Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी पिण्याच्या पाण्यातून शरीरात क्षारांचे प्रमाण वाढल्याने पोटांचे विकार आणि किडनीच्या विकारांचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याचा प्रकार गुरुवारी कवली ता.सोयगाव गावात आढळून आला त्यामुळे गावातील तब्बल १५ ते २० रुग्ण पोटांच्या विकाराने त्रस्त असल्याची माहिती हाती आली आहे.या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. या किडनीच्या विकारांच्या बाधेने कवली गावात आतापर्यंत २५ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्याचे खळबळजनक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. कवली ता.सोयगाव येथील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विहिरीत क्षारांचे मोठे प्रमाण वाढल्याचे उघड झाले असून यामुळे पोटांच्या विकाराचे रुग्ण गावात वाढले असून काहींना किडनीच्या विकाराची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. किडनीच्या विकारांच्या रुग्णांवर पाचोरा जि.जळगाव येथील…

Read More

मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे सत्तांतर झाले आहे. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना अनपेक्षित धक्का देत देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार (Devendra Fadnavis Govt) स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेत मोठ्याप्रमाणात आउटगोइंग सुरू झाली आहे. शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि नेते एकनाथ शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेतील होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभे ठाकले आहे. मात्र आता त्यांनी पक्ष संघटनेत नवी उभारी देण्याचा मोठा प्लॅन आखला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष…

Read More

साईमत लाईव्ह फैजपूर ता यावल प्रतिनिधी येथील गणेश कॉलोनी तील रहिवाशी उत्कर्षा मनोजकुमार चौधरी ही नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी नुकतीच प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत उत्कर्षा चौधरी हिने चांगले गुण संपादन करत यश मिळविले आहे. तिच्या या यशासाठी ज्ञानदिपु शैक्षणिक स्पर्धा परीक्षा क्लासेसचे प्रा. संजय सातपुते यांचे, गोदावरी इंग्लिश मेडियम स्कूलच्या शिक्षिका मीनल कुमार यांचे मार्गदशन लाभले. मुळचे खिरोदा येथील उपकार्यकारी अभियंता मनोजकुमार पंडित चौधरी यांची सुकन्या आहे.     उत्कर्षाने मिळविलेल्या यशाबद्दल तीचे आ. एकनाथराव खडसे, आ. शिरिष चौधरी, खा.…

Read More

मुंबई : प्रतिनिधी जून महिन्यात घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रिपदाची ३० जून रोजी शपथ घेतली. शपथविधी होऊन तीन आठवडे झाले. मात्र, शिंदे सरकार यांचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला नव्हता. मंत्रिपदावरून शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्यात एकजुट नसल्यामुळे राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. शिंदे गटात सात माजी मंत्री आहेत. त्यांची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये होईल, अशी चर्चा सुरु आहे. शिंदे यांच्या गटात मंत्रिपदाच्या मागणीसाठी बंडखोर आमदारांची नाराजी दिसून आली. राष्ट्रपती निवडणूक होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. तर मंत्रिपद न मिळालेल्यांची नाराजी व्यक्त होऊ शकते, याची भीती…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील श्री. स.भु. प्रशाला येथे दिनांक-१३/७/२०२२ बुधवार रोजी शालेय समिती नवनियुक्त सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष आदरणीय डॉ.योगेशदादा इंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.प्रमुख पाहुणे सुधाकर नाना महालपुरे होते.प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय पी.जी.बोराडेसर, उपमुख्याध्यापक आर. एस.माळीसर,पर्यवेक्षक एस.जी.गायकवाड सर उपस्थित होते.नवनिर्वाचित सदस्य भागवत विष्णू महालपुरे,शरद बबन निकम,आबाराव भिकन चौधरी,किशोर नंथू पाटील निंभोरा या सर्व नवनियुक्त सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.योगेश दादा इंगळे व मुख्याध्यापक बोराडे सर यांनी शाल व श्रीफळ देऊ केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आदरणीय मुख्याध्यापक पी.जी.बोराडे यांनी सर्वशाखा सदस्यांचा शाळेच्या विकासासाठी,प्रगतीसाठी निश्चित उपयोग होईल. असे मत व्यक्त केले.व…

Read More

 कजगाव   :  प्रतिनिधी महाराष्ट्र टीचर असोसिएशन च्या संस्थापक तथा राज्याध्यक्ष सौ शुभांगी पाटील यांनी  कजगाव येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कजगाव येथील ब ज हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देत तेथील शिक्षकांची संवाद साधत व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गावातील पत्रकार यांच्याशी संवाद साधला व जवळ असलेल्या श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त जाऊन दर्शन घेतले. सौ शुभांगी पाटील हे कजगाव येथून जवळच असलेल्या सार्वे बुद्रुक तालुका पाचोरा येथील माहेर असल्याने परिसरात परिचित आहेत. विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका सो शुभांगी पाटील यांनी केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक-श्री एम के पवार, नितीन पाटील, केदार सर, बी…

Read More

मुंबई :प्रतिनिधी  पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. खासदार, आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात सहभागी झाले आहेत. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. पालघर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट पडली असून खासदार आमदारांसह जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक ,जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य शिंदे गटात सामील झाले आहेत. खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा,जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्यासह जिल्ह्यातील काही नगर पंचायतीचे नगरसेवक, पंचायत समिती सभापती, सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त शिंदे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  महाराष्ट्र आणि गुजरातला गेल्या दोन आठवड्यात पावसाने झोडपून काढलं होतं. पण आता वरुणराजा विश्रांती घेणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरामध्ये पुढच्या ३-४ दिवसामंध्ये पावसाचा जोर कमी होईल पण देशातल्या इतर ५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये येत्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. उत्तर प्रदेशातही या काळात काही ठिकाणी पाऊस पडेल. IMD ने हिमाचलमध्ये १६ जुलैला, राजस्थानमध्ये १७ जुलैला, पंजाब आणि हरियाणामध्ये १९ पर्यंत, उत्तराखंडमध्ये १६ आणि १७ जुलैला मुसळधार पावसाचा…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मी चुकीचे शब्द वापले नाहीत. शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्यासंदर्भात मी भाष्य केले. ०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यानी भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिल्याने शिवसेनेची ताकद कमी झाली, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. यावर केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. त्यांच्याबद्दल एखादा शब्द निघाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. आजपर्यंत पवारांच्या विरोधात कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. ते मला गुरुसमान…

Read More