील यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रम पत्रिकेनुसार मधुकर पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. सदर अर्जास सूचकहरिश्चंद्र यादव व अनुमोदक म्हणून हिरालाल सोनवणे होते. अर्ज छाननी अंती तो योग्य असल्याने अध्यासी अधिकारी विशाल ठाकुर यांनी मधुकर धोंडू पाटील यांची निवड झाल्याचे घोषित केले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने , उपाध्यक्ष कृष्णा कामठे यांनी नवनिर्वाचित संचालक मधुकर पाटील यांचा सत्कार केला. यावेळी बँकेचे संचालक अनिल राव सर, केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर, माजी अध्यक्ष संजय बिर्ला, बँकेचे संचालक डॉ. आरतीताई हुजूरबाजार, हरिश्चंद्र यादव, डॉ. अतुल सरोदे, विवेक पाटील, संजय प्रभुदेसाई, डॉ. सुरेन्द्र सुरवाडे, हिरालाल सोनवणे, सपन झूनझूनवाला, संध्याताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here